Panjab Dakh Live: आतापर्यंत महाराष्ट्रा मध्ये पावसाचा कहरचा सामना सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत करावा लागला आहे. परंतु या मध्ये सर्वाधिक नुकसान हे आपल्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचे झाले आहे. त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
मित्रांनो, मागील दहा दिवसामध्ये पंजाबराव ढक साहबांनी सांगितलेल्या हवामानाच्या अंदाजानुसारच राज्यात अतिवृष्टी झालेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक पाऊसाने वाहून गेलेत त्यामुळे सर्व शेतकरी आता शासनाच्या मदतीची वाट बघत आहेत. तसेच हवामान कधी बदलेल आणि हा पावसाचा कहर कधी थांबेल याची चिंता करत आहेत. मित्रांनो, पुढील काही दिवसात काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी होईल याची संपूर्ण माहिती Panjab Dakh Live येऊन वेळोवेळी देत आहेत.
Also Read: Gai Gotha Anudan Yojana 2025: या शेतकऱ्यांना गाय गोठा अनुदान योजनेतून मिळणार 3 लाख रुपये अनुदान
Panjab Dakh Live Update: आजची हवामानाची लाईव्ह अपडेट
महाराष्ट्राचा लाडके, अभ्यासू हवामान तज्ञ पंजाबराव ढक यांनी आगस्ट महिन्यातील 21 पासून 26 आगस्ट पर्यंतचा अचूक दिलेला हवामानाचा अंदाज आणि काही महत्वाचा सुचना खालीलप्रमाणे बघा.
विदर्भातील पावसाचा अंदाज
मित्रांनो, संपूर्ण राज्यात ज्याप्रकारे पावसाचा कहर माजला होता त्याला आता ब्रेक लागण्याचा अंदाज पंजाबराव ढक यांनी दिला आहे. राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये 21, 22, 23 या तारखांमध्ये पाऊसाचे प्रमाण हे कमी होणार आहे. तसेच दुपारपर्यंत चांगले सूर्याचे दर्शन होऊन दुपारणानंतर पाऊस पडण्याचा अंदाज दिला जात आहे. तसेच 24 आणि 25 तारखेला मात्र चांगली उघाड पाऊस देऊ शकते. त्यामुळे जसा जसा पाऊस उघड देईल तसे तसे विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीचे काम करून घेण्याच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत. कारण 26 आगस्ट नंतर परत पाऊस जास्त वाढणार आहे.
मराठवाड्यातील पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा हवामान अंदाज पंजावराव ढक यांनी दिलेला आहे. त्यांच्या अनुसार मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, जालना, छ. संभाजीनगर, धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये 21 आणि 22 तारखेला पाऊस दुपारपर्यंत उघड देईल आणि दुपार नंतर मात्र पाऊस या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार आहे. तसेच पोळा संपल्या नंतर 23, 24, 25 तारखेला मराठवाड्यातील या जिल्यांमध्ये पाऊस एकदम कमी प्रमाणात असेल, त्यामुळे या वेळेमध्ये शेतीचे आवश्यक कामे, जसे फवारणी, खुरपणी हि सर्व आटपून घ्यावीत. जसे विदर्भात पावसाने आगमन केले तसे परत मराठवाड्यामध्ये सुद्धा 26 आगस्ट पासून पाऊस जास्त प्रमाणात येण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्यांना मात्र विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे पावसाची उघड सध्यातरी मिळणार नाही आहे. पोळ्याचा याआधीच दिवस, पोळ्याचा दिवस आणि नांतरच्या दिवसाला चला पावसाच्या सारी येणार आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे पाणी अधिक वाढेल आणि कदाचित आणखी दरवाजे खुले करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील शेतकऱ्यांनी नदिमधील मोटार काढून घ्याव्या नाहीतर ते वाहून सुद्धा जाण्याची शक्यता असेल. तसेच नदीला जर पूर आला तर नदीकाठची जे शेती आहे त्या शेतामध्ये शेतकरी बांधवांनी जनावरांसाठीचे गोठे बांधलेले आहेत, त्यांना सूचना देण्यात येते कि पुढी चार दिवस तरी जनावरांना तिथे ठेऊ नका. जनावरांना दुसऱ्या सुरक्शित जागी हलवा.
निष्कर्ष
जर योग्य वेळेला हवामानाचा अंदाज काळाला तर शेतकरी आपले होणारे नुकसान थांबू शकतील, हेच पंजाबराव ढक यांचे उद्देश आहे. कारण जर अचानक पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली किंवा पावसाचे प्रमाण वाढले तर शेतकरी मोठ्या संकटात येऊ शकतो. हवामानाचा तंतोतंत अंदाज मिळाल्यानंतर काही प्रमाणात का होईना पण आपले नुकसान वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो. म्हणून आम्ही दिलेला अंदाज महत्वाचा समजला जातो.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More