Ladki Sunbai Yojana Maharashtra: मागील वर्षांपासून देशभर प्रसिद्ध असलेली महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेनंतर जे विधानसभांचे निकाल लागले ते लाडक्या बहिणींचीच किमया होती. आता परत एकदा आपल्या राज्यात जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहबांनी महिलांसाठी अजून एक Ladki Sunbai Yojana ची घोषणा केली आहे. ज्यामुळे राज्यातील संपूर्ण महिलांच्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली असून, हि लाडकी सुनबाई योजना आहे तरी काय असे अनेक प्रश्नाची घर केले आहेत. तर त्या माहलिलांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.
Also Read: Ladki Bahin Yojana July Update: पात्र बहिणींना मिळणार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये?
Ladki Sunbai Yojana काय आहे?
तुम्हाला वाटले असेल कि, माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणे शासनाने लाडकी सून बाई योजनाच सुरु केली आणि आता लाडक्या सुनींना सुद्धा महिन्याला आर्थिक मदत मिळणार. तर बघिणींनो हा जो तुमचा समाज आहे तो पूर्णपणे गैर समज आहे. कारण Ladki Sunbai Yojana सुरु करण्याची घोषणा एकनाथ शिंदे साहबांनी केली, परंतु या योजनेच्या माध्यमातूनलाडक्या सुनांना कुठलीही आर्थिक मदत मिळणार नाही. सुनेच्या होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठीची हि योजना आहे.
हल्ली आपल्या राज्यात सासरवासियांकडून सुनीच छळ हा वाढतच चालला आहे. त्यामुळे सुनांचा एक आवाज असावा, राज्यातील सुनांना वेळेवर मदतीचा हात मिळावा यासाठीचे हे एकप्रकारचे अभियानचा आहे. या मार्फ़त मानसीं आणि शारीरिक त्रासाने ग्रस्त असलेल्या सुनांना मदत दिली जाणार आहे. त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा जाहीर केला आहे.
लाडकी सुनबाई योजनेचे उद्देश
ठाण्यामधील एका सभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सभेला भाषण करतांना Ladki Sunbai Yojana घोषित केली, त्यावेळी सुनांवर होणाऱ्या अन्य्याला वाचा फोडण्यासाठी हे अभियान राबवण्याचे सुद्धा स्पष्ट केले आहे. कारण ज्याप्रमाणे मुलीला आपल्या कुटुंबामध्ये मान, प्रेम दिले जाते त्याच प्रमाण सुनांना सुद्धा मिळावे आणि त्यांच्या वर होणारे अत्याचार कमी व्हावे यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेच्या माध्यमातून अन्याय करणाऱ्या सासरच्या लोकांना चांगले वर्णवणूक देण्याचा सबक मिळेल आणि परिवारात सन्मानाची वागणूक दिली जाईल. कुठलीही सून अडचणीत असेल किंवा घरच्यांकडून सुनेवर अन्याय केला जात असेल तर या योजनेच्या माध्यमातून वेळेवर मदतीचा हात दिला जाणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली आहे.
हेल्पलाईन नंबर
राज्यातील ज्या हि महिला घरघुती त्रासाला कंटाळला असतील किंवा ज्या महिलांचे जीवन संकटात असेल त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. त्यावर कॉल केल्या केल्या पंधरा मित्रांमध्ये तुमच्या पर्यंत मदत पोहोचणार आहे. ते हेल्पलाईन नंबर तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकता.
Ladki Sunbai Yojana Helpline Number: 8828862288
मिळणाऱ्या मदतीचे स्वरूप
लाडकी सुनबाई योजना हे एक प्रकारे स्वतःच्या पक्षाकडून राज्यभर राबवण्याचा निराधार एकनाथ शिंदे यांनी केला आहे. हि शासकीय योजना आहे, असे सहाध्यातरी बोलणे चुकीचेच ठरेल. कारण शासनाने अधिकृत कुठलाही जीआर या योजनेचा काढला नाही.
हि योजना शिवसेना आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते राबवणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत आहे. सुरुवातील सुनबाई आणि सासरच्या घरातील सर्व वाद मिटवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जाईल. जर सर्व प्रयत्न करून सुद्धा वाट मिवल्या जात नसेल तर सासरच्या लोकांनावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी जर काही वाद असतील तर ते घरच्या घरी वाढू न देता मिटवून घेतलेच बरे राहणार आहे.
निष्कर्ष
एक महाराष्ट्रामध्ये नवीन क्रांतीची नांदी या अभियानाला मानायला काही हरकत नाही. कारण जिथे महिला आयोगामध्ये चकरा मारून सुद्धा कुटुंबिक वाद सुटत नाहीत ते आता या योजनेच्या माध्यमातून शिवसैनिक सोडवतील. याच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांची क्रिमिनल पानाची मानसिकता संपुष्ठात येण्यास मदत होईन आणि क्राईमच्या घटना सुद्धा कमी होतील.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More