Bandhkam Kamgar Safety Kit Yojana: मित्रांनो, बांधकाम कामगाराचे जीवन हे नेहमी धोक्यनेच भरलेले असते. परंतु हा धोका कमी करण्यासाठी सुरक्षेच्या हेतून सर्वात महत्वाच्या योजनांपैकी एक बांधकाम कामगार सेफ्टी किट योजनेला सुद्धा समजले जाते. कारण कामगाराची सुरक्षा हि सर्वात महत्वाची आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगाराचे काम हे नेहमीच जीव धोक्यात टाकून करावे लागते. त्यामुळे केव्हा कोणती अनुचित घटना घडेल याची गॅरंटी नसते. सरकारी कामगार काम करत असणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी हि शासनाची आहे. याच जबाबदारीची जाणीव ठेऊन आणि लक्षात घेऊन कामगारांसाठी Safety Kit Yojana राबवण्यास सुरुवात केली आहे, ज्याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे बघुयात.
Maharashtra Bandhkam Kamgar Safety Kit Yojana काय आहे?
कामगारांना कामाच्या ठिकाणे अनेक प्राणघातक धोके असतात, हि योजना सुरु होण्यापूर्वी हजारो बांधकाम कामगाराचा जीव सुद्धा गेला आहे. ज्यामुळे त्यांच्या परिवारातील एक कमावता व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या परीवाला फार मोठी किंमत मोजावी लागली. यामुळे शासन बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना, घरकुल योजनेसारख्या योजना रुजू असलेल्या बांधकाम कामगाराच्या परिवासाठी राबवते.
याचप्रमाणे कामगाराला कुठलीही दुखापतहोऊ नये, यासाठी 2017 पासून Bandhkam Kamgar Safety Kit Yojana सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना अंगावर वापरण्यासाठी एक सुरक्षा वस्तूची एक पेटीचा दिली जाते. ज्यामुळे कुठली छोटी मोठी आपत्ती जरी आली, तरी कामगाराला जीवाची हानी या किट मुले टळते. त्या Safety Kit ची यादी तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकता.
बांधकाम कामगार सेफ्टी किट योजनेचे उद्देश
बांधकाम कामगार जेव्हा कामावर हजर असतो तेव्हा त्यांची सुरक्षा हि शासनाचे कर्तव्य आणि जबाबदारी असते. ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी कामगाराला सुरक्षा किट चे वाटप केले जाते. ज्या किट मुळे कामावरील कामगाराला दुखापत होणार नाही आणि ते अपघातांदून वाचतील. एकंदरीत कामगाराची सुरक्षितात हाच या योजनेचा स्पष्ट उद्देश आहे.
बांधकाम कामगार सेफ्टी किट लिस्ट
- सेफ्टी हेल्मेट
- सेफ्टी बूट
- सेफ्टी गॉगल
- डस्ट मास्क
- इअरप्लग
- ग्लव्हज
- रिफ्लेक्टिव्ह वेस्ट
- सेफ्टी हार्नेस
- फर्स्ट-एड कीट
- ट्रॅव्हल किट बॅग
- सोलर टॉर्च
- पाणी बॉटल
- स्टील टिफिन डब्बा
बांधकाम कामगार सेफ्टी किटचे काही फायदे
पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे अगदी मोफत बांधकाम कामगारांना हि सुरक्षा किट दिली जाणार आहे. या किटमुळे कामगारांना कामाच्या ठिकाणी कुठलीही मोठी दुखापत होणार नाही. ज्यामुळे कामगार व्यवस्थित काम करू शकतील. ज छोटी काही दुखापत झाली तर किट मधील औषधानंच वापर करून ते प्रथोमचार सुद्धा तिथेच करू शकतील. किट असल्यामुळे कामगारांचे कुटुंब सुद्धा निष्काळजी राहतील.
बांधकाम कामगार सेफ्टी किट योजनेची पात्रता
सेफ्टी किट साठी अर्ज करणारा एक नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा. त्याचे वय अठरापेक्षा जास्त आणि साथ पेक्षा कमी असेल तरच त्याला सेफ्टी किट योजनेचं लाभ दिला जाईल. त्याचप्रमाणे अर्जदार हा मागील पंधरवर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे सुद्धा आवश्यक आहे. मागील वर्षांमध्ये तो कमाल नव्वद दिवस कामावर हजार असावा तसेच त्याने केलेली कामगार म्हणून नोंदणी सुद्धा ऍक्टिव्ह असेल तेव्हाच त्याला मोफत सेफ्टी किटचे वाटप केले जाईल.
बांधकाम कामगार सेफ्टी किट योजनेसाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- नोंदणी प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- कामाचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- ई- मेल आयडी
- मोबाईल नंबर
- सध्या काम करत असलेल्या कामाचे ठिकाण
- चार पासपोर्ट फोटो
- जन्माचा दाखला
- बँकेचे खातेबुक
- ग्रामपंचायतचे कामगार असल्याचा दाखला
- स्वयंघोषणापत्र
असा करा सेफ्टी किट साठी अर्ज
तुमच्या परिसरातील किंवा गावातील एखाद्या सेतूमधून Bandhkam Kamgar Safety Kit Yojana चा फॉर्म घ्या. त्या फॉर्म मध्ये तुमच्या विषयी सर्व माहिती तंतोतंत भरा. सेफ्टी किट योजनेचा फॉर्म ला सर्व कागदपत्र जोडून ते सर्व तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सुविधा केंद्रामध्ये सबमिट करा.
तेथे तुमच्या अर्जाची सविस्तर तपासणी करून तुम्ही सेफ्टी किट साठी पात्र आहेत कि नाही हे ठरवले जाईल. नंतर तुमचे सर्व पेटी मध्ये आलेले वस्तूची तपासणी करून सुविधा केंद्रामध्येच या वास्तूचे वाटप तुम्हाला केले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणालाही एक रुपया न देता सेफ्टी किटचा लाभ मिळणार.
निष्कर्ष
जीवन जगत असतांना सर्वात जास्त संपूर्ण बॉडी महत्वाची आहे. कामगारांना मात्र संपूर्ण बॉडी धोक्यामध्ये झोकून काम काम करणे अनिवार्यच असते, तेव्हाच त्यांचे घर चालते. परंतु कामगाराला कोणतीही इजा होऊ नये आणि झालेल्या घटनेपासून वाचण्याकरिता मदत योजनेअंतर्गत मिळणारी सेफ्टी किट करते. त्यामुळे तुम्ही अजून सुद्धा सेफ्टी किट साठी अर्ज केला नसेल तर लवकर करा, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More