Jalna Police Patil Bharti 2025: देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारी नौकरीच्या क्रेझ दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. मंग ते शिपायाची का असेना परंतु सरकारी नोकरी गरजेची आणि महत्वाची मानली जाते. त्यातच आता सरकारी नोकरीची मोठी भरती जाहीर झाली असून त्या पाठोपाठ राज्यभर पोलीस पाटील भरती सुद्धा निघण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, Jalna Police Patil Bharti साठी 15 सप्टेंबर 2025 अर्ज सुरु झाले आहेत. हि भरती यावर्षीची पहिली सर्वात मोठी 722 जागांची पोलीस पाटील भरती आहे. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज करावा.
Also Read: EPFO 3.0: दिवाळीपूर्वी 8 कोटींना दिलासा, EPFO पेन्शन ₹2500 करण्याचा मोठा प्रस्ताव चर्चेत
Jalna Police Patil Bharti– पद आणि पात्रता
ज्या विद्यार्थ्यांना पोलीस पाटील बनायचे आहे त्यांचे शिक्षण किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार स्थानिक ग्रामपंचायतीमधील रहिवासी असावा. ज्या उमेदवाराचे वय 25-45 या वयोगटातील त्यांनाच Jalna Police Patil Bharti 2025 साठी अर्ज करता येणार आहे. या भरती मध्ये जालना जिल्ह्यात एकूण 722 पदासाठी अर्ज मागवण्यात येत असून, त्यापैकी जालन्यामध्ये 185, अंबड मध्ये 183, परतूर मध्ये 153 आणि भोकांडर मध्ये 201 पद आहेत.
संपूर्ण वेळापत्रक
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु: 15 सप्टेंबर 2025
- शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
नोकरीचे ठिकाण आणि शुल्क
हि भरती जालना जिल्ह्याकरता असल्यामुळे नोकरीचे ठिकाण हे जालना सह जिल्ह्यातील अंबड, परतूर आणि भोकांडर मधील ग्रामीण भागामधील असणार आहे. या भरतीसाठी खुला प्रवर्गातील उमेदवारास 800 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारास 600 रुपये शुल्क लागणार आहे.
निवड पद्धत
पोलीस पाटील या पदासाठी सुद्धा एक सोपी 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये 80 गुंणाची लेखी परिक्ष असेल आणि त्यानंतर 20 गुणांची मुलाखत घेतली जाईल. त्यामुळे आत्ताच अभ्यासाला लागा आणि परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्ही अधिकृत PDF जाहिरातीत बघू शकता.
असा करा अर्ज
प्रत्येक गावातील महत्वाचे पद हे पोलीस पाटलाचे असते. या पदकरता जालना जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी तुम्हाला jalnapp.recruitonline.in या अधिकृत साईट वर जाऊन तुमचे खाते बनवावे लागेल आणि साइन इन करून घ्यायचे आहे. नंतर तुमच्यापुढे या भरतीचा अर्ज येईल तो योग्यरीत्या भरावा आणि त्यात रिक्त जागा निवडा. अर्ज भरनझाल्यानंतर फोटो आणि साइन सोबत इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील. नंतर तुमच्या पुढे शुल्क भरण्यासाठी क्यू- आर कोड येईल तो स्कॅन करून शुलक भरावा. सर्व झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून एकदा पेमेंट रेकाँसिलेशन झाल्यानंतर अर्ज तपासा आणि त्याची प्रीत काढून घ्या.
जाहिरातीची अधिकृत PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
हेल्पलाईन नंबर
Jalna Police Patil Bharti 2025 चा ऑनलाईन अर्ज करत असतांना काही अडचन येत असल्यास साहसानाने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून तुमचे अडचणीचे निवारण करून घेऊ शकता. त्यासाठी 9689911007 हा हेल्पलाईन नंबर दिला गेला आहे.
निष्कर्ष
गावातल्या गावातच राही सरकारी नोकरी करण्याची हि सुवर्ण संधी सद्यातरी जालना जिल्ह्यातीलंच युवकांसाठी आलेली आहे. लवकरच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील सुद्धा पोलीस पाटील भरती जाहीर करण्यात येईल, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More