Lek Ladki Yojana In Marathi: 1 लाख 1 हजाराची मदत मुलीच्या शिक्षणासाठी शासन देत आहे, बघा संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana 2025 Maharashtra
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Lek Ladki Yojana 2025: मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी टप्या टप्प्याने 1 लाख 1 हजाराची आर्थिक मदत या लेक लाडकी योजनेमार्फत दिली जात आहे. राज्यतील मुलींना सशक्त बनवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी हि योजना अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

मित्रांनो, हि योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आली असून त्यापूर्वी या योजनेला माझी कन्या भाग्यश्री म्हणून राबवल्या गेले होते. बहुतांश नागरिकांना अजूनही माहित नाही, कि माझी कन्या भाग्यश्री योजना बंद करून महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये बदल करून त्या योजनेच्या जागेवर लेक लाडकी योजना अमलात आणली आहे.

Also Read: Janani Suraksha Yojana Maharashtra: गर्भवती महिलांना मिळणार 12,600 रुपये, बघा जननी सुरक्षा योजनेचे संपूर्ण माहिती

Lek Ladki Yojana 2025 संपूर्ण माहिती व उद्देश

मुलींना जन्मदर हा दिवसेंदिवस कमी होऊन मृत्युदर वेगाने वाढत चालला आहे. आपल्या राज्यासह देशामध्ये सुद्धा अजूनही अंधश्रद्धा आणि जुन्या चाली रीती पाळल्या जातात, ज्यांची मोठी किंमत हि मुलींना मोजावी लागते. ह्या सर्व गोष्टींपासून मुलींना सुरक्षित करण्यासाठी राज्यसरकार महिला व बालविकास विभागाअंतर्गत Lek Ladki Yojana 2023 पासून राबवते. मुलींचा कमी झालेला जन्मदर वाढवणे आणि मुलींना पुढे जाण्यास मदत करणे.

तसेच मुलींना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करून प्रोत्साहित करणे. मुलींचे होणारे बालविवाह थांबवणे आणि मृत्युदर कमी करणे. मुलींचे सामाजिक जीवनमान सुधरवने तसेच मुलींचे कुपोषणाचे प्रमाण संपुष्टात आणणे. ज्या मुलींनी शाळा सोडल्या त्यांना शाळा शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी मदत करणे व मुलींच्या अशिक्षिततेचे प्रमाण शून्यावर आणणे. इत्यादी उद्देश महाराष्ट्र शासनाचे लेक लाडकी योजना राबवण्यामागील आहेत.

लेक लाडकी योजनेचे फायदे

लेक लाडकी योजनांच्या माध्यमातून पात्र मुलींना मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप हे खालीलप्रमाणे असेल.

1) मुलीच्या जन्मानंतर 5,000
2) इयत्ता पहिलीमध्ये 6,000
3) इयत्ता सहावीमध्ये 7,000
4) इयत्ता अकरावीमध्ये 8,000
5) 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000

लेक लाडकी योजनेचे पात्रता निकष

हि योजना फक्त महाराष्ट्रातीलच मुलींकरता सुरु करण्यात आली असून योजनेसाठी बाहेरील राज्यातील मुली पात्र राहणार नाहीत. ज्या मुलींचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतर झाला असेल त्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच मुलीचे कुटुंब दारिद्र्यरेषेखालील आणि पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असायला हवेत.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मुलीचा जन्माचा दाखला
  • आई- वडिलांचे पासपोर्ट फोटो
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • बँकेचे खातेबुक

असा करा योजनेचा अर्ज

मित्रांनो, लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. या योजनेचा अर्ज जर ऑफलाईन पद्धतीने करायचा झाला तर तुमच्या परिसरातील अंगणवाडी शाळेमध्ये भेट द्या. तेथील कर्मचाऱ्यांकडून लेक लाडकी योजनांचा अर्ज घ्या आणि त्यामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती अचूक भरा. अर्जासोबत वरती जे कागदपत्रे सांगितले आहेत ते सुद्धा जोडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे तो अर्ज सबमिट करा.

निष्कर्ष

मित्रांनो आपण लहानपापासून ” मुलगी शिकली, प्रगती झाली” हा सुविचार नक्कीच वाचत असणार, परंतु खर्च आपण मुलींना हवे तसे शिक्षण देतो का? कारण आपल्या समाजाने मुलींसाठी आणि मुलांसाठी वेगळे वेगळे नियमच बनून ठेवले आहे. आत्ता मात्र ते सर्व नियम तोडण्याची वेळ आली आहे, जे शक्य शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून होऊ शकेल. तुमच्या परिसरात सुद्धा कोणाला मुलगी झाली असेल तर हि माहिती आणि हि योजना नक्की त्यांच्या पर्यंत पोहोचावा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *