E-Pik Pahani Online करा तेहि स्वतःच्या मोबाईल वरून आणि मिळवा तुमच्या पिकाची नुकसान भरपाई.

E-Pik Pahani Online 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

E-Pik Pahani Online: आधी सरकारी कर्मचारी जसे तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सेवक हे पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करत होते. मात्र आता डिजिटल सर्वे आणि पंचनामे केले जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाचे नेमकं किती नुकसान झालं आहे आणि कस झालंय पंचनामे शेतकऱ्यांना त्यांच्या स्वताच्या मोबाईल वरून करणे शक्य होणार आहे.

शेतकरी बांधवांनो आधीच आपल्या पिकांना हवा तसा भाव मिळत नाही आहे. त्यात अतिवृष्टीने तर नाकात दमच केला. लाखो शेतकऱ्यांचे पीक हे पावसाखाली बुडाले आहे ज्याच्यामधून पाच पैशाचं सुद्धा फायदा होत नाही. या वेळेला शासन नुकसान भरपाई केव्हा देईल याचीच सर्व नुकसान ग्रस्त शतकऱ्यांना आतुरता आहे. जेनेकरून पिकाला जेवढा खर्च लावला तेव्हडा तरी मोबदला मिळेल हीच आशा असते. परंतु E-Pik Pahani Online कशी करायची हेच कळत नाही. म्हणून आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खास माहिती या आर्टिकल मध्ये आपण बघणार आहोत.

Also Read: Panjab Dakh Havaman Andaj Today: शेतकऱ्यांनो सावधान, पंजाबराव डख यांनी दिला मुसळधार पाऊसाचा अंदाज

E-Pik Pahani Online Registration Prosess: ई- पीक पाहणी कशी करायची, संपूर्ण प्रक्रिया

मित्रांनो, शासनाणे जे E-Pik Pahani साठीचे ऍप सुरु केले होते ते क्रॅश झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोंधळ उडाली होती. मात्र शासनाने आता त्यामध्ये सुधारणा करून परत एकदा E-Pik Pahani Online प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तुम्ही अजून सुद्धा ऑनलाईन तुमचा पंचनामा अजून केला नसेल, तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये E-Pik Pahani ऍप घ्यायचे आहे. जर जुने ऍप असेल तर त्याला अपडेट करावे लागेल.

नंतर पूढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऍप काही परमिशन मागेल त्यांना आलो करावे लागेल. नंतर तुमचा महसूल विभाग निवडून घ्या. नंतर तुम्हाला हिरव्या रंगाच्या बाणावर क्लीक करून पुढे जावे लागेल. पुढे परत लॉगइन पद्धत निवडायची आहे. तिथे तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन पद्धत निवडावी लागणार आहे. तिथे अर्जदाराला किंवा शेतकऱ्याला स्वतःचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे.

शेतकऱ्याला पुढे स्वतःचे नाव टाकून ओटीपी पाठवावा लागेल. नंतर तो टाकून घ्यायचं आहे. आता E-Pik Pahani करण्यासाठी नोंदणी करा हा पर्याय निवड करा आणी मोबाईल नंबर टाकून घ्यावा आणि ओटीपी पाठवा. तो टाकून लॉग इन करून घ्या. अजूनसुद्धा जर तुमचे खाते तयार झाले तरी मात्र नोंदणी झालेली नाही, त्यामुळे नोंदणी करा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

इथे परत तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडू घ्यायचे आहे. पुढे जा, या पर्यायावर क्लिक करून तिथे तुम्हाला तुमचे नाव मधले नाव आणि आडनाव टाकून घ्यावे लागेल. तसेच खालील बॉक्स मध तुमचा गट क्रमांक टाकावा लागेल. आता खालील हिरव्या शोध बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे. तिथे तुमचा नाव निवडून घ्यावे लागेल. परत खालील हिरव्या बाणावर क्लिक करून घ्या. तुम्हाला तिथे तुमचे नाव दिसेल परत सर्व व्यवस्थित माहिती टाकली असेल तर हिरव्या बाणावर क्लीक करून पुढे जा. इथे आता यशस्वीरीत्या E-Pik Pahani Online करण्यासाठी तुमचे रजिष्ट्रेशन झालेले आहे.

पुढे E-Pik Pahani Online करण्यासाठी खालील स्टेप वापरा

वरील रजिष्ट्रेशन च्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या पुढे नवीन एक पेज ओपन होईल, त्यामध्ये सहा वेगळे वेगळे पर्याय तुम्हाला बघायला मिळतील. त्यामधील दोन नंबरचा पर्याय पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करावा. इथे परत नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये ई- पीक पाहणी साठी तुमची आणि तुमच्या पिकाची माहिती भरायची आहे आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करून घ्याचे आहे.

मित्रांनो, इथे आता तुमच्या शेतातील पिकाचे दोन० लागतील. नंतर तुम्ही भरलेली ई- पीक पाहणी साठी भरलेली सर्व माहिती दिसेल, ते बरोबर असेल तर पुढे जा या बटनावर क्लिक करा. आता तुम्ही भरलेली माहिती अपलोड झाली आहे अश्या पद्धतीची एक नोटोफिकेशन येईल. त्याला ठीक आहे या पर्यायावर क्लीक करून यशस्वीरीत्या तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून पीक पाहणी करू शकता.

निष्कर्ष

शेतकरी बांधवांनो, E-Pik Pahani Online प्रक्रिया हि याच वर्षीपासून शासनाने सुरु केली आहे. या प्रक्रियांमुळे शेतकरी स्वतःचा घरी बसून चांगल्या प्रकारे पाहणी करू शकतो जाणीव या साठी एक रुपयाही शेतकऱ्याला खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही. तसेच कुठल्या अधिकाऱ्याला रिशवंत देण्याची गरज पडणार नाही. E-Pik पाहणी काशयापध्दतीने कार्याची याची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आपण बघितली आहे. त्यामुळे मुदत सामानाच्या आत तुम्ही हे काम करून घ्यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *