Bandhkam Kamgar Pension Yojana: महाराष्ट्र शासनाणे इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून 19 जून 2025 ला एक नवीन जीआर काढण्यात आला. त्या जीआर मध्ये बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याबाबत नवीन योजना राबवण्याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शासनाने त्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांना अधिनियम 1996 अंतर्गत कलम (22- ब) नुसार कामगारांचे वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन कार्यपध्दती राबवण्यास मान्यता दिली आहे.सुद्धा तुम्ही सुद्धा बांधकाम कामगार आहेत तर हि योजना खास तुमच्यासाठीच आहे. या पेन्शन योजनेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे बघा.
Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra 2025: बांधकाम कामगार पेन्शन योजना महाराष्ट्र
बांधकाम कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकार कामगार मंडळांतर्गत राबवत आहे. कामगारांना आर्थिक आणि सामाजिक प्रबळ बनवण्याचा हा शासनाच प्रयत्न आहे. कारण शासनाच्या प्रत्येक विकास कामात मंग ते इमारत बांधणी असो किंवा रस्ते बांधकाम असो, यामध्ये सर्वात मोलाचे अणे मोठे योगदान त्यांचेच राहते. अशावेडेला सरकारी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बांधकाम कामगार मात्र त्यांचे गाव, घर, दार सोडून येत असतात.
त्यांच्या याच संघर्षांला लक्षात घेऊन आणि जाणीव ठेऊन शासन अनेको योजना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या उधारासाठी राबवतात. त्याचप्रमाणे आता जर का बांधकाम कामगार निवृत्त जरी झाला तर त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने Bandhkam Kamgar Pension Yojana राबवण्याचच निर्णय घेतला आहे. अर्थात आपण समजू शकता कि म्हतारपणी सुद्धा शासहन कामगारांना वाऱ्यावर न सोडता 12 हजार रुपये पेन्शन दार वर्षी देणार आहे.
बांधकाम कामगार पेन्शन योजनेचे उद्देश
ज्या बांधकाम कामगारांनी आपल्या आयुष्याचे किमान दहा वर्ष तरी बांधकाम कामगार म्हणून काम केले असेल, त्यांना सेवा संपल्यानंतर स्वावलंबी जीवन जगण्यासाठी एक हजार रुपये महिना देऊन बाकीचे जीवन जगण्यास आर्थिक साहाय्य करणे हे योजनेमागील उद्देश आहे.
बांधकाम कामगार पेन्शन योजनेचे लाभाचे स्वरूप
मित्रांनो बांधकाम कामगारांना त्यांनी कामगार म्हणून केलेल्या कामाच्या कालावधीनुसार पेन्शन दिले जाणार आहे. जर कामगाराने 10 बांधकाम कामगार म्हणून काम केले असेल तर त्याला 6000 रुपये पेन्शन प्रति वर्ष दिले जाईल. त्याचप्रमाणे जर का 15 वर्ष केले असेल तर 9000 रुपये आणि 20 वर्ष केले असेल तर 12000 हजार रुपयाची पेन्शन हि लाभार्थ्याला मिळणार आहे.जे कि महाडीबीटी मार्फत डायरेक्ट बांधकाम कामगारांच्या खात्यात वर्ग केले जाईल.
बांधकाम कामगार पेन्शन योजनेचे पात्रता निकष
ज्या बांधकाम कामगाराने किमान 10 जरा बांधकाम कामगार म्हणून काम केले असेल आणि त्याचे वय 60 वर्ष पूर्ण झाली असेल तर त्याला या योजनेयाच्या लाभास पात्र करण्यात येईल. जर एक घरातील पती आणि पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील आणि त्यांनी दोघांनी हि दहा वर्षे काम केले असेल तर, त्यांना दोघांनांनी स्वतंत्र पेन्शन दिले जाईल.
जर पती किंवा पत्नी मधील एकाच मृत्यू झाला असेल तर पत्नी किंवा पती ला योनेच लाभ दिला जाईल. परंतु जर आधीच पती किंवा पत्नी लाभ घेत असेल तर मृत पती पत्नीचे पेन्शन दिले जाणार नाही. जर अर्जदार हा केंद्र सरकारच्या राज्य विमा कायदा 1848, कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी आणि इतर तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ गेट असतील तर मागतर त्यांना या योजनेमार्फत पेन्शन दिली जाणार नाही.
बांधकाम कामगार पेन्शन योजनेची कागदपत्रे
- आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- बँक खातेबुक
- निवृत्ती वेतन शिफारस पत्र
- वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र
- निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट फोटो
कामगार पेन्शन योजनांसाठी असा करा अर्ज
सर्वप्रथम तुमच्या परिसरातील सेतू मध्ये जाऊन किंवा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडलाच्या विभागात जाऊन Bandhkam Kamgar Pension Yojana चा अर्ज मिळवायचा आहे. अर्जामध्ये तुमची संपूर्ण माहिती टाका आणि तुमच्या कामाचा अनुभवाची माहिती टाकायची आहे. त्यानंतर शिफारस पत्र आणि निवृत्ती वेतन क्रमांक प्रमपत्रामध्ये सुद्धा तुमच्या विषयी थोडी माहिती भरा. सर्व झाल्यावर अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोड आणि बांधकाम कामगार सुविधा केंद्रवर्ती जाऊन सबमिट करा. जर तुम्ही पेन्शन मिळवण्यास पात्र झालात तर तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत तुमच्या पात्रतेनुसार पेन्शन दिली जाणार आहे.
निष्कर्ष
कामगारांना कामावर रुजू असतांना अनेक योजना तर आहेतच परंतु निवृत्ती नानंतरसुद्धा कामगारांना योग्य योजना राबवून त्यांच्या योग्यतेनुसार पेन्शन देणे हे सुद्धा महाराष्ट्र शासनाचं मोठं धाडसी पाऊल मानायला काही हरकत नाही.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More