Bandhkam Kamgar Gharkul Yojana। बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी मिळणार 2.50 लाख रुपये, लवकर करा अर्ज.

Bandhkam Kamgar Gharkul Yojana Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Gharkul Yojana 2025: पक्के छत असणे हे मूलभूत हक्कांमधील एक भाग आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला पक्के छत आणि घर असावे, यासाठी राज्यशासन आणि केंद्रशासन सुद्धा घरकुल अभियान राबवत आहेत.

त्यातच समाजातील दुर्बल घटक समजल्या जाणार्यांपैकी एक बांधकाम कामगार सुद्धा आहे, त्यांना सुद्धा विकासाचा भाग बनवण्यासाठी आणि त्यांच्या उज्वल वर्तमान व भविष्यासाठी राज्यशासनाने Bandhkam Kamgar Gharkul Yojana सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत घरकुल कसे मिळवता येईल याची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये आपणाला मिळणार आहे.

Bandhkam Kamgar Gharkul Yojana Maharashtra: अटल बांधकाम कामगार घरकुल योजना

मित्रांनो, दरवर्षी सरकार हे दरवर्षी वेगळ्या- वेगळ्या आवस योजना राबवत असत. ज्यांच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालील आणि गरजू नागरिकांनाच स्वतःचे घर बांधण्यासाठी या योजनांचा लाभ दिला जातो. मात्र बांधकाम कामगार हे जिथे काम तिथेच वास्तव्य करत असतात, त्यामुळे अशा योजना येतात आणि निघूनही जातात. परंतु बांधकाम कामगाराला मात्र ना अर्ज भरण्यासाठी वेळ मदत नाही त्यांच्या पर्यंत हि माहिती पोहोचत.

दर वर्षी शासहन वीस लाख घरकुल मंजूर करत असत परंतु त्या आवास योजनेमध्ये बांधकाम कामगार बहुतांश वेळा नसतातच. यामुळेच राज्यशासनाने फक्त बांधकाम कामगारांकरताच Bandhkam Kamgar Gharkul Yojana राबवण्यास सुरुवात केली आहे. कारण चांगला निवारा हा सर्वच हक्क असल्या कारणाने ते मिळण्याचा अधिक हा कामगारांना असतो. बांधकाम कामगार जर ग्रामीण भागात राहत असेल तर त्याला वेगळे अनुदान तर शहरी भागात असणाऱ्या कामगाराला वेगळे अनुदान दिले जाणार आहे.

बांधकाम कामगार घरकुल योजनेचे उद्देश

एकंदरीत विचार केला तर विकसनशील समाजामध्ये बांधकाम कामगारांचे अस्तित्व निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे उद्देश आहे.

बांधकाम कामगार घरकुलाच्या लाभाचे स्वरूप

ग्रामीण भागातील अर्जदाराला स्वतःचे घर बांधण्यासाठी 1.50 लाख रुपयाचे अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याचप्रकारे अर्जदार हा नगरपरिषद क्षेत्रातील रहिवासी असेल तर त्याला 2 लाख रुपये आणि जर अर्जदार हा महानगरपालिक किंवा मुंबई शहरातील रहिवासी असेल तर त्यास 2.50 लाखाची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत मिळणार आहे.

बांधकाम कामगार घरकुल योजनेचे पात्रता निकष

बांधकाम कामगार 18-60 वयोगटातील असेल तरच त्याला घरकुलाचा लाभ दिला जाईल. अर्जदार हा मागील 15 वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव करत असावा. कामगाराने किमान तीन वर्षाआधी कामगार म्हणून नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे आणि मागील वर्षात नव्वद दिवस कामावर हजर असणे सुद्धा बंधनकारक राहणार आहे.

घरकुल योजनेच्या अटी व शर्ती

अर्जदार कामगार हा महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असावा, बाहेरील राज्यातील कामगार योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. अर्जदार हा ऍक्टिव्ह नोंदणीकृत असायला हवा आणि त्याने यापूर्वी कुठल्याही शासकीय आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराकडे पक्के घर असेल तर त्याला लाभ दिला जाणार नाही.

घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • कामगार आयडी कार्ड
  • रहिवासी दाखला
  • 90 दिवसाच्या कामाचे प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • कामाचे ठिकाण प्रमाणपत्र
  • नोंदणी प्रमाणपत्र
  • चार पासपोर्ट
  • बँक पासबुक
  • जन्माचा दाखला
  • ठेकेदारांचा कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेचे कामगार प्रमाणपत्र
  • स्वयंघोषणापत्र

बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी असा करा अर्ज

Bandhkam Kamgar Gharkul Yojana चा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुम्ही सर्व पात्रता निकषांमध्ये बसणार असाल तर सर्वप्रथम कुठल्याही सेतूमधून योजनेचा अर्ज घायचा आहे. त्यामध्ये संपूर्ण आवश्यक माहिती भरून त्याच्यासोबत बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी सांगण्यात आलेले कागदपत्र सुद्धा जोडायचे आहेत. नंतर जिल्याच्या ठिकाणी जाऊन सुविधा केंद्रावर हा अर्ज सबमिट करून घरकुल योजनेचा लाभ मिळवता येईल.

निष्कर्ष

पक्के घराचे स्वप्न हे इतरांपरामाने बांधकाम कामगारांचे सुद्धा असतेच. हे स्वप्न अजून सोपी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार घरकुल योजना सुरु केलेली आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी कुठलीही फी किंवा पैसे कोणालाही न देता लाभ मिळणार आहे, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *