Beauty Parlour Anudan Yojana: माणसाला स्वतःच्या जीवनात सर्वात महत्वाचं असते ते सुंदर दिसन. कारण आजकाल माणसाची ओळख हि त्याच्या स्वभावावरून नाही तर दिसन्यावरून लोक ठरवत आहेत. सोशल मीडिया चा दौर सुरु झाला आहे, जो जेव्हडा सुंदर दिसायला असेल तेवढेच त्या व्यक्तीचे फोल्लोवर्स वाढतील आणि त्यानुसर चांगली इनकम सुद्धा ते करू शकणार आहे.
माणूस कितीही सावळा असला तरी, त्याची सुंदर आणि स्मार्ट दिसण्याची इच्छा असतेच. त्यामुळे महिन्यातून दोन तीन वेळा मुलं आणि मुली हे पार्लर मध्ये जात असतात. तसेच जर कोणता छोटा मोठा प्रोग्रॅम असला तरी सुद्धा पार्लर मध्ये जाऊन सर्वात आधी चेहरा आणि केस व्यवस्थित करून घेण्याची पद्धतच जण आपल्या देशात बनली आहे. सांगायचे तात्पर्य हेच कि, आता ब्युटी पार्लर चा व्यवसाय हा खूप चांगली इनकम करणारा बनला आहे. त्यातच आता शासन सुद्धा Beauty Parlour Anudan Yojana राबवून हा व्यवसाय करण्यासाठी तरुण आणि तरुणींना प्रोतसाहित करत आहे.
Also Read: Aai Karj Yojana: 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार फक्त याच महिलांना, बघा संपूर्ण माहिती.
Beauty Parlour Anudan Yojana काय आहे?
राज्यातील महिला आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्रशासन नेहमी तत्पर असते, हे आपण मागील वर्षांपासून बघतीतलेच आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुनींना रोजगार निर्माण करून देण्यासाठी शासन Beauty Parlour Anudan Yojana अंतर्गत 50 हजाराचे अनुदान देत आहे. हि योजना आदिवासी विकास विभागामार्फ़त राज्यातील अनुसूचीत जमाती मधील महिलांना आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेऊन आदिवासी महिला स्वतःच्या गावामध्येच एक चांगला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु करून स्वतःचे उत्पादन वाढवू शकता.
ब्युटी पार्लर अनुदान योजनेचे उद्देश
राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती मधील महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी आर्थिक मदत करणे. राज्यातील बेरोगरीचे प्रमाण कमी करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे. बेरोजगारांच्या हाताला स्थानिक ठिकाणीच काम लावून देणे. ज्या महिलांच्या सावलीचाही पूर्वी विटाळ केला जायचा त्यांनाच आता व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक विकास करवून घेण्याची संधी या योजनेच्या मार्फ़त मिळते. जेणेकरून आदिवासी समुदायातील लाभार्थी कुटुंबाचा सर्वांगीण विकास होईल.
असा मिळणार योजनेचा लाभ
आमच्या भगिनींना सांगू इच्छितो कि, 50 हजाराची आर्थिक मदत Beauty Parlour Anudan Yojana अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना दिले जाते. मात्र या रकमेतील 85% रकम हि हि अनुदानित स्वरूपाची असेल तर 15% रकम हे लाभार्थ्याला पार्ट भरावी लागणार आहे. अर्थातच 42,500 रुपये हे अनुवाद स्वरूपात असेल तर 7,500 रुपये हे स्वतःच्या व्यवसाय व्यवस्थित सुरु केल्यानंतर परत करावी लागणार आहे, याची नोंदी सर्व अर्जदारांनी घेणे गरजेचे आहे.
पात्र महिलांना मिळणार मोफत प्रशिक्षण
योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी शासन अगदी मोफत ब्युटी पार्लरचे संपूर्ण प्रशिक्षण देणार आहेत. ज्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यायची, केसांना कशे सांभाळायचे,संपूर्ण मेकअप, वाढू आणि वारांचे मेकअप आणि तयारी कशी करून द्यायची याचे संपूर्ण प्रशिक्षण दिली जाणार आहे. यामुळे लाभार्थी स्वतःचे ब्युटी पाळराल चालवण्यास पूर्णपणे समर्थ बानू शकेल.
ब्युटी पार्लर अनुदान योजनेचे पात्रता निकष
ब्युटी पार्लरसाठी अनुदान मिळवण्याकरता महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या अनुदान योजनेसाठी फक्त महिलाच पात्र असणार आहे आणि त्यामध्ये जर महिला अर्जदार अनुसूचित जमातीमधील असेल तर तर त्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या अर्जदार महिला 18-55 या वयोगटातील असतील त्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल. तसेच संबंधित महिलेले ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- योजनेचा अर्ज
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- शिक्षणाचा पुरावा
- बँकेचे खातेबुक
- चार पासपोर्ट फोटो
- प्रशिक्षण प्रमाणपत्र
असा करा योजनेसाठी अर्ज
प्रिय भगिनींनो, Beauty Parlour Anudan Yojana साठी अर्ज हा तुम्हाला आदिवासी विकास विभागाकडे करावा लागतो. मग ते तुम्ही ऑफलाईन किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईट nbtribal.in वर जाऊन ऑनलाईन शुद्ध करून शकता. जर ऑनलाईन अर्ज करायचा असेवळ तर जेव्हा तुम्ही वेबसाईटच्या होम पेज ला जाता तेव्हा तिथे “नवीन नोंदणी अर्ज” असावा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. ब्युटी पार्लर अनुदान योजनेचा एक फॉर्म येईल ते भार आणि सबमिट करा.
आता तिथे तुमची नोंदणी तर झालेली आहे, परंतु प्रक्रिया अजून बाकी आहे. पुढील प्रक्रियेसाठी परत लॉगिन करा. मग एक नवीन डॅशबोर्ड येईल तिथे ब्युटी पार्लर अनुदान योजना असा पर्याय दिसेल त्यावर क्लीक करून योजनेच्या अर्जात माहिती भरा. नंतर तुम्हाला अनुदान मिळवण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील. ते उपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करता येईल. अर्ज सबमिट झाल्याझाल्या स्क्रीन वर एक सबमिट पावती येईल, ते अनुदान मिवण्यासाठी उपयोगाची आहे.
निष्कर्ष
आजच्या भागमभागींच्या युगात सर्व जनता हि आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असते. त्यामुळे स्वतःची काळजी घेण्यासाठी कोणालाही वेळ मिळत नाही. म्हणून सर्व एक दिवस सुटी काढून पार्लर मध्ये जात असतात. सरावात जास्त डिमांड असलेला व्यवसाय हा पार्लरचा व्यवसाय बनला असल्या कारणाने यांची कामे सुधाच्या खूप होते. म्हणू नवीन नवीन तरुणींनी या व्यवसायाकडे वळावे आणि स्वतःचे करियर बनवावे यासाठी शासन या योजनेमार्फत अनुदान देत आहेत.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More