Antarjatiya Vivah Yojana Maharashtra: आंतरजातीय विवाह केल्यास शासन देणार 3 लाख रुपये, असा करा अर्ज

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra: आपण सामाजिक जीवन जगत असतांना, मुलाचे लग्न किंवा मुलीचे लग्न हे स्वतःच्याच जातीतील व्यक्ती सोबत केले जाते. इत्तर जातीमध्ये जर मुलाने किंवा मुलीने लग्न केले तर संपूर्ण नातेवाईकांसोबत समाजाचा सुद्धा विरोध होतो.

कधी कधी तर सैराट फिल्म मध्ये जो शेवट दाखवला तास सुद्धा शेवट अंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याचा आजही बघायला मिळतो. मात्र जरी समाज या गोष्टींच्या विरुद्ध असेल तरी शासन मात्र आंतरजातीय विवाहाचे संपूर्ण समर्थन करते. म्हणून Antarjatiya Vivah Yojana Maharashtra च्या माध्यमातून संरक्षणसोबतच आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास मिळणार 3 लाख रुपये.

Also Read: Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana: उच्च शिक्षणासाठी मिळणार प्रति वर्ष 60 हजार रुपये शिष्यवृत्ती, लवकर करा अर्ज

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra संपूर्ण माहिती आणि उद्देश

मित्रांनो, आंतरजातीय विवाह योजना हि महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबविली जाते. हि योजना अनुसूचित जाती नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु केली आहे. या योजनेचे उद्देश हे अंतरजातीय विवाहाला प्रोत्साहित करणे हे आहे.

ज्यामुळे समाजात जी विषमता काही समाज कंठकांनी पसरवली आहे, ते संपुष्ठात येईल आणि सर्व धर्म समभावाची भावना सर्व जाती धर्मांच्या नागरिकांमध्ये उदयास येईल. मित्रांनो, नवीन आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्याला अनेक सामाजिक संकटांसोबत आर्थिक संकटांना सुद्धा सामोरे जाऊ शिकते. कारण कदाचित घरातील मोठे सुद्धा त्या जोडप्याला घराच्या बाहेर काढून टाकतील आणि घराच्या बाहेर राहणे म्हणजे खर्चामध्ये दुप्पट वाढ होते. म्हणून त्यांना मदत म्हणून राज्यसरकार 50 हजार ते 3 लाखापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक मदत देते.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती सोबतच अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर विशेष मागास असलेल्या समुदायातील व्यक्ती घेऊ शकणार आहे.

Antarjatiya Vivah Yojana Eligibility- पात्रता आणि अटी

आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुलाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कारण या योजनेअंतरागत फक्त महाराष्ट्रातीलच नवविवाहित जोडप्यांना पात्र करण्यात येईल. विवाह करणाऱ्या जोडप्यामधील कोणीही एक अनुसूचित जातीमधील असायला हवा. योजनेचा लाभ घेण्याकरता ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

आंतरजातीय विवाह झाल्यानंतर कमाल तीन वर्षाच्या आत अर्ज केला असेल तरच योजनेचा लाभ दिला जाईल. ज्या जोडप्यांचा विवाह हिंदू अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष अधिनियम 1954 अंतर्गत झालेला असेल त्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार.

अर्जदाराचे बँकेत खाते असायला हवे आणि त्याला आधार लिंक केलेले असावे. लग्न झालेल्या युवकाचे वय किमान 21 आणि युवतीचे किमान वय हे 18 असायला हवे. ज्या जोडप्याने आंतरजातीय विवाह हे कोर्टामध्ये केले असेल त्यांनाच लाभ दिला जाईल. तसेच अर्जदाराचे याआधी कुठल्याही विवाह योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra Documents- कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • दोघांचेही जातीचे दाखले
  • कोर्टाचे मॅरेज प्रमाणपत्र
  • बँक खातेबुक
  • मोबाईल नंबर
  • मेल आयडी
  • चार पासपोर्ट फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • विवाह फोटो
  • विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  • दोन साक्षीदार
  • साक्षीदारांचे शपथ पत्र
  • वर आणि वधूचे जॉईन्ड बँक खाते

आंतरजातीय विवाह योजनेचे फायदे

नवविवाहित जोडप्याला नवीन संसार थाटण्यासाठी 3 लाखापर्यंत आर्थिक मदत मिळते. जर समाजातील एका जोडप्याचा जरी आंतरजातीय विवाह सफल झाला, तरी समजतील जातीभेदाचे विषमता कमी होण्यास मदत होईल. समाजाचा इत्तर जाती, धर्मांच्या नागरीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुधारेल. मिळालेल्या लाभाच्या रकमेतून नवं वधू आणि वर स्वतःचा छोटा मोठा उद्योग सुरु करून स्वावलंबी बनतील. तसेच इतरही नवयुवक आंतरजातीय विवाह करण्यास प्रेरीत होतील आणि जाती- जातींमध्ये सुरु असलेला संघर्ष कमी होण्यास मदत होईल. तसेच एकोणमेकांसोबत नटे जुडल्यानंतर एकोणमेकांप्रती आपुलकीची भावना निर्माण होईल.

आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज कसा करायचा?

जर तुम्ही आंतरजातीय विवाह करून तीन वर्षांपेक्षा कमी झाले असेल तर Antarjatiya Vivah Yojana Maharashtra अंतर्गत तुम्हाला अनुदान मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातुन योजनेचा अर्ज घेऊन त्यावर वधू आणि वर दोघांची संपूर्ण माहिती भरा आणि कागदपत्रांसह संबंधित कार्यालयात सबमिट करता येईल.

तसेच जर अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा झाल्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊन अर्ज करता येणार आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, जर तुम्ही आंतरजातीय विवाह केले आहे किंवा करण्याचा विचार करत आहात तर वरील आर्टिकल मध्ये जी संपूर्ण माहिती संगतीला आहे ती तुमच्या अतिशय कामाची असू शकते. आंतरजातीय विवाह म्हणजे समाजात क्रांतरी निर्माण करण्याचे काम आहे, ज्या शासन सुद्धा हि योजना राबवून पूर्णपणे समर्थन करते आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *