Gai Gotha Anudan Yojana: मित्रांनो शेती करत असतांना आपल्या महाराष्ट्रात बरेचशे शेतकरी हे पशुपालन करत असतात. आपण आपल्या पाळीव पशूला, मंग ती गाय असो किंवा म्हैस आपल्या परिवारातीलच एक भाग असतो. पावसाळामध्ये आपल्या पाळीव पशूंसाठी सुद्धा चांगली व्यवस्था करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी करणे आपले कर्तव्यच आहे. परंतु एक पक्क्का गोठा बांधायचे झाले तर मात्र खर्च सुद्धा आपल्या हायपतीच्या बाहेरचाच होऊ शकतो. त्यामुळे आत्ता शासनाच्या गाय गोठा अनुदान योजनाचा लाभ घेऊन आपण गोठा बांधण्यासाठी 3 लाख रुपये अनुदान मिळवू शकतो. या योजनेच्या एवढ्या मोठ्या लाभामध्ये आपला सम्पुर्ण पक्का बांधण्यास मोठी मदत होते.
Also Read: Bail Jodi Anudan Yojana: शेतकऱ्यांना खुशखबर, बैल जोडी खरेदीसाठी मिळणार 50 हजाराचे अनुदान.
गाय गोठा अनुदान योजनाची माहिती आणि उद्देश: Gai Gotha Anudan Yojana 2025
मानवांप्रमाणे गाय, म्हैस आणि इत्तर प्राणी सुद्धा सजीव आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा एका मजबूत छताची गरज हि असतेच. परंतु जे छोटे शेतकरी आणि पशुपालक असतात ते स्वखर्चातून एक उत्तम गोठा बंधू शकत नाही. खास त्यांच्यासाठीच महाराष्ट्र शासनाने 2021 पासून गाय गोठा अनुदान योजनाची सुरुवात केली आहे. या योजनेमार्फत आत्तापर्यंत 4 लाख पेक्षा अधिक पशुपालकांनी लाभ घेतला आहे. सुरुवातील या योजनेमार्फत मिळणारे अनुदान हे कमी जरा कमी होते, मात्र आत्ता 2025 मध्ये गाय गोठा अनुदान योजनामार्फत लाभार्थ्याला 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
योजना राबवण्यामागील शासनाचे उद्देश स्पष्ट आहे कि, गरीब आणि छोट्या शेतकऱ्यांना गायी ची अधिक कालजी घेण्याकरता आणि पक्का गोठा निर्मितीसा ठी आर्थिक स्वरूपाची मदत करणे. ज्या गायीला आज आपल्या देशामध्ये मातेचे स्थान दिले जाते तिचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण व्हावे आणि त्यासोबतच शेतकऱ्याच्या उत्पादनात सुद्धा वाढ व्हावी. कारण शेतीसोबत पूरक असा पशुपालन व्यवसाय आहे, त्याला अधिक चालना मिळावी आणि नवीन पिढीसुद्धा शेतीसोबत ह्या व्यवसायाकडे आकर्षित व्हावी हाच या मागितलं मुख्य हेतू आहे.
गाय गोठा अनुदान योजनेचे फायदे
शेतकरी बांधवांनो आपल्याला गाय गोठा अनुदान योजनेचे अनेक फायदे होणार आहेत. मित्रांनो या योजनेअंतर्गत जे 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे ते 100% अनुदानित असणार आहेत. पावसाळ्यामध्ये अनेको जंतू हे आपल्या अवतीभोवती फिरत असतात.
जर गायींना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था नसेल त मात्र सर्व पशूंना रोगराई चा सामना करावा लागेल. ज्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात पडतो. ज्यामुळे उत्पादनात घट सुद्धा होईल. या सर्व नुकसानापासून योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानातून गोठा निर्मिती करून वाचता येईल. शेतकऱ्यांना त्यांचा दुग्ध व्यवसाय अधिक वाढवता येईल. त्यानंतर ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळेल. हजारो युवक हा गायीचे पालन करण्याकडे आकर्षित होतील आणि दुग्ध व्यवसायाला अधिक चालना मिळेल.
योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप
मित्रांनो योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यामध्ये गाय गोठा बांधण्यासाठीची जमीन असणे बंधनकारक आहे. त्या जागेमध्ये मिळालेल्या रक्मेमधून पुढील गोष्टी निर्माण कारवाया लागतील. कमीत कमी 26.95 चौरस मीटर क्षेत्रफत जागा असणे आणि त्यामध्ये जनवऱ्याची चार खाण्याची गव्हाण असावी. तसेच 250 लिटर क्षमतेची जनावराच्या मूत्राची टाकी आणि 200 लिटरची पिण्याच्या पाण्याची टाकी सुद्धा बसवावी लागेल.
गायी व म्हशींची संख्या | मिळणारे अनुदान |
---|---|
1) 2 ते 6 | 77188 |
2) 6 ते 18 | 154373 |
3) 18 पेक्षा अधिक | 231564 ते 3 लाख पर्यंत |
योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
ज्या शेतकऱ्याकडे किमान अडीच एकर शेती असेल आणि तो महाराष्ट्राच्या स्थानिक शेतकरी असेल, तर तो योजनेच्या लाभाकरिता अर्ज करू शकतो. त्याचप्रामणे अर्जदार शेतकऱ्याजवळ दुधाळ गायी किंवा म्हशी ह्या दोन पेक्षा जास्त असायला हव्यात. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती आणि भटक्या व विमुक्त समुदायातील शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच प्रमाणे जर शेतकरी जर दारिद्र्यरेषेखालील असेल तर प्रथम प्राधान्य दिले जाणार.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधारकार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- जनावरांचे टॅनिंग प्रमाणपत्र
- जॉब कार्ड
- जमिनीचा 7/12, 8-अ
- ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र
- बँकेचे खातेबुक
- मोबाईल नंबर
- ई- मेल
- पासपोर्ट फोटो
- स्वयंघोषणापत्र
गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?
शेतकरी बांधवांनो गाय गोठा अनुदान योजनाचा अर्ज 2025 मध्ये करणे अतिशय सरळ आणि सोपे आहे. तुम्हाला तुमचा क्षेत्रातील तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पंचायत समिती मधील पशुसंवर्धन विभागामधून गाय गोठा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. त्यामध्ये सर्व माहिती भरून ते तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहायक किंवा पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागामध्ये सुद्धा सबमिट करू शकता. तुम्ही पात्र झालात तर योजनेअंतर्गत मिळणारे 3 लाखांपर्यंतचे अनुदान डायरेक्ट बँक खात्यात जमा केले जाईल.
निष्कर्ष
राज्यातील नवयुवकांना पशुपालन व्यवसायाकडे प्रोत्साहित करण्यासाठी हि योजना राबवण्यात आली असून नवयुवकांना चांगला रोजगार किंवा व्यवसाय निमिर्ती करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. जर तुमच्या कडे दोन पेक्षा जास्त दुधाळ प्राणी असतील आणि या पूर्वी तुम्ही कुठल्याही योजनेअंतर्गत गोठ्याचे निर्माण केले नसेल, तर तुम्ही गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More