7/12 Utara In Marathi Online: शेतकरी बांधवांनो आपल्या देशात सध्या डिजिटल क्रांतीचे युग सुरु आहे. या युगात सध्यातरी सर्वच गोष्टी ह्या आपन आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या बसल्या करू शकणार आहोत.
शेतीच्या कामात व्यस्थ शेतकऱ्याला अर्जंट Digital 7/12 Utara ची गरज पडली, तर तो शेतामधूनच ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट वरून ते एकदम सोप्या पद्धतीनं 7/12 Utara काढता येतो. त्यासाठी न तहसील मध्ये जाण्याची गरज पडेल नाही कुठल्या सेतू मध्ये. 7/12 Utara In Marathi Online अगदी तुम्ही तुमच्या मोबाईल वर 2 मिनिटात काढू शकणार आहात. ते कशापद्धतीने काढायचा तर बघूया सविस्तर माहिती.
Digital 7/12 Utara In Marathi Online काढण्याची सोपी पद्धत
मित्रांनो, गुगल वरती जाऊन 7/12 हे सर्च करा. नंतर तुमच्या समोर राज्यसरकारची अधिकृत वेबसाईट digitalsatbara.mahabhumi.gov.in येईल, त्यावर क्लिक करा. तुमच्या पुढ़े digitalsatbara.mahabhumi.gov.in या साइट चे होम पेज ओपन हॊईल. तुम्ही जर नेहमी लॉग इन करत असाल किंवा आधीच तुमचे रजिष्ट्रेशन केलेले असले तर तुम्ही तिथे लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करू शकता.
जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही तुमचा आधरसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून त्यावर ओटीपी पाठवून 7/12 Utara काढण्याची प्रक्रिया पूर्णकरू शकता.
तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीत पाठवण्यात येईल तो खालील रिकाम्या बॉक्स मध्ये टाका आणि व्हॅरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करा. परत एकदा नवीन डॅशबोर्ड ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही यावरून कोणते कोणते कागदपत्रे काढू शकता ते सर्व मेनू मध्ये दिसतील. याच साईट वर तुम्ही 7/12 Utara, 8-अ, eferfar, मिळकत पत्रिकेचे फेरफार एवढे शेती विषयक कागदपत्रे घरी बसल्या मोबाईल वरूनच काढता येणार आहेत.
तुम्हाला आता फक्त सातबाराचा काढायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त 15 रुपये भरून Digital Singh 7/12 Utara In Marathi Online काढता येईल. त्यासाठी Recharge Account या हिरव्या बॉक्स वेळ क्लिक करून तुम्ही इथे रिचार्ज करून घ्या. नंतर परत मुख्य डॅशबोर्ड वरती जा आणि तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडावे लागेल. मित्रान्नो तुम्हाला खाली अंकित सातबारा आणि स्वाक्षरी सातबारा असे दोन पर्याय दिसतील, त्यापैकी अंकित सातबारा या पर्यायावर क्लिक करा.
आता खाली तुम्हाला तुमच्या शेतीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकावा लागेल. ते तेथील बॉक्स मध्ये टाका आणि खालील बॉक्स मध्ये दिलेल्या यादीतून कोणता आहे ते निवडा. तुम्ही जो सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडला असेल त्यासाठीचा सातबारा कोणत्या तारखेला आणि किती वाजता स्वाक्षरी झाला आहे याची नोटिफिकेशन तुम्हाला वरती येईल, त्यावरील ओक ला क्लिक करा. त्यानंतर उजव्या साईटच्या खालील निळ्या सेव पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचा डिजिटल सांबार्याचा PDF काढू शकता.
निष्कर्ष
पूर्वी 7/12 Utara आणि 8-अ हेच कागदपत्रे काढण्यासाठी तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय आणि सेतू च्या चकरा टाकाव्या लागत होत्या. ज्यामध्ये शेतकऱ्याचा वेळ तर जातच होता सोबतच जाण्यायेण्याचा पैसा सुद्धा लागत होता. एवढेच नाही तर संबंधित अधिकारी मागतील तेवढे पैसे सुद्धा द्यावे लागत होते. मात्र आता शेतकऱ्यांना ह्या सर्व समस्यांपासून कायमची मुक्तता मिळाली आहे. Digital 7/12 Utara In Marathi Online कश्या पद्धतीने काढायचा याची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईल वरून कश्या पद्धतीने करू शकता ते सर्व आपण या आर्टिकल मध्ये बघितली आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More