Bandhkam Kamgar Vivah Yojana: कामगारांना लग्नासाठी मिळणार 30 हजार, तर मुलींच्या लग्नासाठी मिळणार 51 हजाराची मदत.

Bandhkam Kamgar Vivah Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Vivah Yojana: बांधकाम कामगारांसाठी शासनाने खास विवाह योजना काढून कामगारांचा या लग्नासाठी होणारा खर्च अनुदान देऊन कमी केला आहे.

जर बांधकाम कामगार स्वतः लग्न करत असेल तर त्यासाठी त्याला विवाह अनुदान योजनेअंतर्गत 30 हजार रुपये अनुदान मदत दिली जाते. तेच जर एखाद्या बांधकाम कामगाराच्या मुलीचे लग्न असेल तर त्यासाठी 51 हजाराची आर्थिक मदत हि मुलीच्या पालकाला केली जाते. परंतु या विवाह योजनेची माहिती बऱ्याच कामगारांना माहित नसल्यामुळे ते या योजनेच्या लाभापासून वंचितच राहतात.

Bandhkam Kamgar Vivah Yojana काय आहे?

मित्रांनो, बांधकाम कामगार हे चांगले सुशिकसित नसतात, त्यामुळे त्यांचा आजही समाजातील चाली रीतीवर विश्वास हा असतोच. म्हणून बरेचशे लोक आजही मुलीला पराया धन असे समाजात. अनेक कुटुंबांना तर मुलगी नकोशीच असते, कारण ते मुलींना ओझे समजता. हाच गैरसमज संपुष्टात यावा आणि मुलींना सुद्धा मुलांप्रमाणे स्थान मिळावा यासाठी शासन Bandhkam Kamgar Vivah Yojana सारख्या योजना राबवून प्रयत्नशील आहे. तसेच गरीब बांधकाम कामगाच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी होण्यासाठी कामगारांना लागणासाठी 30 हजार रुपयाचे आणि मुलीचे लग्न असेल तर 51 हजाराचे 100% अनुदान स्वरूपात देत आहेत.

बांधकाम कामगार विवाह योजनेचे उद्देश

बांधकाम कामगारांना स्वतःच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे, ज्यामुळे कामगाराच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोक्यावरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत लग्नासाठी आर्थिक मदत करणे, एवढेच नाही तर शिक्षण घेण्यासाठी सुद्धा शासन बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना राबवते. या मुळे मुलीच्या आईवडिलांना मुली ओझं नसून चांगले भविष्य आहे याची जाणीव करून दिली जाते.

बांधकाम कामगार विवाह योजनेचे फायदे

बांधकाम कामगार विवाह योजनेमार्फत लग्नाळू कामगाराला 30 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्याचा उपयोग त्यांना यांच्या लग्नाच्या व्यवस्थापनाकर्ता करता येईल. त्याचप्रमाणे एखाद्या कामगाराला मुलीचे लग्न करायचे झाल्यास त्याला सुद्धा पैशाची काळजी करायची गरजच भासणार नाही किंवा कोणाकडून कर्ज काढायची सुद्धा गरजच पडणार नाही.

पात्र कामगाराला मिळालेल्या लाभाची जी रक्कम असेल ते त्याच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येईल. कामगाराला लग्नासाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाही. मुलीला ओझं समजणारे आई वडील मुलीला चांगली वागणूक देतील आणि मुलीकडे समाजाचा बघण्याचं दृष्टिकोन बदलेल. मिळालेल्या रकमेचा एकही रुपया परत करण्याची आवश्यकता नसेल, कारण बांधकाम कामगार विवाह योजनांमार्फत संपूर्ण रक्कम हि 100% अनुदानित असेल.

बांधकाम कामगार विवाह योजनेची पात्रता

महाराष्ट्र शासनाच्या विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा. मागील तीन वर्ष्यांमधे कामगाराने किमान 180 दिवस काम केलेलं असावे. या योजनेचा लाभ एक कुटुंबातील एकच कामगार घेऊ शकेल, तसेच एक कुटुंबातील एकाच मुलीला योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल. जर मुलीचा विवाह झाला असल्यास त्याचे नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक राहील. अर्जदाराच्या नोंदणी आयडी मध्ये मुलीचे नाव असेल तरच लाभ दिला जाईल. तसेच ज्या मुलीच्या लग्नाकरिता अनुदानासाठी अर्ज करण्यात येत आहे त्या मुलीचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच त्यामुलीचे किमान शिक्षण दहावी तरी पूर्ण असावे.

विवाह योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • विवाह प्रमाणपत्र/ लग्नपत्रिका
  • कामगार आयडी मध्ये मुलीचे नाव असल्याचा पुरावा
  • मुलीचा जन्माचा दाखल/ टी.सी
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • संध्या काम सुरु असलेल्या कामाचे ठिकाण
  • तीन पासपोर्ट फोटो
  • बँकेचे खातेबुक
  • कामगाराचा जन्माचा दाखला
  • स्वयंघोषणापत्र
  • कामगार आयडी
  • नोंदणीचा अर्ज

बांधकाम कामगार विवाह अनुदानासाठी असा करा कर्ज

अधिकृत साइट mahabocw.in वर जाऊन Bandhkam Kamgar Vivah Yojana चा अर्ज प्राप्त करावा लागेल. त्या अर्जाची प्रिंट काढून त्यामध्ये विचारण्यात येणारी कामगाराची आणि मुलीची सविस्तर माहिती भरा. नंतर त्या अर्जासोबत विवाह अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्र जोडा आणि तुमच्या क्षेत्रातील सुविधा केंद्रामध्ये जाऊन ते सर्व सबमिट करा. जर तुम्ही पात्र कामगार असाल तर तुमच्या बँक खात्यात 30 हजार जमा केले जाईल. तसेच तुमच्या मुलीच्या लग्नासाठी अर्ज केला असेल तर त्यास्तही 51 हजार सुद्धा डायरेक्ट बँकेत जमा केले जातील.

निष्कर्ष

बऱ्याचशा बांधकाम कामगारांना या विवाह योजनेविषयी माहिती नाही आहे. त्यामुळेच आज आपण या योजेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. बांधकाम कामगार आहेत आणि स्वतःच्या किंवा तुमच्या मुलीच्या लग्नासाठी अनुदान स्वरूपाची रक्कम मिळवायची असेल तर महाराष्ट्र शासनाची हि योजना अतिशय उत्तम पर्याय आहे, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *