Ladki Bahin Karj Yojana। लाडक्या बहिणींना मिळणार 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज बघा संपूर्ण माहिती.

Ladki Bahin Karj Yojana 2025 Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

राज्यशासनाने लाडकी बहीण योजनेनंतर अजून एक लाडक्या बहिणींसाठी बिनव्याजी कर्जाची खुशखबर दिली आहे. मंडळी लाडकी बाही योजना हि राज्यातीलच नाही तर देशातील सर्वात सुपरहिट योजना बनली आहे यात कोणाचेही दुमत असल्याची अजिबातच संभावना नाही.

लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी शासनाने Ladki Bahin Karj Yojana ची सुद्धा घोषणा केली आहे. ज्या महिला भगिनींना स्वयंरोजगार निर्माण करायचा आहे किंवा स्वतःचे करियर उद्योग क्षेत्रामध्ये बनवायचे आहे, परंतु आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही. अशा महिलांना हि बिन व्याजी कर्जाची एक सुवर्णसंधी स्वतः चालून आलेली आहे. तर चला काय आहे हि विनव्याजी कर्ज योजना सविस्तर बघुयात.

Ladki Bahin Karj Yojana Maharashtra काय आहे?

राज्यशासनाच्या लाडक्या बहिणींसाठी सुरु करण्यात आलेल्या बिनव्याजी कर्ज योजना ह्या दोन प्रकारच्या आहे. एक ग्रामीण भागातील महिलांना लघु उद्योग सुरु करण्यासाठीची योजना आहे. ज्याच्या अंतर्गत लाभार्थी महिलेला चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. हि योजना संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींकरीता आहे.

मात्र जी 1 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज योजना आहे, हि फक्त आणि फक्त मुंबई मधील रहिवासी असलेल्या लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे. मुंबईतल्या मुंबईत उद्योग सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासन मुंबईच्याच मुंबै बँकेकरून या कर्जाचे वाटप करणार आहे. मुंबईमधील लाडक्या बहिणींना स्वतःचा मुंबई मध्ये स्वयंरोजगार मिळवण्यासाठी उद्योग सुरु करून स्वतःचे आणि परिवाराचे चांगले पालन पोषणाचा प्रश्न मार्गी लागू शकणार आहे. मित्रांनो आणि बहिणींनो या योजनेची घोषणा काही दिवसांपूर्वीच भाजपाचे नेते आणि मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर साहिबांनी मिडियाच्या समोर केली आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळेल?

Ladki Bahin Karj Yojana हि फक्त ज्या महिला स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक आहे, महिलांचा बचत गट हा स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे, अशाच महिलांना दिला जाणार आहे. लक्षात घ्या कि, हि योजना फक्त मुंबई शहरातील लाडक्या बहिणींसाठीच सुरु करण्यात आली आहे.

ज्या महिला ह्या अजून सुद्धा किंवा तत्कालीन हप्त्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभास पात्र होत्या त्याच मुंबई मधील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. अर्जदार महिला हि मुंबईला मधील प्रॉपर रहिवासी तर असायला हवीच सोबत त्या महिलेचे मुंबईतील मुंबै बँक मध्ये खाते असणे सुद्धा बंधनकारक आहे. कारण हि योजना मुंबै बँके अंतर्गत राबविण्यात येत असल्याकारणाने तेथील चालू खाते असेल तर त्या बँकेमार्फत पात्र करण्यात येणार किंवा तुम्हा अर्ज स्वीकारल्या जाणार आहे.

योजनेचा उद्देश काय आहे?

गरिबांना या वाढत्या महागाईमध्ये जीवन जगण्यासाठी आधार मिळेनासा झाला आहे. शासन लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलाना देते त्या सुद्धा अतिशय गरीब आहे, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत कीं त्या दारिद्र्यरेखेखालील असतील तरच देण्यात येत आहे.

अशाच महिलांचा सर्वांगीण विकासासोबत आर्थिक विकास होणे सुद्धा अतिशय गरजेचे वाटत असल्या कारणाने रोजगार निर्मिती करण्यासाठी मुंबै बँके मार्फत शासन हि योजना राबवत आहे.

योजनेचे होणारे फायदे कोणते?

पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा असा कि लाडक्या बहिणींना 0% व्याजदराने 1 रुपयाचे कर्ज उद्योगासाठी मिळणार आहे. मुंबईमधील लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे होते शक्य होईल. मुंबई मध्ये परप्रांतीय येईन व्यवसाय सुरु करतात मात्र आपल्या राज्यातील महिला ह्या आर्थिक कारणामु ळे स्वतःचा कुठला व्यवसाय सुरु करू शकत नव्हत्या, ते सुद्धा आता शक्य होईल आणि महिला ह्या आत्मनिर्भर बनतील. तसेच राज्यातील बेरोजगार महिलांना रोजगार मिळण्यास मदत होईल रोजगाराच्या वेगळ्या वेगळ्या संध्या लाडक्या बहिणीचं स्वतः उपलब्ध करतील. ज्यामुळे लाभार्थी महिलांचे जीवनमान तर सुधारेलाच सोबत त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आर्थिक स्थैर्य लाभेल.

लाडकी बहीण कर्ज योजनेचा अर्ज कसा करायचा?

तुम्ही मुंबईचे रहिवासी आहेत आणि तुम्हाला मुंबईमध्येच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी Ladki Bahin Karj Yojana साठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हला तेथील मुंबै बँकेत जाऊन भेट द्यावी लागणार आहे. कारण अद्यापही या बँकेकडून अर्ज करण्यासाठीची कुठलीही अधिकृत साइट सुरु केली नसल्याने योजनेही अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने बँकेतील संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊनच भरायचा आहे. तसेच अर्ज भारत असताना तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असल्याचे स्वयंघोषांपात्र किंवा अन्य पुरावा सुद्धा जोडायचा आहे.

निष्कर्ष

मुंबई च्या रहिवासी असलेल्या लाडक्या बहिणींना स्वयं रोजगार निर्मिती अतिशय उत्तम संधी म्हणून या कर्ज योजनेकडे बघणे काही वावगे ठरणार नाही. कारण एक लाखाची रक्कम हि फार मोठी आहे, तेसुद्धा बिनव्याजी मिळत असल्याने सोनेपे सुहागा हा लाडक्या बहिणींनाच होणार आहे. त्यामुळे मुंबई मधील महिलांना ह्या योजनेचा लाभ घेऊन उद्योग किंवा व्यापार सुरु करण्याचा नाकी विचार करावा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *