सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RBI Bharti 2025 अंतर्गत 120 पदांसाठी भव्य भरती, संधी चुकवू नका

RBI Bharti
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

RBI Bharti 2025: राज्यातील अनेक उमेदवारांचे भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असतील. तर तुमचे स्वप्न आता साकार होऊ शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अंतर्गत 120 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या ईच्छुकांसाठी हि सुवर्णसंधी आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारताची प्रमुख बँक आहे, जी देशातील बँकिंग प्रणालीचे नियमन करते. ही बँक नोटा जारी करते, त्यांचा पुरवठा नियंत्रित करते आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी चलनविषयक धोरणे बनवते. चला तर जाणून घेऊ या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आणि पात्रता काय राहणार आहे अशी संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

RBI Bharti Notification

RBI Bharti 2025 मुख्य तपशील

  • भरती विभाग: भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank Of India)
  • भरती प्रकार: सरकारी बँक नोकरी
  • श्रेणी: केंद्र सरकारच्या मान्यतेने
  • पदाचे नाव: अधिकारी ग्रेड ‘ब’ (डीआर) – सामान्य / आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग / सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग
  • एकूण पदे: 120 रिक्त पदे
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

🔶 पोलीस विभागात भरती सुरु, हि आहे शेवटची तारीख: Police Bharti 2025

शैक्षणिक पात्रता

अर्जदाराकडे खालीलपैकी एक शैक्षणिक पात्रता असावी.

  • पदवीधर (UG) आणि नंतर पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • B.Tech/B.E. किंवा तत्सम 4 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • सांख्यिकी, अर्थशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण किंवा संबंधित क्षेत्रातील पदवीधर असावा.
  • प्रोग्रामिंग कौशल्ये असणे आवश्यक.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. तुमची तयारी पूर्ण असेल तसेच तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.(https://www.rbi.org.in)
  • वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला “Careers” किंवा “Opportunities” विभागात अर्ज लिंक मिळेल.
  • ऑनलाइन फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क प्रत्येक विभागासाठी वेगळे राहू शकते त्यामुळे संबंधित विभागानुसार शुल्क भरा.

महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात नीट वाचावी.
  • भरतीसंबंधी गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी RBI ची राहणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2025.
RBI Bharti PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *