Gharkul Yojana New List: मागील महिन्यांमध्ये घरकुलासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. खरकूल योजनेसाठी ज्या नागरिकांना घर नाही किंवा कच्चे घर आहे त्यांना स्वतःच्या मोबाइलवरूनच डिजिटल स्वरूपात अर्ज करता येत होता. ज्यांनी अर्ज केले त्याच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आत्ता घरकुलासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यावर्षीची यादी जाहीर करण्यात आली आहे. ते यादी कुठे बघायची, तुमचा अर्ज पात्र झाला कि नाही ते कसे चेक करायचे आणि अधिकृत वेबसाईट कोणती आहे. हे आपण याज बघुयात, जेणेकरून सर्वसामान्य नागरुकांना Gharkul Yojana New List बघण्यासाठी सोपे जाईल.
Also Read: Aai Karj Yojana: 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार फक्त याच महिलांना, बघा संपूर्ण माहिती.
Gharkul Yojana New List काय आहे?
मित्रांनो, घरकुलासाठी अर्ज केला असता, तो अर्ज स्वीकारण्यात आला कि नाही. तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळेल कि नाही याची स्पष्ट उत्तर हे Gharkul Yojana New List मध्ये असते. कारण ज्या अर्जदाराचे नाव या यादीत असेल तो पक्के घर बांधण्यासाठी घरकुल योजनेसाठी पात्र आहे असे ग्राह्य धरले जाते. जर तुम्ही या यादीमध्ये नावच चेक केले नाही आणि पुढील प्रक्रिया पूर्णच केली नाही तर तुमचे आलेले घरकुल सुद्धा परत जाते. शासन समजते कि या व्यक्तीला आवास योजनेची आवश्यकता नाही. त्यामुळे चमचे नाव ब्लॉक लिस्ट मध्ये टाकण्यात येते.
पूर्वी घरकुल योजनेसाठी अर्ज हे ग्रामपंचायच्या अंतरंगातच केले जात होते. ज्यामध्ये मोठा भ्रष्ट्राचार सुद्धा प्रत्येक गावात केला जात होता. मात्र या वर्षी सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली असल्यामुळे Gharkul Yojana New List सुद्धा ऑनलाइनच जाहीर करण्यात येते. जे अर्जदार स्वताच्यमोबाइलवरून बघू शकते. यामुळे कोणालाही एक रुपया देण्याची गरज पडणार नाही. म्हणून आम्ही खालीलप्रमाणे सांगितलेल्या प्रक्रियेचा वापर करून 2 मिनिटात तुमचे नाव चेक करा.
घरकुल योजना काय आहे?
राशन कार्ड धारक किंवा दारिद्ररेषेखालील परिवाराला स्वतःचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत हे विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून शासन करत असत. सुधारित शासकीय जीआर नुसार आता घरकुल योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याला 2.10 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. ज्यामुळे जरी त्याचे पक्के घर नाही झाले तरी या महागाईच्या काळामध्ये 60% तरी घराचे काम या अनुदानित रक्मेमधून पूर्ण होऊ शकते. ज्यांच्याकडे जागा नसेल त्यांना शासन त्यांना घरकुल योजनेतूनच जागा खरेदीसाठी 1 लाखाची अतिरिक्त रक्कम देऊ करते.
घरकुल योजनेची नवीन यादी कशी बघावी?
2024-25 मध्ये ज्या अर्जदारांनी अर्ज केले आणि स्वतःच्या मोबाइल मधून ऑनलाईन सर्वे केले आहेत. त्यांचे नावाची यादी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत पोर्टल ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम PM Awas योजनेचा अधिकृत पोर्टल ला जावे लागेल.
तुमच्या पुढे आवास योजनेचे पोर्टल ओपन झाल्यावर तीन रेषेचा जो मेनू दिसेल त्याला क्लिक करा. नंतर दोन नंबरचा पर्याय Awassoft वर जाऊन रिपोर्ट या नावावर क्लिक करा. तिथे एकदम खाली स्क्रोल करून जा. तिथे निळ्या जे निळ्या बॉक्स मध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट नाव दिसते त्यातील बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या पर्यायाला निवडून घ्यायचे आहे.
नंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल. आता वर्ष निवडून प्रधानमंत्री आवास योजनेला क्लीक करा. एक कॅपच्या भरून सबमिट बटनावर क्लिक करून घायचे आहे. आपण हि जे घरकुल योजना यादी बघण्याची ऑनलाईन प्रक्रिया बघितली त्यानुसार तुम्ही ऑनलाईन चेक केले तर तुमच्यापुढे तुमच्या गावातील पात्र नागरिकांची Gharkul Yojana New List येईल. जे कि तुम्ही तुमच्या मोबाईल मधेच सेवा करून घेऊ शकता.
निष्कर्ष
तुम्ही किंवा तुमच्या परिसरातील कोणीही घरकुलासाठी अर्ज केला तर त्यांच्या पर्यंत हि सर्व माहिती नक्की पोहोचवा. यादी मध्ये तुमचे नाव नसे किंवा अन्य काही अडचण आली असेल तर तुमच्या ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जाऊन भेट नक्की द्या. तसे तर आपण या आर्टिकल मध्ये घरकुल यादी कशी बघायची याची सविस्तर माहिती बघितली आहे. धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More