Bandhkam Kamgar New Registration: बांधकाम कामगार 2025 मध्ये नवीन नोंदणी सुरु, बघा संपूर्ण प्रक्रिया

Bandhkam Kamgar New Registration 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Bandhkam Kamgar New Registration: महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी सुरु केलेल्या अनेक योजना आपण रोज इंटरनेट वर बघत असतो किंवा कदाचित तुम्ही त्या योजनांचा लाभ सुद्धा घेत असाल. मित्रांनो बांधकाम कामगारांचे जीवन कशापद्धतीने संघर्षमय असते याची जाणीव तर आपल्याला नकी असेल. बांधकाम कामगारांचे जीवन हि स्थायी नसते, आज ते नागपूर मध्ये तर उदयाला पुण्यामध्ये कामाकरता असतात.

कारण त्यान्ना जीवन जगण्याचा आणि कुटुंबाला सर्व आवश्यक गरजा पुरवण्याचा स्रोत हे त्यांचे कामाचं आहे. अशा वेळेला शासन जे योजना काढते याची थोडीही भनक हि कामगारांना नसते किंवा भनक लागली तरी ते काम सोडून योजनेची अधिक माहिती काढू शकत नाही. म्हणून राज्यसरकार स्पेशिअल बांधकाम कामगार व इमारत बांधकाम कामगार मंडळाअंतर्गत विविध योजना ह्या फक्त त्यांच्यासाठीच राबवत असतात. परंतु अनेक नवीन बांधकाम कामगार हे अजूनही नोंदणीकृत झालेले नाहीत, त्यांच्यासाठी Bandhakam Kamgar New Registration करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, हे आपण जाणून घेऊयात.

Also Read: Bandhkam Kamgar Bhandi Set Yojana: या कामगारांना मिळणार मोफत भांडी संच, लवकर करा अर्ज.

Maharashtra Bandhkam Kamgar New Registration 2025

मित्रांनो, राज्यात असे अनेक बांधकाम कामगार आहेत जे खरे कामगार असून सुद्धा त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळवता येत नाही. कारण त्यांनी बांधकाम कामगार म्हणून रजिष्ट्रेशनच केलेलं नसते.

आता घर बसल्या तुम्हाला नवीन नोंदणी करता येते. बांधवांनो, Bandhkam Kamgar New Registration करण्यासाठी गुगल वर बांधकाम कामगार असे सर्च करा. एक नंबरची वेबसाईट MahaBOCW वर क्लिक करा. ती वेबसाइट ओपन झाल्यावर तुमच्यापुढे होम पेज येईल, त्यामध्ये थोडं स्कॉल करून खाली जा. तिथे तुम्हाला हिरव्या बॉक्स मध्ये Construction Worker Registration हा पर्याय दिसेल त्याला ओपन करा. परत तुमच्या पुढे नवीन पेज ओपन होईल.

त्यामध्ये स्वतःचा आधार क्रमांक आणि त्याला लिंक असलेला असलेला मोबाईल नंबर टाका व Proceed To Form या वर क्लिक करा. तुमच्यापुढे New Registration साठी एक फॉर्म येतो. मित्रांनो, हा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र हे दोनच कागदपत्र उपलोड करण्यासाठी लागणार आहेत.

हे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमची वयक्तिक सर्व माहिती भरावी लागेल. ज्यामध्ये आधी तुमचे नाव पूर्ण नाव, लिंग टाकायचे आहे. तिथ तुमचा आधार नंबर ऍटोमॅटिक येऊन जाणार. पुढे तुमचे लग्न झाले आहे कि नाही ते माहिती टाकावी लागेल व खाली जन्मदरिखा टाका. नंतर तुमची कास्ट, पत्ता सर्व माहिती टाका.

आता पुढील टप्यात तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा. खाली तुमच्या कामाचा संपूर्ण तपशील भरावा लागेल. ज्यामध्ये तुमचे काम कुठे आहे, कोणते बांधकाम कामगार आहात, काम करून किती दिवस झालेत आणि कामाच्या प्रमाणपत्रावरचीसुद्धा काही माहिती टाकावी लागेल. हे सर्व माहिती टाकणं झाल्यावर तुमच्या कामच जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे.

नंतरचा टप्पा तुमचे कागदपत्रे अपलोड करण्याचा असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि कामाचे प्रमाणपत्र तिथे दिलेल्या सूचना नुसार उपलोड करावे लागेल. खालील चेक बॉक्स ला चेक करून सेवा बतावरती क्लिक करा. या नंतर तुम्हाला संबंधित अधिकाऱ्यांची अपॉईनमेंट घायची आहे. त्यासाठी हे अपॉईनमेंट तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा कामगार विभागामध्ये असेल. अशा एकदम सध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाइल चा वापर करून Bandhkam Kamgar New Registration करू शकता.

निष्कर्ष

जर बांधकाम कामगारांसाठीच्या सर्व योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर बांधकाम कामगार हा नोंदणीकृत असणे बांधकारक असते. त्यामुळे जर तुम्ही अजूनही नोंदणी केलेली नसेल तर आज या आर्टिकल मध्ये सांगितलेल्या नोंदणी प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही नोंदणी करू शकता आणि सर्व कामगाराच्या नवीन नवीन योजनांचा लाभ मिळवू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *