Charity Commissioner Maharashtra Bharati: नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयार करत असणाऱ्या युवकांना आता धर्मादाय आयुक्त कार्यालयात सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. हो धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र (Charity Commissioner Maharashtra Bharati) अंतर्गत विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज भरण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी पात्रता निकष काय आहेत, निवड प्रक्रिया कशी असणार आणि अर्ज करण्याची शेवटची किती आहे. याविषयी आणि या नोकरीचा अर्ज कुठं भार्याचा याची सुद्धा संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे बघुयात.
Charity Commissioner Maharashtra Bharati- एकूण पद
मित्रानो, जे विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वपन बाळगत आहे, त्यांचे स्वप्न या भरतीमध्ये पूर्ण होऊ शकणार आहे. कारण Charity Commissioner Maharashtra Bharati हि गट ब (अराजपत्रित) व गट क च्या पदांसाठी होणार आहे. ज्यामध्ये एकूण मिळून 179 पदे भरण्यात येणार आहे. या भारतीकरता काही पात्रता निकष आणि अनुभवाच्या अति लादण्यात आल्या आहे, त्या पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. त्यामुळेच अर्जदाराने या भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यावी ज्याची PDF आम्ही खालीलप्रमाणे देऊ.
विविध पदांनुसार रिक्त जागा
धर्मादाय आयुक्तालअंतर्गत अधिकृत जाहीर केलेल्या 179 जागांमध्ये विविध विविध प्रकारचे पद आहेत. ज्यामध्ये विधी सहायक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक इत्यादी पदांचा समावेश आहे. यांपैकी विधी सहायक च्या 3 जागा, लघुलेखकांच्या 2 जागा, लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) च्या 22 जागा, निरीक्षक पदाच्या 121 जागा आणि वरिष्ठ लिपिक पदाच्या 31 जागा भरण्यात येणार आहेत.
निवडपद्धत
धर्मादाय आयुक्तालअंतर्गत जी भरती घेतली जात आहे त्यांच्या उमेदवारांची निवडप्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षेमार्फत केली जाणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम बघतला तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, अंकगणित, तर्कशास्त्र यासोबतच विषय विशिष्ट ज्ञानावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, विधि सहायक,निरीक्षक, व वरिष्ठ लिपिक या पदांकरता 200 गुंणाची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. जिचा कालावधी हा 120 मिनिट असेल. तर लघुलेखाचे जे पॅड आहे त्यासाठी परीक्षा हि 120 गुणांची असणार आहे. यासाठी एक तासाचा कालावधी देण्यात आला आहे. हे परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 80 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम हा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आला असून ती नक्की बघावी.
महत्वाच्या तारखा
- अर्जाची सुरुवात: 11 सप्टेंबर 2025
- शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2025
अर्जपद्धती आणि परीक्षा शुल्क
3 ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या रात्री 11:55 पर्यंत उमेद्वार Charity Commissioner Maharashtra Bharati साठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे. अर्जासोबत आवश्यक असणारी जी कागदपत्रे, जी PDF मध्ये देण्यात आलेली आहेत ते उपलोड करणे आवश्यक असेल. उमेदवार खुल्या प्रवर्गातील असल्यास त्याला 1000 रुपये परीक्षा शुल्क भरावयाचा आहे आणि उमेदवार मागास किंवा अनाथ प्रव्रगतील असेल तर त्यांना 900 रुपयेच शुल्क भरावा लागेल. तसेच जर का अर्जदार हा माझी सैनिक किंवा दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी मात्र एक रुपयाही परीक्षा शुल्क नसेल. तसेच ज्यांनी परीक्षा शुल्क भरले त्यांचे कोणत्याही परिस्थिती मध्ये भरलेले परत मिळणार नाही.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरातीची PDF | येथे क्लिक करा |
भरतीचा अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
निष्कर्ष
गट बी च्या अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ लिपिक आणि निरीक्षक पदापर्यंचे पदे धर्मादाय आयुक्तालयाच्या 2025 च्या भारतीमार्फत भरण्यात येत आहे. आज आपण या आर्टिकल मध्ये या सर्व पदांसाठीची अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली माहिती बघितली आहे. जी कि इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली आहे, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More