Bandhkam Kamgar Bhandi Set Yojana: या योजनेला गृहपयोगी वस्तू संच योजना म्हणून बोलले जाते. हि योजना फक्त गरीब बांधकाम कामगारांसाठीच राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत राज्यभर हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमार्फत पात्र बांधकाम कामगारांना एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचा संच दररोजच्या वापरासाठी दिला जाणार आहे. या सर्व भांड्यांची किंमत कमाल 20,000 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. मित्रांनो या योजनेअंतर्गत भांड्यासोबत 5,000 रुपये सुद्धा महाराष्ट्र सरकार देणार आहेत.
Maharashtra Bandhkam Kamgar Bhandi Set Yojana काय आहे?
बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी राज्यसरकारने 17 ऑक्टोम्बर 2020 रोजी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत सुरु केली आहे. बांधकाम कामगारांना अनेक आर्थिक समस्या येत असतात त्यासाठी शासन खूपदा योजना राबवरून आर्थिक मदत सुद्धा करत.
आतापर्यंत महाराष्ट्र्राशासनाने 5 लाखाहून अधिक कामगार कुटुंबांना Bandhkam Kamgar Bhandi Set Yojana च्या माध्यमातून गृहपयोगी वस्तूंचे वाटप केलेले आहेत. योजनेचे अर्ज हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करून मोफत भांडी मिळवता येईल. बांधकाम कामगार घरकुल योजनेअंतर्गत घर मिळाल्यानंतर घरातील भांडी सुद्धा शासन नोंदणीकृत कामगारांना या योजनेमार्फत देत आहेत.
बांधकाम कामगार भांडी योजनेचे उद्देश
बांधकाम कामगारांचे उत्पन्नाचे साधन फक्त त्यांना मिळालेला कामगार म्हणून रोजगार असतो. त्यामध्ये सुद्धा त्यांना जीवन जगण्यापुरचे वेतन मिळत असते. अशातच कुटुंबाच्या सुद्धा काही गरज असतात त्या मात्र कामगार पूर्ण करू शकत नाहीत. यामुळे शासन Bandhkam Kamgar Bhandi Set Yojana सारख्या योजना राबवून ह्या गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अर्थात कामगाराच्या आणि कामगार कुटुंबाच्या गृहपयोगी वस्तू मोफत देऊन त्यांचे जीवनमान सुधरवणे हाच शासनाचा उद्देश आहे.
बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेची पात्रता
अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्रातच रहिवासी असलेला बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. तसेच त्या कामगाराची अधिकृत नोंदी केली गेलेली असावी. बांधकाम कामगारांचे वय 18 ते 60 दरम्यान असेल तरच त्यांना योजनेअंतर्गत भांडी मिळू शकणार आहेत. बांधकाम कामगार मागील वर्षांमध्ये किमान नव्वद दिवस तरी कामाच्या ठिकाणे हजार असायला हवे. कामगारांकडे नोंदणीकृत कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा आयडी कार्ड असावे. जर अर्जदाराचे वार्षिक उत्पादन एक लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला या भांडी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचे फायदे
लाभार्थ्यांना 20,000 रुप्याच्या किमतीचा गृहपयोगी भांड्यांचा संच एकदम मोफत Bandhkam Kamgar Bhandi Set Yojana मार्फत दिला जाणार आहे. त्यामुळे त्यांची फार मोठी आर्थिक आहे. बांधकाम कामगाराची आर्थिक परिस्थिती इतरांप्रमाणे नसल्यामुळे आहे त्या वस्तूंमध्ये उदरनिर्वाह करण्याचा त्यांचा स्वभावच असतो, मात्र त्यांना कुठलीही तडजोड करून उदरनिर्वाह करण्याची गरज पडणार नाही. तोच इत्तर खर्चाकडे लक्ष ना देता चांगले पालन पोषण कुटुंबातील सदस्यांचे करू शकेल. या योजनेअंतर्गत सद्य चमच्यांपासून ते कढई पर्यंत सर्वच भांडे मोफत दिली जाणार आहेत, ज्यामुळे कामगार पैशाची बचत सुद्धा करू शकेल.
बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- कामगार आयडी
- काम केल्याचे प्रमाणपत्र
- चार पासपोर्ट फोटो
मोफत भांडी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या भांड्याची सूची
- 4- ताट
- 8- वाट्या
- 4- ग्लास
- 3- झाकणासहित पातेले
- 2- मोठे चम्मच
- 1- दोन लिटरचा जग
- 1- मसाला डब्बा
- 3- झाकणासहित डब्बे
- 1- परत
- 1- कुकर
- 1- कढई
- 1- मोठी स्टीलची टाकी
मोफत भांडी योजनेचा असा करा अर्ज
बांधकाम कामगार मोफत बंदी सेट योजनेअंतर्गत 30 भांड्याचा संच मिळवण्यासाठी वरती सांगण्यात आलेले सर्व कागदपत्र तयार ठेवा. नंतर iwbms.mahabocw.in या साहसनांच्या अधिकृत साईट वर जायचे आहे. तिथे तुमची कामगार प्रोफाइल चा लॉगइन आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावा.
जर तुमचे आधी खाते नसेल तर तुमचा आधारकार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी मिळावा आणि खाते तयार करून पुन्हा लॉग इन करा. आता होम पेज ला andhkam Kamgar Bhandi Set Yojana चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरून रजिष्ट्रेशन करून घ्या. हे झाल्यावर तुमच्यापुढे योजनेसाठी अर्ज करण्याचा एक फॉर्म येईल, तो भरा सोबत कागदपत्र अपलोड करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
निष्कर्ष
तुम्ही मोफत बंदी सेट योजनेच्या निकषांमध्ये पात्र होता आणि तुमचे वार्षिक उत्पन्न सुद्धा एक लाखापेक्षा कमी असेल तर लवकरात लवकर योजनेसाठी अर्ज करून तुम्ही लाभार्थी बनू शकता. त्यासाठी तुम्हाला आज आम्ही या आर्टिकलमध्ये सांगितलेली माहहती नक्कीच उपयोगी पडेल, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More