IRCTC Ticket Booking New Rule 2025: भारतीय रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंगचा लाभ देशातील लाखो नागरिक घेतात. आतापर्यंत चालत आलेली तिकीट बुकिंग ची प्रक्रिया हि आता बदलवण्यात येत आहे. रेल्वे तिकीट ऑनलाईन बुकिंग चे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होण्याची घोषणा रेल्वे मंत्रांनी दिली.
या नवीन नियमानुसार, ट्रेनसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरु होताच पहिल्या १५ मिनिटांत केवळ आधार-प्रमाणित वापरकर्त्यांनाच सामान्य आरक्षण करता येईल. यामुळे तिकीट मिळवण्याची स्पर्धा वाढणार असून, प्रवाशांनी वेळेवर तयारी ठेवणे आवश्यक ठरेल.
IRCTC Ticket Booking New Rule | नवीन नियम काय आहे?
आत्तापर्यंत Tatkal बुकिंगसाठी आधार-प्रमाणन अनिवार्य आहे. परंतु आता हे नियम सामान्य आरक्षणासाठीही लागू करण्यात येणार आहेत. याचा उद्देश फसवणूक व तिकीट दलालांचे व्यवहार कमी करणे आणि तिकीट वितरण अधिक पारदर्शक बनवणे हा आहे.
उदाहरणः
अमरावती ते मुंबई दरम्यान चालणाऱ्या Amba Express साठी तिकीट बुकिंग १७ सप्टेंबर रोजी रात्री १२:२० वाजता सुरु होईल. त्यानंतरचे १५ मिनिट (१२:२० ते १२:३५) केवळ आधार-प्रमाणित वापरकर्त्यांसाठी राखीव असतील. जर तुमचे IRCTC खाते आधारशी लिंक नसेल तर या वेळेत तिकीट बुक करणे शक्य होणार नाही.
🔶 UPI Payment Refund: चुकीने तुमचे पैसे UPI मधून ट्रान्सफर झालेत का? ते परत मिळवण्यासाठी हे करा.
सामान्य तिकीट बुकिंगची प्रक्रिया
- तिकीट बुकिंग सुरू होण्याची वेळ: रात्री १२:२०
- तिकीट बुकिंग संपण्याची वेळ: रात्री ११:४५
- प्रवासाच्या तारखेपासून ६० दिवस आधी Advance Booking सुरू होते.
आधार व्हेरिफाइड वापरकर्त्यांसाठी फायदे
Indian Railways च्या नवीन नियमांमुळे तिकीट विक्रीची प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित होईल. फसवणूक करणारे आणि एकाच व्यक्तीकडे अनेक डुप्लिकेट कार्ड असलेले लोक आता तिकीट मिळवू शकणार नाहीत. त्यामुळे खऱ्या गरजू लोकांना तिकीट मिळवण्यात मदत होईल. तसेच तिकीट दलालांचे कामही कमी होईल आणि प्रवाशांना थेट आणि सोप्या पद्धतीने तिकीट मिळण्याची संधी वाढेल.
सणासुदीच्या काळातील तिकीट स्पर्धा
दिवाळी, होळी, छठ पूजा व लग्नसमारंभाच्या काळात रेल्वे तिकीटसाठी गर्दी वाढते. यावेळी तिकीट बुकिंग सुरू होताच काही मिनिटांत तिकीट संपुष्टात येतात. नव्या नियमामुळे आधार-प्रमाणित वापरकर्त्यांना सुरुवातीच्या १५ मिनिटांत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्याची शक्यता वाढणार आहे.
🔶 8th Pay Commission: सरकारी कर्मचारांसाठी आनंदाची बातमी, या दिवस पासून होणार पगारात वाढ
आधार प्रमाणन कसे करावे?
- IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपमध्ये लॉगिन करा
- ‘My Profile’ मध्ये जा आणि आधार कार्ड नंबर अपडेट करा
- OTP द्वारे आधार व्हेरिफाय करा
- यशस्वीरित्या व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमचे खाते आधारशी लिंक होईल
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रजिस्टर्ड मोबाईल नंबर
- IRCTC खाते माहिती
निष्कर्ष
१ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांमुळे Indian Railways तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित व व्यवस्थित होईल. आधार-प्रमाणन केलेले खाते असणाऱ्यांना आरक्षण सुरुवातीच्या १५ मिनिटांत प्राधान्य मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी लवकरात लवकर आपले IRCTC खाते आधारशी लिंक करून तिकीट बुकिंगची तयारी ठेवावी.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanacafe.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!