Banjara Vs Aadivasi: ST आरक्षणवरून बंजारा आणि आदिवासी मधील वाद गेला विकोपाला

Banjara Vs Aadivasi
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Banjara Vs Aadivasi: महाराष्ट्राची दिशा दिवसेंदिवस बदलत चालली आहे. पूर्वी जसा महाराष्ट्र होता तस्सा काही राहिलेला आता दिसत नाही. कारण प्रत्येक समाज हा संघर्ष करतोय, समाजासमाजात जातीजाती भांडणे लागलीत त्यामुळे संपूर्ण राज्याचे वातावरण हे दूषित झाले आहे.

महाराष्ट्राचा विकास तर राहिलाच जागेवर परंतु दररोज सरकारला वेगळ्या वेगळ्या आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे. मित्रांनो, आपला देश हा जगातील सर्वचत मोठी लोकशाही असलेला देश जरी असला तरी मात्र अजूनही नागरिकांना जे हक्क आहेत ते मिळताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता सर्व समाज आक्षण मिळवण्यासाठी किंवा वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरतांना आपण पाहत आहोत. या शिवाय पर्यायसुद्धा राहलेला नाही आहे.

कारण जर जीवनात पुढे जायचे असेल सर्वागीण विकास करून घ्यायचा असेल तर पैसे लागतो आणि सरकलं शेताच्या पिकाला योग्य भाव देत नाही आणि वरून निसर्ग पीक चांगले यायला लागले ते ते टिकू देत नाही. यामुळे सर्वांना सध्या विकास करण्याचा एकच पर्याय दिसू लागला ते म्हणजे आरक्षण.

Also Read:Banjara Protest: बंजारा समाजाचे ST मधून आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरु

Banjara Protest- आरक्षणासाठी बंजारा झाला आक्रमक

आज जालन्यात बंजारा समाजाचा महासागरच ओलांडला होता. त्याच सोबत जिल्ह्या जिल्ह्यात मोठे मोर्चे बंजारा समाजच्या वतीने करण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याधिकाऱ्यांना ST मध्ये आरक्षण देण्याकरता निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले आहेत. मुद्दा एकाच होता ST मधून आरक्षण. संपूर्ण महाराष्ट्रात बनजर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मुलाबाळांसहित महिला सुद्धा या आंदोलनात त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत समाविष्ट झाल्या आहेत.

Banjara Vs Aadivasi Protest
Banjara Vs Aadivasi: ST आरक्षणवरून बंजारा आणि आदिवासी मधील वाद गेला विकोपाला

आदिवासी सुद्धा काढत आहेत मोर्चे

एकीकडे बंजारा ST मध्ये येण्यासाठी आंदोलन करतोय तर दुसरीकडे आदिवासी समाज हा आमच्या ताटांध्ये अतिक्रमण करण्यासाठी कोणीही येऊ नये या साठी लाँग मार्च काढत आहेत. अर्थातच ज्या प्रकारे OBC मंत्र्यांच्या आरक्षण मिळण्याबाबत विरोध करत होता त्याच प्रकारे आता आदिवासी सुद्धा रस्त्यावर उतरला असल्याचे चित्र आपल्याला दिसते आहे. त्यांची मुख्य मागणी हीच आहे कि धनगर समाज आणि बंजारा समाजाला ST मधून आरक्षण दिले जाऊ नये. त्यासाठी आदिवासी समजणे सुद्धा जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलनाणे लाथा देण्यास सुरुवात केली आहे. अशा पद्धतीने Banjara Vs Aadivasi संघर्ष पेटला गेला आहे.

आदिवासी आणि बंजारा समाज आमने सामने

आज राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जी आरक्षणासाठी आंदोलने झाली त्यामुळं सरकारी झोप मात्र नक्कीच उडाली असेल. कारण Banjara Vs Aadivasi असा मोठा संघर्ष जो निर्माण झाला आहे ते सध्या तरी शांततेच्या स्वरूपतच आहे. परंतु जेव्हा उग्र रूप घेईल तेव्हा मात्र सरकार उलथापालथ होईल हे नक्की. आज हिंगोली मध्ये आणि नंदुरबार मध्ये मोठ्या संखेन बंजारा समाज रस्त्यावर उताराला होता त्यांच्या विरोधात आदिवासी समजणे सुद्धा मोर्चे काढले आणि दोन्ही मोर्चे आमनेसामने आल्यामुळे घोषणांच्या आवाजाने दोन्ही जिल्हे दणाणले गेले आहेत.

आदिवासी आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी

आदिवासी नेते आणि एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेचे आमदार आम्शा पडवी यांनी राजीनामा देण्याचा सरकारला अल्टिमेटच दिला आहे. त्याचे झाले असे कि, बंजारा समाज आणि धनगर समाज हा ST मधून आरक्षण मागत आहे. परंतु आदिवासी समाजाचा यांच्या या मागणीला जोरदार विरोध आहे. त्यामुळेच जर का सरकारने मराठ्यांसारखं बंजारा आणि धनगराला जर ST मध्ये सामावून घेतलं तर सर्व पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्यामुळे सरकार दोन्ही कडून फसले असेच दिसते आहे.

बंजारा समाजाची नेमकं मागणी काय?

मित्रांनो, मराठ्यांसाठी जे महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू केले आहे. त्यामध्ये मराठ्यांचा तर OBC म्हणून नोंद आहेच सोबतच बंजारा समाजाची सुद्धा ST म्हणून नोंद असल्याचा दावा बंजारा समाजमार्फत केला जातोय. त्यामुळे आम्हाला सुद्धा ST असल्याचे जात प्रमाणपत्र हवे आणि सोबत आरक्षण सुद्धा, अशी मागणी करत राज्यव्यापी आंदोलने सुरु आहेत.

निष्कर्ष

मराठ्यांप्रमाणे बंजारा समाजही प्रश्न सरकार मार्गी लावेल का? कि आणखी कुठला तोडगा काढण्यात येईल ज्यामुळे Banjara Vs Aadivasi संघर्ष थांबेल, हे भविष्यातच कडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *