Ladki Bahin Yojana July Update: पात्र बहिणींना मिळणार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये?

Ladki Bahin Yojana July Update
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ladki Bahin Yojana July Update: आता पर्यंत लाडकी बहीण योजनेमार्फत 12 हप्त्यांचा लाभ दिला गेला आहे. मात्र मागील जून महिन्याच्या हप्त्यापासून पात्रता निकष अजून कठोर करून लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे अशी माहिती सुद्धा मिळते आहे. ज्यामुळे अनेक महिला ह्या राज्यातील महायुतीच्या सरकारवर नाराज झाल्या आहेत.

त्यातच रक्षाबंधनाचं सन आला आहे, त्याआधीच जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा केला जाणार अशी घोषणा सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केली होती. तर अनेक सोशल मीडिया मार्फ़त रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे मिळणार असल्याच्या अनेक अफवा उडत होत्या. त्याच प्रमाणे लाडक्या बहिणींनासुद्धा 3000 जमा होण्याची आशा होती. मात्र आता या सम्पुर्ण आशेवरती पाणी फिरले आहे असेच दिसत आहेत.

Maharashtra Ladki Bahin Yojana July Update- फक्त याच बहिणींना मिळणार पुढील हप्ते

मागील जून महिन्यामध्ये राज्यातही जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींना लाभ दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र केले कि काय असा संभ्रम त्या लाडक्या बहिणींच्या मनात निर्माण झाला आहे. लाडकी बहीण सुरु केली त्यावेळेला राज्यातील सर्वच महिलांना योजनेचा पाहायला हप्ता देण्यात आला होता.

नंतर योजनेचे नाविन निकष तयार करण्यात आलेत. ज्या महिलांना सरकारी नोकरी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता, तरी सुद्धा हजारो नोकरीवर असणाऱ्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला. ज्यामुळे शासनाचे शासनाचे मोठे नुकसान सुद्धा झाले. हि बाबा लक्षात घेताच शासनाने त्यावर पाऊले उचलायला सुरुवात केली. एवढेच नाही तर राज्यात 20 हजार पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण म्हणून अर्ज भरून लाभ सुद्धा घेतले. बहिणींनो याच पार्श्वभूमीवर शासन परत एकदा चौकशी सुरु करणार आहे.

ज्या लाडक्या बहिणी सर्व पात्रता निकषांमध्ये बसतील त्यांनाच इथून पुढुळ हप्ते मिळेल. तसेच ज्या महिलांनी आपल्या आधार आणि बँक खात्याची केवायसी केली असेल त्यांच्याच खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. एक कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना अपात्र करण्यात येईल आणि ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा अधिक असेल त्यांना आता अपात्र करण्याचे आदेश सुद्धा शासनाने प्रशासनाला दिले आहेत.

जुलै महिन्याचा हप्त्याबाबत खास अपडेट

रक्षाबंधनाच्या आधीच्या दिवसापर्यंत राज्यातील सर्वच पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता दिला जाणार असल्याची अधिकृत घोषित महिला व बालविकास मंत्री यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून केली. त्यानुसार 2,994 कोटी रुपयाचा निधी सुद्धा उपलब्ध केला गेला आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपयेच मिळणार आहे. ज्याची सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे. चालू ऑगस्ट महिन्याचे पैसे हे करून झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पात्र बहिणींना मिळणार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये?

ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही आणि जर का ते पात्र असतील, तर काळजी करण्याची काहीही गरज नाही. शासनाने सर्व जिल्हापरिषद अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वच लाडक्या बहिणींच्या चौकशी चे आदेश दिले आहेत.

अंगणवाडी कर्मचारी हे प्रत्येक गावात, प्रत्येक घातली महिलांचा संपूर्ण डेटा गोळा करून शासनाला देणार आहे. त्या डेटा नुसार ज्या महिला सर्वच पात्रता निकषांमध्ये बसतील त्यांनाच इथून पुढील हप्त्याचा लाभ सुरु राहणार आहे. तसेच ज्या महिलांना जून आणि जुअलाई महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनासुद्धा सप्टेंबर महिन्यात पात्र बहिणींना जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये खात्यावर जमा केले जाईल. फक्त थोडा वेळ लागणार मात्र सर्व पैसे हे पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत.

निष्कर्ष

जुलै महिन्याचा हप्ता लाद्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आला असून अपात्र महिलांचा शोध घेण्याची करावाई सुरु करण्यात आली आहे. ज्या महिला 100% पात्रता निकषांमध्ये बसतील त्यांनाच इथून पुढे पूर्ण लाभ मिळणार आहे. आज या आर्टिकल मध्ये खर्च ज्या महिलांना लाभाची आवश्यकता त्यांच्यासाठीच माहिती दिली आहे, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *