Janani Suraksha Yojana Maharashtra: जननी सुरक्षा योजना या नावामध्येच योजना कोणासाठी राबवण्यात आली आहे हे स्पष्ट होते. मुख्यतः गरीब, अनुसूचित जाती, जमाती आणि रेशन कार्ड धारक असलेल्या कुटुंबातीलच गर्भवती महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या पूर्वी या योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत हि कमी होती. आता 2025 मध्ये मात्र मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करून 12,600 रुपये करण्यात आली आहे. जी कि फक्त ग्रामीण भागातीलच महिलांसाठी असेल. तर शहरी भागातील गर्भवती महिलांना मात्र 7,200 करण्यात आली आहे. Janani Suraksha Yojana Maharashtra काय आहे आणि योजनेअंतर्गत मासिक किती रक्कम शासन देते या विषयी सविस्तर माहिती तुम्ही पुढालप्रमाणे बघू शकता.
Also Read: Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची व हळद कांडप मशीन करता मिळणार 50,000 अनुदान
Janani Suraksha Yojana संपूर्ण माहिती आणि उद्देश
मंडळी, जननी सुरक्षा योजना हि 2005-2006 मध्ये गरजू आणि गरीब महिलांच्या मदती करता सुरु करण्यात आली होती. गरीब कुटुंबातील महिलांच्या आणि त्यांच्या गर्भातील बाळाच्या आरोग्याला सुरक्षित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. पूर्वी योजनेच्या माध्यमातून फक्त एकदाच लाभ दिला जात होता, मात्र 2025 मध्ये लाभाच्या नियमांमध्ये बदल करून लाभाची रक्कम वाढवण्यात आली आहे.
इंटरनेट वरून मिळालेल्या माहितीनुसार आता Janani Suraksha Yojana Maharashtra अंतर्गत ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना दर महिन्याला 1400 रुपये दिले जाते तर शहरी भागातील पात्र महिलांना दर महिना 800 रुपयाची आर्थिक मदत शासन करते. योजना राबवण्यामागील शासनानेच उद्देश एवढेच आहे कि, गरीब गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांच्या बाळाचेही पोषण चांगले व्हावे. जेणेकरून एक सुदृढ बालक जन्माला येईल. केंद्र सरकार मार्फ़त दरवर्षी या योजनेसाठी 1,600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येत असते.
जननी सुरक्षा योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेचा लाभ फक्त गर्भवती महिलांनाच दिला जाणार आहे. अर्जदार महिलेला फक्त दोन वेळा गर्भधारणेवेळीच लाभ दिला जाईल. अर्जदार गर्भवती महिलेचे वय किमान अठरा वर्ष तरी असणे आवश्यक आहे. ज्या महिला रेशनकार्ड धारक किंवा अनुसूचित जाती आणि जमाती मध्ये येत असतील त्यांनाच अर्थीं मदत दिली जाईल. महिलेला शासकीय हॉस्पिटल किंवा शासकीय मान्यता प्राप्त हॉस्पिटल मध्ये प्रसूती करणे बंधनकारक राहील.
जननी सुरक्षा योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खातेबुक
- रेशन कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- प्रसूती दाखला
- मतदान कार्ड
- पासपोर्ट फोटो
- योजनेचा अर्ज
अर्ज कसा करायचा?
Janani Suraksha Yojana Maharashtra साठी अर्ज करण्याची अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. सर्वप्रथम तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या गावातील आशा कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा लागेल. आशा तुम्हाला पुढील प्रक्रियेकरता मदत करतील. नंतर तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून जननी सुरक्षा योजनेचा अर्ज लागेल घ्या आणि त्यामध्ये माहिती भरून अर्ज अर्ज तिथेच सबमिट करा. तुमचा अर्ज तपासल्या जाईल आणि जर तुम्ही पात्र असाल तर पुढील दहा दिवसाच्या आत महाडीबीटीमार्फत तुम्ही दिलेल्या बँक खात्यात या योजनेच्या लाभाची रक्कम जमा केली जाईल.
निष्कर्ष
बालकांचा मृत्यदर कमी होण्यासाठी हि योजना अतिशय महत्वाची आहे ठरणार आहे. योजनेच्या अंतर्गत शासन गरबवती महिलांना योग्य पालनपोषण तर पुरवणारच आहे तसेच इतर गरजांसाठी आर्थिक मदत सुद्धा देणार आहे. ज्यामुळे महिलेला आणि तिच्या गर्भातील बाळाला उत्कृष्ट दर्जाचा आहार मिळवता येईल. तसेच मोफत आरोग्य सेवा सुद्धा गर्भवती महिलेसाठी मोफत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही शासनाच्या अधिकृत साइट ला भेट देऊ शकता किंवा गावातील आरोग्य केंद्राला जाऊन भेट देऊ शकता, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More