Banjara Protest: बंजारा समाजाचे ST मधून आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु

Banjara Protest
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Banjara Protest: राज्यात समाजा समाजामध्ये मोठा संघर्ष सध्या सुरु आहे. कधी मराठा-ओबीसी तर कधी आदिवासी-धनगर असा वाद आपण मागील काही वर्षांपासून बघत आलोय. मात्र यावर्षी एका वेगळ्याच वादाला तोंड फुटलंय, ते म्हणजे बंजारा विरुद्ध आदिवासी.

मित्रांनो, राज्यभर मराठा विरुद्ध कुंबी असा संघर्ष सुरु असतांना हा एक नवीन संघाचं आपल्याला हैद्राबाद गॅझेट मूळ बघायला मिळत आहे. यामुळे राज्यातचिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या महापुरुषांचा महाराष्ट्र हळू हळू बिहार बनण्याच्या वाटेवर तर नाही ना? हे मोठे प्रश्न चिन्ह सामान्य माणसाच्या मानत बनली आहे. आता हा बंजारा विरुद्ध आदिवासी वाद कसा निर्माण झाला आणि Banjara Protest का सुरु आहेत याची संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत.

Also Read: Maratha Aarakshan: मराठा आरक्षण सापडले कोर्टाच्या कचाट्यात, एकाच वेळेला मराठ्यांना दोन आरक्षण कसे, कोर्टाचा सवाल.

Banjara Protest कशासाठी करत आहेत?

मित्रांनो, नुकतेच मराठा बांधवांना OBC मध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेट चा जी-आर लागू केला. त्यानुसार ज्या मराठ्यांचे नातेवाईक हे OBC समाजामध्ये असतील आणि त्यांनी जर शिफारस पात्र दिले तर त्या मराठा बांधवाला OBC चे जातप्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हैद्राबाद गॅझेटनुसार मराठे हे ओबीसीच आहेत त्याच प्रकारे बंजारा समाजाची नोंद सुद्धा ट्राइब म्हणून असल्याची Banjara Protest वाल्यांची म्हणणे आहे. अर्थातच बंजारांना सुद्धा मरठयांना दिले जात आहे तसेच आरक्षण ST मधून मिळावे अशी यांची मागणी आहे. ज्याला धरून आज महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये Banjara Protest सुरु आहेत.

Banjara Protest Jalana
Banjara Protest कशासाठी करत आहेत?

जालना शहरात निघाला बंजारांचा मोर्चा

मराठवाड्यातील एक मोठे शहर म्हणून ओळख असलेले जालना शहरात आज Banjara Protest सुरु आहे. ज्यामध्ये सर्व बनजरा समाजातील महिला ह्या त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत आंदोलकरत आहेत.तिथे त्या महिलांची मागणी साफ आहे, कि आम्ही हैद्राबाद गॅझेट नुसार ST मध्ये येतो, तरी आम्हाला VJNT मधून का आरक्षण दिल गेलय? सोबतच इतर राज्यांमध्ये बंजारा समाज हा ST मधून आरक्षण घेतोय आणि आपल्या महाराष्ट्रात मात्र आम्हाला या पासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने आमची मागणी मान्य करावी.

बीड मधेही आंदोलनामुळे रस्ते भरले गच्च

बीड मध्ये बंजारा समाजाच्या वतीने मोठा मोर्च्या काढण्यात आला आहे. त्यात सुद्धा सर्वांची एकच मागणी आहे कि, आम्हाला आरक्षण हे ST मधूनच हवे आहे. जर सरकारने दिले नाही तर गावा गावातून मोठे आंदोलन निर्माण करू आणि मुंबईला उपोषला बसू. तसेच आज संपूर्ण बीड जिल्हा हा जय सेवालाल घोषनांनी दणाणूत गेला आहे. कारण येतेच एक विराट स्वरूप या मोरचने घेतले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.

महाराष्ट्रभर आंदोलने सुरु

बीड आणि जालनाचं नाही, तर परभणी आणि हिंगोली मधेही आंदोलने सुरु आहेत. परभणी मध्ये तर काही तरुण आमरण उपोषणावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात Banjara Protest सुरु आहेत. मागणी फक्त एकच आहे कि ज्याप्रकारे मराठ्यांना कुंबी बनवलं त्याचप्रकारे आम्हालासुद्धा आदिवासी बनवा आणि आरक्षण द्या.

तर एकीकडे महाराष्ट्रभर आदीवासी समाज सुद्धा आक्रमण होताना दिसतोय. आदीवासी समाजने आंदोलने करून बंजारा समाजाची जी मागणी आहे त्याला विरोध केला आहे. एवढेच नाही तर वकनाथ शिंदेंचे च्या एका मंत्र्याने तर आव्हाहनाचे केले आहे कि, जर सरकार आदिवासी मधून बंजारा समाजाला आरक्षण देत असेल तर मी सरकारमधून बाहेर पडेल.

निष्कर्ष

आरक्षण हे काही महाप्रसाद नाही कि कोणीही मागितले त्याला मिळून जाईल. परंतु ज्यांच्या हक्काचे आहे त्यान्ना मात्र ते मिळायलाच हवे. आरक्षण हे जो समूह सामाजिक मागास आहे फक्त त्यांच्यासाठीच देण्यात आले होते. त्यामुळे आता सरकारने दिलेले आरक्षण कितपत कोर्टात टिकेल आणि बंजारांना आदिवासी चे आरक्षण मिळणार का? यावर तुमचे मत काय? कंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *