EPFO 3.0: कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या EPFO 3.0 इनिशिएटिव्ह अंतर्गत मोठे बदल आणण्याची तयारी करत आहे. या नव्या योजना लागू झाल्यास 8 कोटींहून अधिक कर्मचारी सदस्यांना दिवाळीपूर्वी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली 10 आणि 11 ऑक्टोबरला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक होणार आहे. या बैठकीत पेन्शन वाढ व UPI-ATM द्वारे PF Withdrawal सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव चर्चा होणार आहे.
EPFO 3.0 अंतर्गत दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांना बँकेसारख्या सुविधा देण्यासाठी EPFO 3.0 नावाची नवी योजना आणण्याची तयारी करत आहे. या योजनेमुळे PF Withdrawal प्रक्रिया अधिक सोपी व वेगवान होणार आहे, तसेच पेन्शन वाढीचा लाभही मिळण्याची शक्यता आहे.
PF Withdrawal आता UPI व ATM द्वारे शक्य होणार
सध्याच्या काळात PF मधून पैसे काढण्यासाठी NEFT किंवा RTGS चा उपयोग केला जातो. पण EPFO 3.0 लागू झाल्यानंतर, कर्मचारी त्यांच्या PF अकाउंटमधून पैसे UPI किंवा ATM च्या माध्यमातून थेट काढू शकतील. हा एक मोठा बदल होणार आहे कारण या नव्या पद्धतीमुळे पैशांची गरज असताना लगेच आणि सोयीस्कर मार्गाने रक्कम मिळू शकेल.
EPFO 3.0 चा उद्देश
- सदस्यांना बँकेसारखी सोय उपलब्ध करणे
- वेळ वाचवून प्रक्रिया जलद करणे
- अधिक पारदर्शकता आणणे
- कर्मचारी त्यांच्या पैशांचा सहज वापर करू शकतील असे वातावरण तयार करणे.
पेन्शन वाढीचा प्रस्ताव | मोठा फायदा होण्याची शक्यता
सध्या EPFO अंतर्गत मिळणारी पेन्शन रक्कम ₹1000 प्रतिमाह आहे. अधीकृत सूत्रांनुसार, ही रक्कम ₹1500 ते ₹2500 प्रतिमाह इतकी वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजसमोर आहे. ही मागणी अनेक ट्रेड युनियनकडून वर्षानुवर्षे केली जात आहे. या वाढीचा लाभ दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बैठक 10 -11 ऑक्टोबर ला होणार
श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 10 -11 ऑक्टोबर 2025 रोजी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत PF Withdrawal मध्ये UPI व ATM सुविधा लागू करण्याचा प्रस्ताव अंतिम करण्याची शक्यता आहे. सरकार सणासुदीच्या काळात कर्मचार्यांसाठी काही उपयुक्त निर्णय देण्याच्या तयारीत आहे.
आधीपासून उपलब्ध असलेली सुविधा
EPFO सदस्यांना आधीपासूनच शिक्षण, लग्न, घर खरेदी, आजारपण यांसारख्या कारणांसाठी ₹5 लाखांपर्यंत आंशिक निकासीची सुविधा आहे. ऑटो क्लेम प्रक्रियेमुळे ही रक्कम सध्या 3 दिवसांत खात्यात येते. EPFO 3.0 लागू झाल्यावर, UPI व ATM द्वारे पैसे काढल्यास हा कालावधी आणखी कमी होणार आहे.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanacafe.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!