Bhajani Mandal Anudan Yojana: आपल्या गावात, शहरात किंवा परिसरात एक तरी भजनी मंडळ असतेच. जे आपल्या संस्कृतींना त्यांच्या भजन केळीच्या माध्यमातून जपण्याचे काम करत असते. तुमच्या परिसरात एखादे मंदिर असेल किंवा विहार असेल तर तिथे नेहमी भजन सादर करण्याचे किंवा आपली भक्ती प्रदर्शन करण्याचे काम हे मंडळ करत असते.
मंडळ अर्थातच चार- पाच सदस्यांचा एक ग्रुप, जो स्व:खर्चातून भजन म्हणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यसुद्धा घेतात. त्याच प्रकारे स्वताचा वेळ सुद्धा या कलेला जपण्यासाठी देत असतात. मध्यंतरी शासनाने या मंडळांसाठी पेन्शन योजना सुद्धा सुरु केली आहे, ज्याचा लाभ राज्यातील हजारो भजनी मंडळातील सदस्य घेत आहे. भजन हे संपूर्णपणे मंडळाच्या गायन करणाऱ्या सदस्यावर असत आणि गायनाला सूर देण्याचे काम साहित्य करत असतात. हे सहित्य खरेदी करण्यासाठीच महाराष्ट्र शासनाने Bhajani Mandal Anudan Yojana सुरु केली आहे.
Also Read: Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची व हळद कांडप मशीन करता मिळणार 50,000 अनुदान
Bhajani Mandal Anudan Yojana Maharashtra: भजनी मंडळ भांडवल योजनाची संपूर्ण माहिती.
मित्रांनो, आपल्या राज्याचा प्राण असलेला उत्सव म्हणजेच गणेश उत्सव अगदी दोन दिवसांवर येऊन टेकला आहे. या उत्साहामध्ये भजनी मंडळाचे महत्व किती आहे, हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. गणेश उत्सवाला महाराष्ट्र शासनाने नुकतेच राज्य उत्सव म्हणून दर्जा दिला आहे. या 2025 च्या गणेश उत्सवाला कशाची कमतरता भासूं नये आणि नाचून, गाऊन पूर्ण भक्तीने हा उत्सव साजरा व्हावा याकरता भजनी मांडला एक गिफ्ट म्हणून Bhajani Mandal Anudan Yojana सुरु करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत राज्यसरकार एका पात्र भजनीमंडळाला 25 हजाराचे आर्थिक मदत अनुदान स्वरूपात देणार आहे. हि योजना शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्फ़त राबवत आहे. या अंतरंगात राज्यातील किमान 1,800 भजनी मंडळांना हे अनुदान दिले जाईल. या योजनेकरता पाच कोटी रूप – यायची तरतूदसुद्धा राज्यशासनाने केली आहे. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2025 ठेवण्यात आली आहे.
भजनी मंडळ अनुदान योजनेचे उद्देश
राज्यातील भजनी मंडळांना भजनाचे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत करणे. आपल्या राज्यातील पारंपरिक वाद्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहणे. आपली संस्कृती जपण्यासाठी आणि धर्मिं वातावरण टिकवून ठेवण्यासाठी मंडळांना मदत करणे. तसेच भजन, कीर्तनावाच्या होणाऱ्या विविध कार्यक्रमांना चालना देणे आणि नवीन तरुणांना नवी नवीन कला अंगीकृत करण्यासाठी प्रोत्साहित कर्णाचे उद्देश शासनाचे आहे.
भजनी मंडळ भांडवली योजनेची पात्रता
राज्यातील जेवढेही जातिधर्मांच्या भजनी मांडले आहेत त्या सर्वांसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी भजनीमंडळांना काही पात्रता निकष देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि महत्वाचा म्हणजे अर्जदार मंडळाने यापूर्वी कुठल्याही अनुदान स्वरूपाच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा. तसेच अर्ज करणारे भजनी मंडळ हे अधिकृतरीत्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ज्या परिसरातील, गावातील किंवा शहरातील हे भजनी मंडळ असेल त्याठिकानी नियमित पने कार्यक्रमाने आयोजन त्यांच्यामार्फत केले गेलेले असावे. मंडळामध्ये जेवढेही नोंदणीकृत सदस्य आहेत त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती अर्जामध्ये भरावी लागेल.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- ग्रामपंचायतीचा दाखला
- कार्यक्रमाचे फोटो
- झालेल्या कार्यक्रमाचे असतात त्यांचे पत्र
- कार्यक्रमाच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांचे कात्रण
- जाहिरातीचे कात्रण किंवा निमंत्रण
- सर्व सदस्यांचे आधार कार्ड
- मंडळाचे बँक खात्याचे तपशील
भजनी मंडळ योजनेसाठी अर्ज कसा करावा?
आपल्या राज्यातील कलाकारांसाठी अतिशय महत्वाची Bhajani Mandal Anudan Yojana ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भजनी मंडळाचे ऑनलाईन रजिष्ट्रेशन सर्वप्रथम करणे आवश्यक आहे. रजिष्ट्रेशन करण्यासाठी mahaanudan.org या अधिकृत साईट वरती जा.
तिथे संस्था किंवा भजनी मंडळ नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवावं लागणार आहे. नंतर ते ओटीपी टाकल्या नंतर भजनी मंडळ नोंदणीसाठी तुमचा जो विभाग असेल, ते निवडा. नंतर तुमचे मंडळ ज्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि गावातील असेल ते सुद्धा निवडायचे आहे. आता तुमच्या भजनी मंडळाचे नाव टाका, पत्ता टाका. शेवटी मोबाईल नुंबर आणि मेल आयडी टाकून अर्ज सबमिट करा . हि सर्व फक्त तुमच्या मंडळाच्या नवीन नोंदणीची झाली आहे.
भजनी मंडळ अनुदानासाठी असा करा अर्ज
आपण वरती मंडळाचे रजिश्ट्रेशन केल्यानंतर Bhajani Mandal Anudan Yojana करता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पार्ट त्याच अधिकृत साईट ला भेट द्यावी लागणार आहे. तिथे तुमचा तयार झालेला लॉग इन पासवर्ड टाकून भजनी मंडळ भांडवली योजना या पर्यायावर क्लीक करा. आता तुमच्यापुढे योजनेचा अर्ज येईल त्यामध्ये तुमच्या मंडळाविषयी सविस्तर माहिती टाका आणि अर्ज सबमिट करा. अर्ज सबमीट केल्यानंतर जे पावती तुमच्याकडे येईल ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुमचीच असेल.
योजनेचा लाभ घेऊन होणार हे फायदे
सर्वप्रथम सांगायचे झालेच तर भजनी मंडळांना जो लाभ 25 हजाराचा मिळणार आहे ते शंबर टक्के अनुदानावर असणार आहे. मिळणाऱ्या रकमेतून भजनी मंडळ त्यांच्या कलेचे साहित्य जसे चाटी-तबला, बेटी, हार्मोनियम, झान्झ किंवा साउंड सिस्टीम यापैकी खाचीही खरेदी करू शक्तील. ज्याच्यामुळे त्यांची कला अधिक चांगल्या प्रकारे सादर करण्यास मदत होईल. नवीन पिढी जी नेहमी मोबाईल मध्ये गुंतलेली असते त्यांना संस्कृतीशी जवळकी वाटेल. तसेच गावातील कलाकारांना कलेमध्ये करियर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
निष्कर्ष
आपल्या भागातील कलावंतांची कला जिवंत ठेवण्यासाठी राज्यशासन भजनी मंडळांकरता विविध योजना राबवत असते. त्या योजनांपकी महत्वाची हि एक योजना आहे. जर तुमच्या गावात, परिसरात तुम्हे कोणते भजनी मंडळ असेल तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळू शकतो. आत्ता या सोशल मीडियाच्या माध्यमातून कला प्रदर्शित करून सुद्धा चांगले शकते, म्हणून कलेला जोपासण्याचे काम शासन करत आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More