Aai Karj Yojana: 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार फक्त याच महिलांना, बघा संपूर्ण माहिती.

Aai Karj Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Aai Karj Yojana: महाराष्ट्र सरकारची माझी लाडकी बहीण योजनानंतर महिलांसाठी सर्वात मोठी योजना जर कोणती असेल तर ती आहे, आई कर्ज योजना. मंडळी, हि योजना महाराष्ट्र सरकाराणे याच वर्षी म्हणजे 2025 मधेच राबविण्याकरता मंजुरी दिली आहे.

महिला सशक्तीकरणाचा उद्देश सामोरे ठेऊन हि सुद्धा योजना राज्यातील फक्त महिलांसाठीच सुरु करण्यात आली आहे. राज्यातील ज्या महिला ह्या पर्यटन उद्योग क्षेत्रामध्ये करियर बनवण्याचा विचार करत आहेत खास त्यांच्यासाठी राज्यशासन पर्यटन विभागांतर्गत 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज देणार आहे. अर्थात पंधरा लाख रुपयावर जेवढेही व्याज होईल, ते सर्व महाराष्ट्र पर्यटन विभाग भरणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कमाल दहा हजार महिला लाभ घेऊ शकणार आहेत.

Also Read: Ladki Bahin Yojana July Update: पात्र बहिणींना मिळणार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 4500 रुपये?

Aai Karj Yojana Maharashtra संपूर्ण माहिती व उद्देश

राज्यातील भगिनींनो, आई कर्ज योजना जरी या वर्षीपासून राबवण्यात येत असली, परंतु या योजनेचा जीआर हा 2023 मधेच काढण्यात आला होता. या योजनेमार्फत ज्या महिला स्वतःचा व्यवसाय करन्यासाठी धडपडत आहे परंतु आर्थिक अडचणी मुळ त्यांना ठोस अशी पाऊल उचलता येत नाही आहेत. अशा महिलांना अतिशय महत्वाची आणि फायदेशीर हि योजना.

15 लाखाचे बिनव्याजी कर्ज जर आपण घेतले तर ते परत करण्यासाठी सात वर्षाचा मोठा कालावधी सुद्धा देण्यात आला आहे. राज्यातील महिलांना आई कर्ज योजनेद्वारे स्वतःचा व्यवसाय उभारणीसाठी कर्ज देऊन महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्याचा शासनाचं उद्देश आहे. योजनेचा लाभ घेऊन पर्यटन क्षेत्रामध्ये लाभार्थी महिला स्वतःचे हॉटेल, टूल्स ट्रॅव्हल एजन्सी तसेच इत्तर पर्यटनाशी पूरक उद्योग सुरु करू शकतात.

योजनेचा लाभ घेता येणारे उद्योग कोणते?

निवास आणि भोजन सुविधा

  1. होम स्टे
  2. लॉज
  3. रिसॉर्ट
  4. निवास आणि नास्ता

खाद्यसेवा व्यवसाय

  1. हॉटेल
  2. उपहारगृह
  3. फास्टफूड सेंटर
  4. बेकरी
  5. महिला कॉमन किचन

पर्यटन सेवा व्यवस्थापन

  1. टूर अँड ट्रॅव्हल एजन्सी
  2. ट्रान्सपोर्ट सेवा
  3. गायडींग सेवा
  4. क्रूझ सेवा

साहसी पर्यटन

  1. जलक्रीडा
  2. थरारक साहसी उपक्रम
  3. ग्रिरिभ्रमण

विशेष पर्यटन

  1. आदिवासी पर्यटन प्रकल्प
  2. कृषी पर्यटन
  3. निसर्ग पर्यटन

आरोग्य आणि वेलनेस सेवा

  1. योग केंद्र
  2. आयुर्वेद वेलनेस केंद्र

हस्तकला आणि स्मरणिका केंद्र

  1. स्थानिक हस्तकला केंद्र
  2. स्मरणिका केंद्र

प्रवास सुविधा

  1. हाऊस बोट
  2. कॅरॅव्हॅन
  3. टेन्ट
  4. ट्री हाऊस
  5. पॉड्स

महिलांचे उपक्रम

  1. महिलांच्या नेतृत्वातील कॅफे
  2. पर्यटन माहिती केंद्र
  3. टुरिस्ट डेस्क

योजनेच्या काही अटी आणि व्याजदर

आई कर्ज योजना या नावातच हि योजना कोणासाठी आहे हे स्पष्ट होते. या योजनेच्या अंतर्गत फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच 15 लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिले जाणार आहेत. ज्याला भरण्याचा कालावधी हा कमाल 7 वर्षापर्यंत असेल. जर हे कर्ज किंवा त्याचे हप्ते भरण्यास विलंब झाला, तर मात्र बाकीचे जे हि व्याज होईल ते लाभार्थ्याला स्वतः भरणे बंधनकारक असेल. मंडळी या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर 4.50 लाखापर्यंतचं व्याजाचा परतावा दिला जाणार आहे.

जेव्हा लाभार्थी संपूर्ण कर्ज भरतो तेव्हाच त्याच्या खात्यामध्ये कर्जाचे होणारे व्याजाचा परतावा करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आधी कुठल्याही सरकारी बँकेमध्ये कर्जासाठी अर्ज करावा लागेल. तिथे कर्ज मंजूर झाल्यावरच ह्या योजनेसाठी अर्ज करता येणार. लाभार्थ्याला वेळेवर कर्जाचे हप्ते बँकेत जमा करावे लागेल. जर वेळेवर हप्ते भरण्यात आले असेल तर योजनेअंर्गत 4.50 लाखाची जी व्याजाची रक्मम सरकार भरणार ते दिली जाणार नाही.

आई कर्ज योजनेचे पात्रता निकष (Eligibillity)

Aai Karj Yojana Maharashtra साठी अर्जदार महिला हि आधी तर पर्यटन विभागामध्ये पर्यटन व्यवसायातील एक नोंदणीकृत किंवा पंजीकृत केलेली असावी. ज्या व्यवसायकरिता कर्ज हवे आहे तो व्यवसाय महिलांच्या नावाने असणे आवश्यक आहे. वरीलप्रमाणे दिलेल्या यादीपैकी एक हा व्यवसाय असावा. व्यवसायामध्ये पन्नास टक्के ह्या महिला कामगार असाव्या लागतील. अर्जदारावर कुठलेही शासकीय कर्ज नसावे किंवा यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

आई कर्ज योजनेसाठी लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
  • प्रकल्प अहवाल
  • व्यवसायाचे फोटो
  • GST नंबर
  • FSSAI परवाना
  • बँकेचे खातेबुक
  • कर्ज मंजुरीचा पुरावा
  • प्रतिज्ञापत्र

असा करा आई कर्ज योजनेसाठी अर्ज

आई कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम पर्यटन विभागामधून LOI अर्थात उद्देशपत्र घ्यावे लागेल. ते घेऊन राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन कात्रजचा अर्ज भाव लागले. तेथे कर्ज मजूर झाल्यानंतर पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईट maharashtratourism.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

निष्कर्ष

महिलांना पर्यटन व्यवसायामध्ये स्वतःची ओळख आणि अस्तित्व निर्माण कारण्यासाठी आई कर्ज योजना एक मोठी संधी असणार आहे. योजनेचा लाभ घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय मोठा करू शकणार आहेत. जर तुम्हाला सुद्धा 15 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज मिळवायचे असेल तर आर्टिकल मध्ये सांगितलेली सर्व माहिती बघा आणि तसा अर्ज करा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *