Sheli Palan Yojana: शेतकरी बांधवांनो, शेळीपालन एक प्रभावी आणि लोकप्रिय व्यवसाय बनताना आपण बघतो. शेळीपालन व्यवसाय करणे हा शेतीला पूरक असा व्यवसाय असल्याकारणाने शेतकऱयांना यामध्ये जास्तीची मेहनत घेण्याचीही गरज नाही.
सोशल मीडिया वर हॉटेल भाग्यश्री नॉनव्हेज हॉटेल वाल्याला रोज लागणाऱ्या बकऱ्यांची संख्या बघून अनेक शेतकऱ्यांची शेळीपालन करण्याची इच्छा असतांना सुद्धा आर्थिक अडचणींमुळे ते शेळ्या खरेदी करू शकत नाहीत. मात्र त्यांना जर का थोडी आर्थिक मदत केली, तर मात्र एक उत्तम शेळीपालक बनून अतिशय मोठे उद्योजक बनण्याची धमक हि आपल्या शेतकरी बांधवांमध्ये असते. म्हणूनच Sheli Palan Yojana च्या माध्यमातून सरकार शेळीपालनाला चालना देण्यासाठी आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधीची स्थानिक ठिकाणीच उपलब्ध करण्यासाठी लाखो रुपयाचे कर्ज देऊन त्यावर अनुदान सुद्धा देत आहे.
Also Read: Aai Karj Yojana: 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार फक्त याच महिलांना, बघा संपूर्ण माहिती.
Sheli Palan Yojana Maharashtra: शेळी पालन योजनेचा परिचय
मित्रांनो, आज आपल्या देशासह राज्यामध्ये लाखो तरुणांच्या हाताला काम नाही आहे. शेती करणारे शेतकरी अतिवृष्टी मुले तर कधी दुष्काळामुळे हवालदिल होत आहेत. अशा परिसथितीत जर चांगला आणि मोठा असा उत्पन्नाचा स्रोत हा आपल्या शेतकऱ्यांना पशुपालन बनू शकते. त्यामध्ये सर्वाधिक डिमांड हि शेळ्यांना आणि बकऱ्यांना आहे, कारण आपल्या राज्यातील 70% नागरिक हे मांसाहारी असल्याकारणाने व्यपाऱ्यांकडून मोठी मागणी पशुपालकांना शेळ्यांची आणि बोकिलांची केली जाते.
या व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांना गाव सोडून जाण्याची गरजच पडणार नाही आणि कुठल्याही सरकारी नोकरीवाल्याला मागे टाकेल एवढी कमाई हि या व्यवसायामधील तरुण शेतकरी करू शकता.
मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना 10-50 लाखांपर्यंत कर्जमहाराष्ट्र शासन उपलब्ध करून देणार आहे. जे कि एकदम कमी व्याजदराने असेल सोबतच अनुसूचित जाती आणि जमाती मधील अर्जदारांना 75% अनुदान आणि इतर मागास घटकांना 50% अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन आत्तापर्यंत लाखो तरुणांनी करियर घडवले आहेत.
शेळी पालन योजनेचा उद्देश
शेतकरी जरी जगाचा पोशिंदा असला तरी आज शेतकऱ्याची हालत काय आहे हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. शेतकऱ्यांना जर स्वतःचा विकास करायचा असेल तर पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहून तो अजिबात होणार नाही. म्हणून ग्रामीण भागातील जे शेतकरी शेळी पाळण करण्यासाठी इच्छुक आहे मात्र पैश्याचा अभावामुळे ते एक, दोन शेळ्यांपेक्षा जास्त शेळ्या खरेदी करू शकत नाही किंवा त्यांचं नियोजन करू शकत नाही.
अशा बांधवांना Sheli Palan Yojana Maharastra च्या माध्यमातून जेवढी हवी तेवढी आर्थिक मदत कर्ज स्वरूपात देण्याचे शासनाचे उद्देश आहे. त्यामध्ये 75% अनुदान सुद्धा शासन देणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेळीपालनाचे उत्तम नियोजन करण्यासाठी फार मोठं मदत होणार आहे. प्रत्येक गावातील जर एका तरुणाने जर शेती सोबत शेळी पालन सुरु केले तर तो गावातील पाच बेरोजगार युवकांना रोजगार देऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीव्यतिरिक्त असणाऱ्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये वाढ होऊन उत्पादन वाढण्यास मदत मिळू शकते.
योजनेच्या माध्यमातून मिळणार लाभ
शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 100 नग शेळ्यांचे पालन करण्याचा विचार केला तर तुम्हाला अंदाजे 10 लाखापेक्षा अधिक कर्ज Sheli Palan Yojana च्या माध्यमातून मिळू शकते. आणि त्यावर 75% टक्के अनुदान म्हणजे जवळपास आठ लाभाचे अनुदान दिले जाणार आहे. तुम्हला परतावा फक्त 25% रकमेचा आणि त्यावर असलेल्या काही व्यजचा करावा लागेल.
मिळालेल्या अनुदानातून लाभार्थी हा बकरी, बोकळ किंवा त्यांना ठेवण्यासाठी चांगल्या गोठ्याची उभारणी सुद्धा करू शकतो. जर शेतकऱ्याला शेळी पालनाची काहीच माहिती नसेल तर त्याला योजनेच्या माध्यमातूनच योग्य शेळीपालन व्यवसायाचे प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे.
शेळी पालन योजनेच्या काही पात्रता आणि अटी
महाराष्ट्र मूळ रहिवासी असलेला शेतकरी किंवा बचत गटातील महिलाच शेळी पालन योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच अर्जदार व्यक्ती कोणीही असो असो त्याचे वय किमान 18 ते कमाल 60 असेल तरच त्याला लाभ दिलाजाईल. अर्जदाराकडे शेळी पालन करण्यासाठी किमान 9000 चौ. मीटर जमीन उपलब्ध असायला हवी, जेणेकरून त्यामध्ये 100 बकऱ्या आणि 5 बोकडाचे योग्य राहण्याचे नियोजन करता येईल.शेळी पालन योजनेचे कर्ज आणि अनुदान मिळवण्यासाठी रेशनकार्ड धारक आणि अल्पभूदारक शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने या योजनेस पात्र होण्यासाठी केंद्र सरकारच्या इतर कुठल्याही शेळीपालन योजनेचे अनुदान घेतलेले नसावे.
शेळीपालन योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- 7/12, 8- अ
- प्रकल्पाचा अहवाल
- बँक खातेबुक
- पासपोर्ट फोटो
- प्रशिक्षण प्रमाणपत्र
- शपथपत्र
शेळी पालन योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
योजनेचा अर्ज हा प्रामुख्याने ऑफलाईन पद्धतीनेच करता येतो, परंतु काही निवडक जिल्ह्यांमध्ये Sheli Palan Yojana करता ऑनलाईन प्रक्रिया सुद्धा राबवली जाते. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासन सुरु केलेल्या साइट वरच जाऊन अर्ज करता येणार आहे. जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा झाल्यास सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्यातील जिल्ह्परिषदेमधील पशुसंवर्धन विभागाला भेट द्या. तेथूनच शेळी पालन योजनेचं अर्ज सुद्धा मिळवता येईल. तो अर्ज भरा शेळी पालनासाठी लागणारे कागदपत्रे जोड आणि तेथेच संबंधित अधिकाऱ्याकडे तो अर्ज सबमिट करा.
निष्कर्ष
राज्यातील शेतकऱ्यांना जर स्वतःचा आर्थिक आणि सामाजिक विकास करवून घ्यायचा असेल तर त्याला व्यवसायाकडे वळल्या शिवाय पर्याय नाही. त्यामध्ये शेळीपालन व्य्वसय हा एक चान्गला व्यवसाय करून शेतकरी समृद्ध बानू शकतो. कारण आपण जी योजना वरती बघितली त्यामार्फत लाभ घेऊन शेतकऱ्यांना स्वतःजवळील पैशाचं जास्त गुंतवणूक करण्याची गरज पडणार नाही आहे. आज काळाची गरज हि व्यवसाय आहे, मग ते कुठलाही हि असो, शेळीपालन हा त्यापैकी फक्त एक पर्याय असू शकतो.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More