Small Cause Court Mumbai Bharti: सरकारी नोकरीची तर इच्छा आहे परंतु शिक्षण कमी आहे? तर मग काळजी कशाला करता. मुंबई लघुवाद न्यायालयात भरती निघाली आहे. ज्यामध्ये 7 वी ते 10 वी उत्तीर्ण उमेद्वार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीचे प्रत्यक्ष अर्ज मागवण्यात येत असून यासाठी ऑफलाईन पद्धतीने किंवा स्पीड करता येणार आहे.
हि भरती प्रबंधक, लघुवाद न्यायालय, मुंबई अंतर्गत प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये पात्र उमेदवारांना 69 हजार पर्यंत पगार मिळणार आहे. या Small Cause Court Mumbai Bharti साठी अर्ज कोठेकरायचा, कोण या भरतीमध्ये पात्र असेल आणि कोणत्या पदांसाठी हि भाटी घेतली जात आहे, यांची सविस्तर माहिती आपण या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
Small Cause Court Mumbai Bharti- पदे व पात्रता
लघुवाद न्यायालय मुंबई अंतर्गत जी भरती जाहीर झाली आहे ती एकूण 12 रिक्त पदे भरण्यासाठी होत आहे. यामध्ये तीन वेगळे वेगळे पद असणार आहेत, ते पदे आणि त्यांची पात्रता काय आहे ते आपण खालील प्रमाणे बघुयात.
- ग्रंथपाल: या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता हि दहावी उत्तीर्ण आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच ग्रंथपाल शास्त्रात तरी पदवीका धारण केलेली असणे आवश्यक असेल.
- वाचमन: या पदासाठी किमान सातवीचे शिक्षण पूर्ण केलेले आसने आस्व्हयक आहे. तसेच मराठी भाषेचे पूर्ण ज्ञान असावे.
- माळी: या पदासाठी उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण लागेल.
वयोमर्यादा व वेतन
Small Cause Court Mumbai Bharti करता 18 ते 43 या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तसेच पात्र उमेदवारांना मासिक वेतन 21,700 ते 69,100 हजारापर्यन्त दिले जाणार आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने स्वतः जाऊन किन्वा स्पीड पोस्टाच्या साहाय्याने करावयाचा आहे. त्यासाठी पात्र अर्जदारांनी अधिकृत जाहीरातीच्या PDF मध्ये जो विशिष्ट अ मध्ये नमुना दिला आहे त्यातच अर्ज भरावा.
पात्र उमेदवारास ज्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्या पदाचे नाव ठराव आणि सुस्पष्ट अक्षरात बंद लिफाफ्यात टाकावे. आणि दिलेल्या पाट्यावर ते लिफाफा पाठवावा.
एखाद्या अर्जदारास जर वेगळ्यावेगळ्या पदासाठी अर्ज करावयाचे झाले, तर त्याला त्या पदांसाठीची वेगळी वेगळी अर्ज पाठवावी लागतील, याची नोंद घ्यावी.
पात्र उमेदवाराने आपला अर्ज हा घोषणापत्र व नमुने लघुवाद न्यायालय मुंबई यांचीजी अधिकृत वेबसाईट आहे. तेथून घ्यावा आणि फक्त A4 आकाराच्या चांगल्या कागदावर सुस्पष्ट अक्षरात भरायचा आहे. नोंदणीकृत स्पीड पोस्टाने विहित कालावधीच्या आत आपला अर्ज पोहोचायला हवा याची दक्षाता घ्यावी.
अधिकृत PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्वाच्या तारखा
आजपासूनच Small Cause Court Mumbai Bhartसाथीचे अर्ज सुरु झाले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 ला 5:30 वाजायच्या आत अर्ज स्वकारण्यात येणार आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई- 400 002
निष्कर्ष
4 वी, 7 वी, 10वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नौकरीचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी लघुवाद न्यायालय मध्ये मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत जाहिरातीची PDF बघावी, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More