Marathwada Floods: मित्रांनो, सध्या पावसाळा सुरु तर आहे परंतु या वर्षीचा पावसाळा हा थोडा वेगळाच आहे. कारण यावर्षी देशभरात पावसाने रौद्ररूपच धारण केले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये पावसाने जरा जास्तच जनजीवन विस्कलिलीत केले असल्याचे चित्र आहे. कारण तिथे शेतात तर पाणी पोचलेच सोबत नद्यांना नाल्यांना महापूर आलेत ज्यामुळे गाव च्या गाव वाहून गेलेले आहेत.
पंजाब मध्ये सलमान खान ने खेळे दत्तक घेतलीत तर शाहरुख खानाने परावांना दत्तक घेतले आहे. यांच्या सोबतच अनेक सेलिब्रिटींनाही मदतीचे हात सामोरे केले आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सुरुवातील मोठी पूरजन्य परस्थिती निर्माण झाली होती. मात्र पावसाने मध्ये विश्रांती घेतल्यामुळे होणारी संकटे टळली गेली. परंतु आता परत पार्टीच्या पावसाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. विशेषता मराठवाड्यामध्ये तर महापूर सुरु झाले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांसोबतच सामान्य नागरिक सुद्धा अडचणींमध्ये आला आहे.
मराठवाड्यातील गावांमध्ये घुसले पाणी
आज तर दिवसभर येवडा पासून मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यात सुरु होता कि, तेथिल संपूर्ण जीवनमान विस्कळीत झालं आहे. मराठवाड्यातील वाहतूक तर ठप्प झालीच आहे सोबतच अनेक गावांमध्ये पाणी घुसून घरे पाण्यात गेलीत. हिंगोली, धाराशिव, जालना आणि बीड जिल्ह्याला पावसाने जणू झोडपूनच काढला आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरी नदीला पूर आलाय. त्यामुळे बीड मधील गेवराई तालुक्याती नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचा महापूर आलाय.
कुळज,उमापूर, राक्षसभवन, पांचाळेश्वर या गावांमध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे गावातील नागरिकांचे जीवन विस्कळीत तर झालेच सोबत गावांचे संपर्क सुद्धा तुटले आहेत. घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांचा राहण्याचा आणि खाण्याचा मोठा प्रश्न निर्मण झाला आहे. सोबतच पावसामुळे घरातील सर्व वस्तू सुद्धा कुचकामी झाल्या असल्यामुळे तेथील लोकांना मोठा संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे शासनाने याची दखल घेत तात्काळ मदत पोहोचवावी हीच अपेक्षा.
मराठवाड्यातील शेती गेली पाण्याखाली
मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, धरणाचे चार दरवाजे उघण्यात आलेत. तसेच विंदूसुरा नदीच्या पाणी पाताळॆतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलाय. तसेच हिंगोलित सतत दोन दिवसांपासून पाऊस येत असल्यानं शेतांमध्ये मोठे पाणी साचून राहिले. काही ठिकाणी तर संपूर्ण पिकच पाण्याखाली गेलय.
मुख्यता जिल्ह्यातील हळद पिकाला या पार्टीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शेतकरी म्हणतात कि आमचे पीक हे पाच फूट पाण्याखाली गेले आहे. अशावेळेला शेतकऱ्यांना काय करावा आणि कास जीवन जगावं हाच मोठा प्रसन्न उभा राहिलाय. तसेच शासनाने लवकर याची दखल घेऊन पंचनामे करावेत हि मागणी तिथी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकरी झाला हवालदिल
हिंगोलीतील बसमत तालुक्यामध्ये शेतीचे रूपांतर अक्षरशः तलावांमध्ये झालेले आहे. त्यामुळे कोणते पीक होते हे याचा अंदाज लावणे जवळपास कठीणच झाले आहे. तसेच हिंगोलीतील टेमबुर्णी गावामध्ये पाणी शिरलं त्यामुळे गावातील सर्वच नागरिकांचा संसारच रस्त्यावर आला आहे. तसेच मराठवाड्यातील संभाजीनगरच्या पैठणमध्ये सुद्धा हीच व्यवस्था बघायला मिळते आहे.
तसेच पैठणच्या नांदर मन्नरात सर्वाधिक 208mm पावसाची नोंद झाली आहे. काही शेतकऱ्यांनाच पाण्यात कांदा वाहून गेलाय तर काहींचे घरच वाहून गेले आहे. अशा वेळेला शेतकरी हवालदिन नाह होणार तर काय करणार. कारण सर्व वर्षाचं नियोजन हे पिकांवर ठरवलेलं असत. कर्ज काढून पेरणी करता पिकाला वाढवता आणि हाती आलेलं पीक मात्र पाण्यामध्ये वाहून जात.
निष्कर्ष
जगाचा पोशिंदा मानला जाणार आपल्या देशातील शेतकरी सध्या फार मोठा नैसर्गिक संकटात अडकलाय. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात गोदावरीसारख्या मोठ्या नदीला पूर आलाय. ज्यामुळे हजारो एक्कर शेती पाण्याखाली गेली आहे. अशा शेतकऱ्यांचा वाली कोण? हाच मोठा प्रश्न उभा राहिलाय. सरकार यांनाही मदत देणार का? याची वाट संपूर्ण जनता बघती आहे.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More