Mukyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra: इयता पाचवी पासून ते इयता बारावी पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. ती म्हणजे जुलै 2025 मध्ये शासनाने आपल्या राज्यात Mukyamantri Bal Ashirwad Yojana राबविण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो, हि योजना मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र व्यतिरिक्त बिहार, उत्तरप्रदेश, हरयाणा आणि राजस्थान सारख्या अन्य राज्यांमध्ये राबविली जात होती.
मात्र आत्ता या वर्षीपासून योजनेचा लाभ आपल्या राज्यातील मुलांना सुद्धा मिळणार असल्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. या योजनेचे अर्ज हे सध्या सुरु झाले अजून त्याच संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
Mukyamantri Bal Ashirwad Yojana Maharashtra 2025: मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती
एकच पालक असेल किंवा दोन्ही पालक नसेल तर अश्या मुलांना Mukhyamntri Bal Ashirwad Yojana Maharashtra अंतर्गत आता महाराष्ट्र शासन सुद्धा प्रति माह 4,000 रुपये महिना मानधन देणार आहे. तुमच्या गावात किंवा परिसरात तुमच्या मित्राचे किंवा नातेवाईकांचे आई आणि बाबा या दोघांपैकी एकाच मृत्यू किंवा दोघांचाही मृत्यू 2020 मध्ये वा त्याच्या नंतर झाला असेल तर त्याला या योजनेचा लाभ देऊन शासन आर्थिक मदत करणार आहे. एक कुटुंबातील पालकणांच्या फक्त दोन मुलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकणार आहे.
योजनेचे उद्देश
मित्रांनो, दिवसेंदिवस महागाई अधिकच वाढत आहे ज्यामुळे गरीब नागरिकांना चांगले जीवन जगतांना आणि मुलं बाळांचे शिक्षण पूर्ण करतांनाच नाकी नऊ आल्यागत होते. अश्यातच ज्या मुलांना पालक नसतात किंवा आई बडिलांपैकी एकच हयात असते त्यांना मात्र अधिक संघर्ष करावा लागतो. अश्या कुटुंबातील दोन पाल्यांना चांगले सामाजिक जीवन जगण्यास आणि शिक्षण घेण्यास आर्थिक मदत करणे हेच या योजनेचे उद्देश असल्याचे स्पष्ट होते.
योजनेचे पात्रता निकष
योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील अनाथ किंवा एकच पालक असलेल्या मुलांना दिला जाणार आहे. योजनेचा अर्ज हा दहा ते अठरा याच वयोगटामध्ये बसणारी मुलं करू शकतात. त्याचप्रकारे ज्या मुलांच्या पालकांचा मृत्यू हा 2020 च्या पूर्वी झाला असेल त्यांना मात्र योजनेमध्ये अपात्र करण्यात येईल.
योजनेचा अर्ज शिक्षण घेत असलेल्या मुलांचाच स्वीकारण्यात येणार आहे. अर्जदाराला जर एकाच पालक असेल तर त्याचे वार्षिक उत्पादन हे 72,000 पेक्षा अधिक असू नये. अर्जामध्ये खरी माहिती असेल तरच Mukhyamantri Bal Ashirwad Yojana करीत पात्र करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
- पालकाचे आधार कार्ड (आई किंवा वडील हयात असल्यास)
- मुलाचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- आई किंवा वडील असल्यास त्यांच्या सोबत जॉईन्ड पासबुक
- शाळेचे ओळखपत्र/बोनाफाईड
- वडिलांचे किंवा आईचे मुत्युपत्र
- उत्पन्नाचा दाखला
योजनेसाठी अर्ज कुठे करावा?
महाराष्ट्र मध्ये हि एक नवीन योजना आहे, त्यामुळे अजून पर्यंत ऑनलाईन अर्ज पद्धती सुरु केली नाही. मात्र ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन योनेचेचा फॉर्म घ्यावा लागेल. त्या फॉर्म मध्ये सर्व खरी माहिती बहरून त्याला कागदपत्रे जोडून जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जिल्हा बाळ संरक्षण युनिट मध्ये जाऊन अर्ज सबमिट करावा लागेल. तसेच मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी अर्ज हा जिल्हा परिवीक्षा अधिकाऱ्याकडे सुद्धा सबमिट करू शकणार आहेत.
अर्ज करत असतांना कुठलीही अडचण येत असेल किंवा काही मदत हवी असेल तर शासनाने विद्यार्थ्यांसाठी 9615155005 हा मोबाईल नंबर संपर्क साधण्यासाठी दिला आहे.
निष्कर्ष
अनाथ किंवा एकच पालक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना अणेकी समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी एक समस्या जी कि सर्वात मोठी आहे ती म्हणजे आर्थिक समस्या त्यावर अतिशय चांगला उपाय हा शासनाने दिला आहे. आपण जी माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे ती संपूर्ण माहिती जीआर ला अनुसरून दिली आहे, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More