Divyang Pension Yojana Maharashtra: दिव्यांग बांधवांना खुशखबर., आता मिळणार 2500 रुपये पेन्शन

Divyang Pension Yojana Maharashtra 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Divyang Pension Yojana 2025: मित्रांनो, या महागाईच्या काळामध्ये साधारण माणूस ज्याला दोन चांगले हात, पाय, डोळे आहेत ते सुद्धा जीवन जगण्यासाठी संघर्ष करतोय, तर मंग आपल्या दिव्यांग, अपंग बांधवांना किती धडपड करावी लागते याची सुद्धा जाणीव आपल्याला असेलच. कारण ज्या जीवनावश्यक वस्तू आपल्याला लागतात त्याच आमच्या दिव्यांग बांधवांना सुद्धा लागतातच कि राव. आणि त्यांना मात्र सरकार मदत मानून महिन्याला फक्त 1500 रुपयेच मानधन 2025 पर्यंत मिळत होते.

दिव्यांग बांधवांना आता मिळणार 2500 रुपये पेन्शन या आपल्या हेडींग प्रमाणेच लाभ दिला जाणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांनी या वर्षीच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशामध्ये घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी हेसुद्धा स्पष्ट केले आहे कि मिळणाऱ्या मानधनामध्ये 1000 रुपयांची वाढ केली गेली. अर्थात Divyang Pension Yojana Maharashtra मार्फत दिव्यांगांना 1500 ऐवजी 2500 रुपये पेन्शन दर माह दिली जाणार आहे.

Divyang Pension Yojana Maharashtra काय आहे?

दिव्यांग पेन्शन योजना महाराष्ट्र हि राज्यातील अपंग, दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत करण्यासाठी -सुरु केलेली कल्याणकारी योजना आहे. जी महाराष्ट्र सरकार मार्फ़त सामाजिक न्याय आणि विशेष सहायक विभाग महाराष्ट्रभर राबवित असते. पूर्वी अपंगांना महिन्याला 600 ते 1000 रुपयेच मानधन दिले जात होते.

नंतर ते वाढवून 1500 करण्यात आलेत. आता परत हि मानधनाची पेन्शन रक्कम वाढवून 2500 रुपये केली गेली आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी माझी आमदार आणि प्रहार चे अध्यक्ष वाचू भाऊ कडू आपल्याला नेहमी लढताना दिसतात. त्यामुळे या मानधनाच्या वाढीमध्ये त्यांचे विशेष योगदान असल्याचे मान्यच केले पाहिजे.

दिव्यांग पेन्शन योजनांचे चे उद्देश

ज्या आमच्या दिव्यांग बांधवांकडून कुठलेली काम होत नाही किंवा त्यांना अजूनही परिवारावर किंवा इतर कोणावर अवलंबूनच राहावे लागते, त्यांना योजनेमार्फत मानधन देऊन काही प्रमाणात का होईना पण स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न शासनांचे आहे. जेणेकरून त्यांना अधिक इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही आणि स्वतःची गरज स्वतः पूर्ण करू शकतील. अर्थात एकप्रकारे दिव्यांगांना योजना राबवून आत्मनिर्भर बनवणे हाच शासनाचं उद्देश समजला काहीच हरकत नाही.

योजनेचे होणारे फायदे

पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे दिव्यांग बांधवांना आता महिन्या 2500 रुपये पेन्शन मिळणार आहे. ज्यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी आणि मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी मदत होईल. दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी होतील त्यांना जास्त कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत महिण्याच्या महिन्याला मिळणारे मानधन हे डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

दिव्यांग पेन्शन योजनेची पात्रता निकष

जो अपंग व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल त्यालाच योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील अपंग बांधवांना अपात्र करण्यात येणार. अर्जदार जर महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही शासकीय कार्यालयात नोकरीवर असेल तर मात्र Divyang Pension Yojana Maharashtra चा लाभ त्यांना मिळणार नाही. त्याचप्रमाणे जे अर्जदार 18-65 या वयोगटातील अर्जदारालाच लाभ दिला जाईल. योजनेसाठ पात्र होण्याकरिता अर्जदार हा 40% अपंग असावा लागतो आणि त्याचे वार्षिक उत्पन्न हे 35 हजारापेक्षाही कमी असावे लागते, योजनेअंतर्गत 2500 रुपयाचा लाभ देण्यात येईल.

योजनेचा अर्ज करता असताना लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जन्माचा दाखला
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक खातेबुक
  • चार पासपोर्ट फोटो

असा करा योजनेचा अर्ज

Divyang Pension Yojana Maharashtra साठी अर्ज करत करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गावातील तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयामधून अर्ज प्राप्त करायचा आहे. आणि त्या अर्जात सर्व माहिती भरून तहसील कार्यालयात जमा करायचा आहे. तेथला अधिकारी तुम्ही अपंग पेन्शन योजनेकरिता सर्व पात्रता निकषांमध्ये बसता कि नाही हे चेक करून तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी नियमित पाठपुरावा सुद्धा करणे गरजेचे आहे.

निष्कर्ष

आज आपण या आर्टिकल मध्ये दिव्यांग पेन्शन योजनेविषयी ची खास नवीन अपडेट सहित संपूर्ण माहिती दिली आहे. त्यासोबत ज्या बांधवांना अर्ज कार्याचा असेल त्यांच्यासाठी कागदपत्रापासून ते अर्ज करण्यापर्यंतची सविस्तर माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तुम्हाला काही प्रश्न किंवा काही शंका असेल तर ते कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला विचारू शकता, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *