Rani Durgavati Yojana Maharashtra 2025: राज्यातील गरीब आणि मागास प्रवर्गातील महिलांसाठी महाराष्ट्र शासन Rani Durgavati Yojana अंतर्गत स्वतःचा व्यवसाय करण्याकरता 100% अनुदानित रक्कम देणार आहे. जर महिला एकटी स्वातंत्र्य या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्यांना योजनेच्या माध्यमातून 50,000 दिले जाईल. तसेच महिलांचा गटाला 7.50 लाख रुपयांचे अनुदान मिळणार.
मिळालेल्या रकमेचा उपयोग हा महिला त्यांच्या गावात किंवा शहरातच स्वतःचा व्यवसाय उभारून चांगले उत्पादन करू शकतील. तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी आर्थिक मदत हवी असेल, तर खालील माहिती पूर्ण वाचा.
Also Read: Aai Karj Yojana: 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार फक्त याच महिलांना, बघा संपूर्ण माहिती.
Rani Durgavati Yojana Maharashtra काय आहे?
हि योजना खास महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या हेतूने सुरु करण्यात आली म्हणूनच शासनाने या योजनेला शूर विरांगणाचे नाव Rani Durgavati Yojana Maharashtra दिले आहे. मंडळी, राणी दुर्गावती ह्या शौर्याचे, न्यायाचे आणि धैर्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच हीच त्यांची ओळख सुद्धा आहे.
आपल्या परिसरात गावात आपण बघत असाल कि महिलांची स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची फार इच्छा असते. परंतु आर्थिक अडचनिमुळे किंवा कर्ज काढले तर त्याला भरावे लागणाऱ्या व्याजाच्या भीतीमुळे व्यवसायाची इच्छा हि इच्छाच राहून जाते. परंतु आता महाराष्ट्र शासनाने महिलाना उद्योजिका बनवण्यासाठी Rani Durgavati Yojana Maharashtra राबवण्यास सुरुवात केली आहे.
या मार्फत पात्र महिलांना 50,000 तर महिलांच्या गटांना 7.50 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत 100% अनुदान स्वरूपात केली जाते. अर्थात सान्गायचे तात्पर्य हेच कि लाभ घेतल्यानंतर शासनाला एक रुपयाचीसुद्धा परतफेड करण्याची गरज नाही. जेवढे पैसे मिळाले ते सर्व तुम्ही तुमच्या व्यवसायाला मोठे करण्यासाठी वापरू शकणार आहात.
राणी दुर्गावती योजना राबवण्यामागील उद्देश
आदिवासी आणि इतर गरीब महिलांना व्यवसाय करण्यासाठी पूर्णपणे आर्थिक मदत करणे. तसेच नवीन तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करणे. ज्यामुळं राज्यातील हाबेरोजगार हजारो बेरोजगार तरुणींच्या हाताळला काम मिळालेलं आणि तरुणींचा बरोजगाराचा दर कमी होईल. तसेच वेगळ्या वेगळ्या व्यवसायिक क्षेत्रामध्ये महिला संक्षम बनतील.
योजनेचा लाभ घेऊन करता येणारे उद्योग
- भाजीपाला विक्री
- किराणा दुकान
- हस्तकला उद्योग
- शिवण काम
- पोल्ट्री फार्म
- डेरी व्यवसाय
- खाद्यपदार्थ उद्योग
- शेतीचे उद्योग
- ब्युटी पार्लर
योजनेसाठीचे पात्रता निकष व अटी
Rani Durgavati Yojana Maharashtra चा लाभ महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे. अर्जदार महिला जर का आदिवासी समुदायातील असेल, तर त्या महिलेस अधिक प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज करतांना महिलेला अर्ज सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे गरजेचे असेल. अर्जदार महिलेस स्वतःचा व्यवसाय किंवा गटाने व्यवसाय करण्यासाठी उत्सुकता आणि जिद्द असावी. मंडळी, राणी दुर्गवती योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला लाभ दिला जाईल.\
राणी दुर्गावती योजनांसाठी अर्ज कसा करावा?
मंडळी, Rani Durgavati Yojana Maharashtra करता अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आणि सरळ असून, या योजनेकरिता अर्ज हे ऑफलाईनच करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन राणी दुर्गावती योजनेही अर्ज घ्यायचं आहे. त्याअर्जांत त्या संपूर्ण वयक्तिक आणि कुठला व्यायवसाय कार्याचा याची विस्तारपूर्वक माहिती भरावयाची आहे. शेवटी तो अर्ज आणि त्याच्यासोबत जे आपण वरती कागदपत्रे सांगितली आहे ते संबंधीत अधिकारी यांच्याकडे सबमिट करून अर्जाची पोचपावती घ्यावी लागेल.
काही दिवसातच तुमच्या अर्जाची पडताळणी करून कोणती महिला या योजनेच्या अनुदानाकर्ता पात्र आहे याची यादी लावण्यात येईल. त्या यादीनुसार पात्र महिलेस व्यवसायाकरता आर्थिक रक्कम प्रदान केली जाईल.
निष्कर्ष
महिलांना करी लागली नाही तर त्या एकदम स्वतःला कमकुवत समजू लागतात. तसे न करता स्वतःचे अस्तित्व बनवण्यासाठी उद्योग क्षेत्रमढे येण्याकरता सरकारची हि अतिशय महत्वाची योजना आहे. कारण एकदा योजनेअंतर्गत लाभ घेतलं तर ते सर्व रक्कम आपलीच असणार आहे. त्यामुळे अजूनही वेळ आहे या योजनेचा लाभ घेऊन स्वतःच स्वावलंबी बना, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More