Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana: उच्च शिक्षणासाठी मिळणार प्रति वर्ष 60 हजार रुपये शिष्यवृत्ती, लवकर करा अर्ज

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana: आपल्या राज्यघटनेमध्ये सर्वच विध्यार्थ्यांसाठी अनेक विशेष तरतुदी आहेत. परंतु त्यावर अंमलबजावणी जेव्हा शासन आणि प्रशासन करेल तेव्हाच आपल्याला विविध योजनांचा लाभ घेता येईल. मित्रांनो आतापर्यंत आपल्याला वाटत होते, कि विशेष सवलती ह्या फक्त अनुसूचित जाती आणि जमातीमधील प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच आहेत.

परंतु तसे नसून इतर मागास प्रवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांसाठी सुद्धा Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana राबवली जाते. या योजनेच्यामाध्यमातून इतर मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दार वर्षी 60 हजार रुपयाची शिष्यवृत्ती राज्य सरकार देणार आहे. नेमही हि आधार योजना काय आहे आणि योजनेचे उद्देश काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे बघुयात.

Also Read: Bandhkam Kamgar Pension Yojana: कामगारांना मिळणार 12 हजार रुपये पेन्शन, बघा योजनेची संपूर्ण माहिती.

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana संपूर्ण माहिती आणि उद्देश

विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचा अधिकृत जीआर हा 23 डिसेंबर 2023 ला काढण्यात आला आणि जीआरच्यानुसार एका जिल्ह्यातील 600 मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 60 हजार शिष्यवृत्ती देण्यात येते. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रति वर्ष 21,600 विद्यार्थ्यांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, अशाच इत्तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्री बाई फुले आधार योजनेचा लाभ दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांच्या लाभाची 60 हजाराची रक्कम हि महाडीबीटी च्या माध्यमातून डायरेक्ट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येते.

आजकाल शिक्षण घेणे हे गरीब परिवातील मुलांना झेपावत नाही त्यामुळे ते शिक्षणच सोडून देतात. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या शहराच्या ठिकाणी राहण्याची, खाण्याची सोय व्हावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलाही आर्थिक तणाव येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेच्या लाभाचे स्वरूप

मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरातील विध्यार्थ्यांना मिळणारा लाभ

  1. भोजन भत्ता: 32,000
  2. निवास भत्ता: 20,000
  3. निर्वाह भत्ता: 8,000
  4. एकूण रक्कम: 60,000

महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ

  1. भोजन भत्ता: 28,000
  2. निवास भत्ता: 8,000
  3. निर्वाह भत्ता: 15,000
  4. ऐकून रक्कम: 51,000

जिल्हा किंवा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ

  1. भोजन भत्ता: 25,000
  2. निवास भत्ता: 12,000
  3. निर्वाह भत्ता: 6,000
  4. एकूण रक्कम: 43,000

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची पात्रता

या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी अर्जदार हा ओबीसी प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवासी असे आवश्यक आहे. तसेच जर अर्जदार अपंग असेल तर त्याच्या कडे कमाल 40% अपंग असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा असावे. जर विद्यार्थी अनाथ असेल तर त्याला महिला व बालकल्याण विभागाचे नष्ट असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर त्याला लाभ दिला जाणार नाही. लाभाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येईल त्यासाठी बँकेसोबत आधार लिंग असावे. जे विद्यार्थी गाव सोडून बाहेर ठिकाणी हॉस्टेल किंवा रूम करून राहून शिक्षण घेत आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ शासन देणार आहे.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • दहावी बारावीची मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • बँकेचे खातेबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज कसा करावा?

वरील माहिती वाचून तुम्हाला Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana नेमकी काय आहे हे समजलेच असेल. आता शेवटचा टप्पा म्हणजे योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन संबंधाची अधिकाऱ्याला भेट द्यावी लागेल. ते अधिकारी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याकडूनच योजनेचा अर्ज सुद्धा घ्यायचा असतो. नंतर भरलेल्या अर्जासोबत आपण वर बगितलले सर्व कागदपत्रे जोडा आणि समाजकल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे हा अर्ज सबमिट करा.

मित्रांनो, आधार योजनेचा जर सबमिट केल्यानंतर तेथील अधिकाऱ्याकडून पावती घ्यायला विसरू नका. कारण ती पावती तुम्ही या शिष्यवृत्ती योजनेतही अर्ज केल्याचे एक पुरावा असतो. नंतर तुमच्या आधार योजनेच्या अर्जाची तपासणी केली जाते आणि जर तुम्ही पात्र असाल, तर लाभाची रक्कम महाडीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा केली जाईल.

निष्कर्ष

विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मोठ्या शहरात चांगल्या कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घ्य्याचे असेल तर तुम्ही नक्की या योजनेचा लाभ घेऊन तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहामध्ये नंबर लागला नाही त्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हि योजना वरदान बनू शकते. आम्ही या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती नक्की तुमच्या ओबीसी मित्रांपर्यंत पोहोचावा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *