Bandhkam Kamgar Scholarship Yojana| बांधकाम कामगाराच्या मुलांना मिळणार 1 लाखापर्यंत शिष्यवृत्ती, अर्ज झालेत सुरु.

Bandhkam Kamgar Scholarship Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Scholarship Yojana Maharashtra 2025: बांधकाम कामगाराच्या कुटुंबातील सदस्यांसाठी सुद्धा काही योजना आहे, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा सुद्धा सर्वांगीण विकास होतो.

तर त्यांचे सरळ उत्तर असते कि “माझा बाप कामगार होता, माझा आजोबा सुद्धा कामगार होता आणि आत्ता मी सुद्धा कामगारच आहे. परंतु आता पुढील पिढ्या मात्र मोठे मोठे साहेबाच्या असतील कारण शासन या योजनेअंतर्गत कामगाराच्या मुलांना 1 लाखापर्यंत शिष्यवृत्ती हे शिक्षण घेण्याकरता देणार आहे. त्याचा लाभ कसा घ्यावा आणि योजनांची सविस्तर माहिती चला बघूया.

Bandhkam Kamgar Scholarship Yojana काय आहे?

इमारत बांधकाम कामगाराच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र शासनानं मार्फत इमारत बांधकाम कामगार व इतर कामगार मंडळाअंतर्गत हि योजना राबवण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून इयत्ता पालीपासून ते डिग्री चे शिक्षण घेणाऱ्यांना 2500 हजार रुपयापासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

शिक्षणाचा सर्वत्र व्यापार बनला आहे, याने आपण सुद्धा त्रस्त असेलच. त्यामुळे कामगारांना त्यांच्या पगाराच्या भरोशावर घर चालवणे आणि मुलं-बाळाचं शिक्षण पूर्ण करणे शक्यच नसते. कामगारांच्या मुलांना सुद्धा उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवण्याचे स्वपन सरकार या योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यास मदत करते.

बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचे उद्देश

राज्यातील गरीब नोंदणीकृत बांधकाम कामगार यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे. बांधकाम कामगाराच्या डोक्यावरील त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा ताण शिष्यवृत्ती देऊन कमी करण्यास मदत करणे. कामगार पाल्याचे उज्वल भविष्य बनण्यासाठी या योजनेचे उद्देश आहे.

कामगार स्कॉलरशिप योजनेच्या लाभाचे स्वरूप

स्कॉलरशिप कालावधी रक्कम
1) पहिली ते सातवी 2,500 रुपये.
2) आठवी ते दहावी 5,000 रुपये.
3) अकरावी ते बारवी 10,000 रुपये.
4) पदवीचे शिक्षण 20,000 रुपये.
5) पदवीत्तर शिक्षण 25,000 रुपये.
6) अभियांत्रिकी शिक्षण 60,000 रुपये.
7) वैद्यकीय शिक्षण 1,00,000 रुपये.
8) MSCIT कोर्स मोफत

बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेची पात्रता

नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे पाल्य हे या योजनेसाठी अर्ज करू शकतात. फक्त त्याच्या पालकांनी आईने किंवा वडिलांनी किमान नव्वद दिवस तरी कामगार म्हणून काम केलेले असणे बंधनकारक आहे. त्याचा प्रकारे नवी आलेल्या माहिती नुसार त्यांची बायोमेट्रिक मध्ये हजेरी सुद्धा लागलेली असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ कामगाराच्या पहिल्या दोन अपत्यांनाच दमिलू शकतो.

स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधार लीक असलेले खातेबुक
  • बांधकाम कामगार ओळखपत्र
  • राशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • शाळेत/ विद्यालयात/विद्यापीठाची प्रवेश पावती
  • बोनाफाईट सर्टिफिकेट
  • मागील वर्षाची मार्कशीट
  • मोबाईल नंबर
  • चार पासपोर्ट फोटो

बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा अर्ज कसा करावा?

मित्रांनो, जत तुम्ही बांधकाम कामगार आहात आणि तुमच्या पाल्याकरिता तुम्हाला Bandhkam Kamgar Scholarship Yojana चार्ज फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईट mahabocw.in वरती जाऊन योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. नंतर त्या फॉर्म मध्ये तुमची आणि पाल्याची सर्व माहिती भरावी लागणार आहे आणि संबंधित इमारत व बांधकाम कामगार विभागामध्ये किंवा तालुका सुविधा केंद्रात सबमिट करावा लागेल.

निष्कर्ष

प्रत्येक पालकांना वाटत कि आपले मुलं हे चांगले शिकावे आणि उच्च पदी पोहोचावेत परंतु आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही, मात्र आता शासनांच्या सहकार्याने हे स्वप्न सत्यात उतरवता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *