Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana: राज्यातील शेतकरी बांधवांना शेतातील पिकाला लागणाऱ्या सिंचन सुविधा मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana फक्त अनुसूचित जातीमधील छोट्या शेतकऱ्यांसाठीच 5 जानेवारी 2017 मध्ये सुरु करण्यात आली होती.
या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला शेती करत असतांना ज्या महत्वाच्या सिंचनाचे यंत्र सामग्री आवश्यक असते ते सर्व आणि सिंचनाचे स्रोत निर्मितीसाठी सुद्धा 100% अनुदान दिले जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 मध्ये काढण्यात आलेल्या नवीन जीआर नुसार संपूर्ण लाभाचे स्वरूप आपण खालीलप्रमाणे बघू शकता.
Also Read: Panjab Dakh Havaman Andaj Today: शेतकऱ्यांनो सावधान, पंजाबराव डख यांनी दिला मुसळधार पाऊसाचा अंदाज
Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana चे 2025 ला मिळणारे लाभ व उद्देश
शेती करत असतांना गरीब आणि अनुसूचित जातीमधील अनेक शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो. कधी पावसाच्या दुष्काळामुळे पिकाचे नुकसान होते, तर कधी पावसाच्या अतिवृष्टीमुळे हाती आलेले पीक मातीमोल बनून जाते.
या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर बांधण्यासाठी, नवीन शेततळे बांधण्यासाठी, नवीन बोरवेल करण्यासाठी, जुन्या विहिरीला दुरुस्त करण्यासाठी, शेततळ्याला दुरुस्त करण्यासाठी, वीज जोडणी करता, पापं खरेसाठी, पाईपलाईन साठी, सूक्ष्म सिंचनासाठी, ठिंबक सिंचनासाठी, परसबाग, तुषार सिंचन आणि इतर यंत्र सामग्री करता 100% अनुदान देत असते. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना उत्पन्नात दुपटीने वाढ करता येते. जमिनीमधील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि पाण्याची योग्य पद्धतीनं उपयोग घेण्यासाठी हि योजना राबवली जाते.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप
लाभ | लाभाची रक्कम |
---|---|
1) नवीन विहीर | 4 लाखाचे अनुदान |
2) जुनी विहीर दुरुस्ती | 1 लाखाचे अनुदान |
3) शेततळ्याचे प्लास्टिक आस्तीकरण | 2 लाख रुपयांपर्यंत कमाल अनुदान |
4) विहिरीतलं बोरवेल | 40 हजाराचे अनुदान |
5) वीज जोडणी आकार | 20 हजाराचे अनुदान |
6) विद्युत पंपसंच/ डिझेल पंप | 40 हजाराचे अनुदान |
7) सोलर पंप | 50 हजाराचे अनुदान |
8) पाईप लाईन | 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान |
9) ठिंबक सिंचन संच | 97 हजाराचे कमाल अनुदान |
10) तुषार सिंचन संच | 47 हजारापर्यंत अनुदान |
11) ठिंबक सिंचन संच पूरक असे अनुदान | 97 हजार रुपयाचे कमाल अनुदान |
12) तुषार सिंचन संच पूरक असे अनुदान | 47 हजाराचे कमाल अनुदान |
13) ट्रॅक्टर अवजारे, बैलचलीत अवजारे | 50 हजार पर्यंत अनुदान |
14) परसबाग | 5 हजारांचे अनुदान |
15) इतर | NA |
योजनेसाठी पात्र होण्यासाठीचा पात्रता व अटी
मंडळी Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana साठी पात्र होण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतील किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे जातीचा दाखला असें बंधनकारक राहील. योजनेमधील कुठल्याही अनुदानासाठी शेतीचा सातबारा हा अर्जदाराच्या नावाने असावा.
0.40 हेक्टर पासून 6 हेक्टर पर्यंत शेती ज्यांच्याकडे असेल, त्यांनाच या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेता येईल. जर सातबाऱ्यामध्ये इतरीही नातेवाईकांचे नावे असेल तर त्यांच्या कडून करार बनवून घ्यावा लागेल. इथून पाच वर्षात योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल तर त्या अर्जदाराला अपात्र करण्यात येणार. लाभ मिळालाय नंतर शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर याची नोंद करण्यात येईल. अर्ज हा महाडिबीत पोर्टलवर करता येणार आहे, त्यासाठी अराजदाराकडे फार्मर आयडी असावा.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फार्मर आयडी
- जातीचा दाखला
- उत्पनाचा दाखला
- सातबारा उतारा, आठ-अ
- बँकेचे खातेबुक
- चार पासपोर्ट फोटो
योजनेसाठी अर्ज कुठे करावं?
मदनाला जर तुम्हाला सुद्धा वर सांगितलेल्या बाबांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजनांचा अर्ज महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन भारत येणार आहे. त्यासाठी महाडीबीटीवर नवीन प्रोफाइल बनवा आणि णर्ज करा या बटनावर क्लीक करून “अनुसूचित जाती व जमतील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना” या पर्यायाला निवडा. ते निवडल्या नंतर तुमच्या पुढे अर्ज येईल तो भरा आणि कशासाठी अनुदान हवे ते सुद्धा टाका.
निष्कर्ष
अनुसूचित जणी आणि जमातीमधील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना अतिमागास वर्ग समजले जाते. त्यांचे हे मागासलेपणा संपुष्टात आणण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शासन अणे की अनुदान देणाऱ्या योजना राबवत असते. हि योजना सुद्धा अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांचे आर्थिक मदत करण्यासाठीच सुरु करण्यात आलेली योजना आहे. ज्याचा लाभ घेऊन आपले शेतकरी बांधव अधिक उत्पन्न घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहाचा एक भाग होऊ शकतील, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More