Panjab Dakh Havaman Andaj Today: महाराष्ट्राचेच सुपुत्र परभणी जिल्ह्यातील हवामान तज्ञ पंजाबराव ढक साहेब संपूर्ण महाराष्ट्र भर भ्रमण करून निसर्गाच्या दिलेल्या साइन चा अभ्यास करत असतात. उद्देश फक्त हाच कि, राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर हवामानाचा अंदाज मिळावा. जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचे पावसामुळे होणारे नुकसान कमी होईल.
मागील महिन्यामध्ये सांगितल्या प्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या 11 तारखेपर्यंत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता त्या जिल्ह्यामंध्ये खरंच पाऊस पडला. तसेच ज्या भागामध्ये सूर्यमुख दिसण्याचे बोलले तिथे सुद्धा तसेच झाले आहे. शेतकरीबांधवांनो पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी आपल्या पिकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच प्रकारे शेतकरयांचे पीक वाचावे हेच आमचे सुद्धा उद्देश आहे.
Also Read: Ladki Bahin Yojana July Update: पात्र बहिणींना मिळणार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये?
महाराष्ट्रात 11-22 पर्यंत येणार मुसळधार पाऊस: Panjab Dakh Havaman Andaj Today
शेतकरी बांधवांनो आज एक नवीनच हवामानाचा अंदाज पंजाबराव ढक यांनी मांडला आहे. त्यानुसार विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांनी वर्तवलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमध्ये 11ते 22 तारखेपर्यंत टप्याटप्प्याने मुसळधार पाऊस येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेतच सावध होण्याचा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस
शेतकऱ्यांना येणाऱ्या 22 ऑगस्ट पर्यंत राज्यात सर्वत्रच पाऊस पडणार आहे. विशेष अंदाज लक्षात घेता पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि खान्देश या भागांमध्ये रोजच पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत पाऊस कमी प्रमाणात आलाय आणि 15 ऑगस्ट पर्यंत साधारणतः पाऊस कमीच राहणार असल्याची माहिती सुद्धा ढक साहेबांनी दिली आहे.
मात्र खुशखबर हि आहे कि 15 ऑगस्ट नंतर 22 ऑगस्ट पर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, संगमनेर, धुळे, नांदुरबार, जळगाव निफाल, श्रीरामपूर या परिसरात चांगला पाऊस पडणार आहे. यामधील काही भागात अतिवृष्टीचे सुद्धा शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, सांगली आणि कोल्हापूर पूरजन्य परिस्थिती बनणार आहे.
मराठवाड्यामधील परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, जालना आणि संभाजीनगर मध्ये 11 पासून 13 ऑगस्ट पर्यंत रोजच पाऊस सुरु राहणार असल्याचा अंदाज ढक यांच्याकडून दिला गेला आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर आणि इतर अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ आणि हिंगोल या भागामध्ये 16 तारखेपासून पाऊस वाढत जाणार आहे.
खंडकपूर्ण, येलदरी आणि सिद्वेश्वर हे तिनी धरणे या महिन्यामध्ये शंभर टक्के भरले जाणार आहे, त्यामुळे धारणा जवळील आणि नदीच्या जवळील गाववासीयांनी हा अंदाज लक्षात घेऊन सतर्क राहिले पाहिजे. मराठवाड्यातील जायकवाडी धरण सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये फुल्ल भरू शकते.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्यात रोजच 22 तारखेपर्यंत पाऊस येणार आहे. त्यामुळे आपल्या पिकाची वेळेवर काळजी घेण्याचे आश्वासन हवामान विश्लेषक Panjab DakhHavaman Andaj Today देत सांगितले आहे. एवढेच नाही तर आपल्या शेजारील राज्य तेलंगणा, गुजरात, मध्यप्रदेश मध्ये सुद्धा या महिन्यामध्ये भरपूर पाऊस येणार आहे.
शेतकऱ्यांना महत्वाच्या सूचना
आता सध्या 15 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस कमी आहे. त्यामुळे जे शेतीचे कामे बाकी राहले आहेत ते लवकर पूर्ण करून घेण्याचे आश्वासन या Panjab Dakh Havaman Andaj Today च्या पार्श्वभूमी वरून लक्षात घ्यावी. कारण एकदा जर 15 ऑगस्ट नंतर पाऊस वाढला तर ते 22 तारखेपर्यंत सतत सुरु राहाणार आहे. काही भागात पावसाचे स्वरूप बदलून अतिवृष्टीचे होऊ शकते. तुमच्या शेतात जिथे जास्त पाणि साचते त्याची योग्य विल्लेवाट लावा आणि पिकाला सुरक्षित करा.
निष्कर्ष
पंजाबराव ढक हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान विश्लेषक आहेत. त्यांनी केलेले विश्लेषण आणि हवामानाचा अंदाज हा नेहमी प्रमाणे या वर्षी हि खरा ठरत आहे. ते आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना वेलोळोवेळी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सतर्क करत असतात. त्यांनी दिलेल्या आजच्या अंदाजावरूनच आम्ही हि माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवत आहो, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More