Vayoshri Yojana In Marathi: राज्यातील जेष्ठ नागरिकांना मिळणार 3000 हजार रुपयाचे अनुदान, बघा सम्पुर्ण माहिती.

Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Vayoshri Yojana In Marathi: मित्रांनो, आपल्या देशासह राज्यामध्ये सर्वात दुख्खी कोण राहत असेल तर आपल्या पुढे पटकन एखादा कोणीतरी वृद्ध व्यक्ती येतो. असे का बर? कारण तो जेष्ठ व्य्वक्ती जेव्हा जवान असतो तेव्हा तो त्याचे संपूर्ण आयुष्य हे त्याच्या कुटुंबासाठी आणि मुलाबाळांची मेहनत करत असतो.

मुलांच्या भविष्याचा विचार नेहमी त्याला असतो आणि जेव्हा त्याच्याकडन कुठलेही काम होत नाही तेव्हा मात्र त्याच मुलांना ते वृद्ध व्यक्ती नकोसा होऊन जातो. मित्रांनी, ह्या गोष्टी सर्वच परिवारात घडतात असं अजिबात नाही. परंतु राज्यातील किमान 75% परिवारातील जेष्ठ नागरिकांची हीच दशा बघायला मिडते. याचीच दखल घेऊन राज्यसरकार जेष्ठ नागरिकांना सहारा देण्यासाठी दरवर्षी विविध योजना राबवत असतात. त्यापैकीच एक योजना हि आहे. आज आपण Vayoshri Yojana In Marathi संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या आर्टिकल मध्ये करणार आहोत.

Also Read: Ladki Bahin Yojana July Update: पात्र बहिणींना मिळणार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये?

Mukhyamantri Vayoshri Yojana In Marathi Information आणि उद्देश

मंडळी, जेष्ठ नागरिक म्हणजे कोण, हे तुम्हाला माहित आहे का? आपण सहसा आपल्या पेक्षा मोठ्या व्य्वक्तींना जेष्ठ मानत असतो. परंतु राज्यसरकारच्या वयोश्री योजनेनुसार ज्या व्यक्तींचे वय हे 65 पेक्षा जास्त आहे त्याच जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ शासन देणार आहे. तसे तर शासन श्रावण बाळ योजना, निराधार योजना सारख्या योजना राबवून दर महिना जेष्ठ नागरिकांना उत्तरनिर्वाहासाठी पेन्शन देत असत. परंतु जर मध्ये जर एकाद्या व्यक्तीचे तब्बेत बिघडली, अशक्तपणा आला आणि दवाखान्यात जाणायची वेळ पडली अशा वेळेला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा जो 3000 हजारचा जो लाभ मिळतो तो यांना उपयोगी पडतो.

योजनेची पात्रता निकष

मित्रांनो, या योजनेसाठी कुठलेही मोठे आणि कठीण पात्रता निकष दिलेले नाहीत. जर तुमच्या कुटुंबात कोणी 65 वर्षावरील सदस्य राहत असतील आणि ते महाराष्ट्राचे रहिवासी असतील तर नक्की त्यांना या योजनेअंतर्गत 3000 हजारचा लाभ मिळेल. पुरुष किंवा महिला दोघेही वयोश्री योजनेकरिता अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

योजनेच्या लाभाचे स्वरूप

मित्रांनो, ज्या नागरिकांचे अर्ज स्वीकारले जातील, त्यांना मिळणारी लाभाची 3000 हजाराची रकम हि एक रकमी असेल. जी प्रति वर्ष एकदाच दिली जाणार आहे. या रकमेचा वापर लाभार्थी चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वाकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस,लंबर बेल्ट आणि सर्वाइकल कॉलर सारखे आवश्यक वस्तू घेण्याकरता करू शकतात. मुख्यमंत्री वयोश्री योजना हि राज्यसरकारच्या सामाजिक न्यावं व विशेष सहाय्य्य विभागामार्फत राबवण्यात येते. मिळणारी रक्कम हि महाडीबीटी मार्फ़त थेट जेष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा केली जाते.

योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे चार फोटो
  • बँकेचे खातेबुक
  • स्वयं-घोषणापत्र
  • रेशनकार्ड
  • ओळख पटवण्यासाठीचे इतर कागदपत्रे

योजनेसाठी असा करा अर्ज

वयोश्री योजनेचा अर्ज हा आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच करावा लागणार आहे. त्यासाठी तुमच्या परिसरातील एखाद्या सेतू मध्ये जाऊन वायोशरी योजनेचा फॉर्म सह घोषणापत्र प्राप्त करायचे आहे. नंतर जी जेष्ठ नागरिकांची माहिती विचारण्यात आली आहे ते भरा आणि त्यासोबतच घोषणापत्रामध्ये स्वतःचे नाव टाकून, सुद्धा माहिती भरून स्वतःची सही करा. तसेच त्या अर्जासोबत जेष्ठ नागरिकांचे आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज तुमच्या क्षेत्रातील सामाजिक न्याय विभागाकडे? समाजकल्याणमध्ये सबमिट करावा लागेल.

निष्कर्ष

जेष्ठ नागरिकांना जिवंत असेपर्यंत या वयोश्री योजनेअंतर्गत दर वर्षी आर्थिक मदत मिळते. एवढेच नाही तर अजून सुद्धा जेष्ठ नागरिकांसाठी प्रति महिना 7000 हजाराची मदत देण्याचे बिल सुद्धा विधिमंडळात पस करण्यात आले आहेत. लवकरात लवकर तो 7000 हजारच सुद्धा लाभ सुरु होणार आहे. जर तुमच्या कुटुंबात कोण जेष्ठ नागरिक असेल ज्यांचे वय 65 पेक्षा अधिक असेल तर त्यांना नक्की या योजनेचा लाभ मिळू शकतो, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *