Driving License Apply Online होय तुम्ही बरोबर ऐकताय, आता ड्रायविंग लायसेन्स काढायला RTO मध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही. घरी बसल्या अर्ज करून ड्रायविंग लायसन्स मिळवू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) हे फक्त वाहन चालवण्यासाठीच नाही तर आज ते एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणूनदेखील वापरले जाते. यापूर्वी लायसन्स काढण्यासाठी RTO ऑफिसचे अनेक फेरे मारावे लागत असत. मात्र आता सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करून नागरिकांना मोठी सुविधा दिली आहे.
Driving License Apply Online | सरकारची नवी ऑनलाइन सुविधा
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) आता ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी बऱ्याच सेवा ऑनलाइन केल्या आहेत. लर्निंग लायसन्स आणि पर्मनंट लायसन्स तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. लर्निंग लायसन्सची परीक्षा देखील ऑनलाइन देता येईल. अर्ज भरने, कागदपत्रे अपलोड करणे, शुल्क भरणे आणि टेस्टसाठी स्लॉट बुक करणे हे सगळं काम ऑनलाइन होईल. फक्त ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठीच तुम्हाला RTO ऑफिसला जावं लागेल.
ड्रायव्हिंग लायसन्स का महत्त्वाचे?
- कायदेशीर परवानगी (Legal Document): लायसन्सशिवाय वाहन चालविणे हा गुन्हा आहे.
- ओळखपत्र (Identity Proof): बँकिंग, सरकारी सेवा व इतर ठिकाणी लायसन्स वैध ओळख म्हणून स्वीकारले जाते.
- विमा दावा (Insurance Claim): अपघात झाल्यास विमा मिळण्यासाठी वैध लायसन्स आवश्यक आहे.
- प्रवास सुविधा: लायसन्स असल्यास देशात कुठेही वाहन चालवू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार
- लर्निंग लायसन्स (Learning License): वाहन शिकण्यासाठी दिले जाते.
- पर्मनंट लायसन्स (Permanent License): ड्रायव्हिंग टेस्ट पास केल्यानंतर दिले जाते.
- कमर्शियल लायसन्स: ट्रक, बस, टॅक्सी चालविणाऱ्यांसाठी.
- इंटरनॅशनल लायसन्स: परदेशात वाहन चालविण्यासाठी.
🔶 Ration Card News: राशन कार्ड धारकांना खुशखबर.., आता मिळणार 1000 रुपये महिना
पात्रता (Eligibility)
लर्निंग लायसन्ससाठी
- 16 वर्षे: गिअरलेस टू-व्हीलर (50cc पर्यंत)
- 18 वर्षे: सर्व प्रायव्हेट वाहने
- 20 वर्षे: कमर्शियल वाहने
पर्मनंट लायसन्ससाठी
- वैध लर्निंग लायसन्स आवश्यक
- ड्रायव्हिंग टेस्ट पास करणे गरजेचे
Driving License Apply Online कसे करावे? (अर्ज प्रक्रिया)
- Parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइट वर लॉगिन करा
- “Driving License Services” निवडा, त्यानंतर आपला राज्य निवडा
- Apply Online वर क्लिक करा
- Learning License किंवा Driving License निवडा.
- फॉर्म भरा – नाव, जन्मतारीख, पत्ता इ. तपशील भरा.
- दस्तऐवज अपलोड करा – आधार कार्ड, पत्ता पुरावा, फोटो व स्वाक्षरी.
- शुल्क भरा – ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करा.
- स्लॉट बुक करा – टेस्टसाठी तारीख व वेळ निवडा.
- ऑनलाइन टेस्ट द्या (Learning License) – पास झाल्यावर लायसन्स मेल व पोर्टलवर मिळेल.
- ड्रायव्हिंग टेस्ट (Permanent License) – टेस्ट पास झाल्यावर लायसन्स पोस्टने घरी येईल.
शुल्क (Fees)
- लर्निंग लायसन्स: ₹200 – ₹500
- पर्मनंट लायसन्स: ₹500 – ₹1000
- स्लॉट बुकिंग: ₹50 – ₹100
निष्कर्ष
Driving License Apply Online 2025: आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO ऑफिसच्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या ऑनलाइन सेवेमुळे लर्निंग आणि पर्मनंट दोन्ही लायसन्स घरबसल्या मिळू शकतात. फक्त ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTO ला भेट द्यावी लागेल. ही सेवा नागरिकांसाठी वेळ व पैशांची मोठी बचत करणारी ठरत आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanacafe.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!