Kanda Chal Anudan Yojana 2025: कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे, आता शासनाने कांदाचाळ अनुदान योजना अंतर्गत मिळणारे अनुदानाची रक्कम वाढवली आहे. त्यासोबतच कांदा चाळीसाठीची मर्यादा सुद्धा 500-1000 मॅट्रिक टन पर्यंत केली गेली आहे. कांदा हा एक मानवी जीवनातील अत्यावश्यक वस्तूंमध्ये मोडणारे कंदमूळ आहे. त्यामुळे कांद्याला मोठी मागणी आपल्या देशात असते.
सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचे असते ते कांदे ठेवण्यासाठीची कांदा चाळ. मात्र आपल्या राज्यातील गरीब असलेले आणि अप्लभूदाराक शेतकरी हे स्वखर्चातून उभारू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी मिळणार 10 हजार रुपये प्रति मॅट्रिक टन अनुदान, बघा संपूर्ण योजनेची माहिती.
Kanda Chal Anudan Yojana 2025 संपूर्ण नवीन माहिती आणि उद्देश
मित्रांनो आपल्याला जाणीवच असेल कि शेतकरी बांधव हे आर्थिक अडचणीं अभावी काहींना ना काही पर्यायी जुगाड करतच असतात. परंतु प्रत्येक वेळेला हे जुगाळ परिणामकारक ठरत नसतात. कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिले तर लाखो रुपये हे पिकाच्या पेरणी पासून ते कांदा जमिनीमधुन काढेपर्यंत खर्च येतो.
नंतर ते कांदे मार्केट मध्ये विकायच्या आधी चांगले सुद्धा करावे लागतात. केव्हा केव्हा कांद्याला एकदम कमी भाव असतो त्यामुळे त्या भावामध्ये कांदे विकणे कुठल्याच शेतकऱ्याला परवडणारे नसते आणि म्हणून काही गरीब शेतकरी हे कांदे घरातच जमिनीवर काही दिवस भाव वाढेपर्यंत टाकून देतात. परंतु जमिनीवर कांद्यांना हवा लागत नसल्यामुळे ते पुरेशी पकडतात आणि जमिनीवरच खालून खालून सडू लागतात.
ज्यामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक नुकसान तर होतेच आणि जे शिल्लक कांदे राहतात त्यांना सुद्धा मातीमोल भावाने विकावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पादन अधिक वाढवण्यासाठी राज्यसरकार दरवर्षी Kanda Chal Anudan Yojana महाराष्ट्रभर राबवत असते. या चाळीमध्ये कांदे हे जमिनीपासून उंच आणि खेळत्या हवे मध्ये एकदम सिरक्षित ठेवता येतात त्यामुळे कांदे खराब होण्याची भीती सुद्धा दूर होते.
मित्रांनो, मागील वर्षी कांदा चाळ अनुदान योजनेअंतर्गत फक्त 3500/- रुपये प्रति मॅट्रिक टन अनुदान ते सुद्धा जास्तीत जास्त 25 टन कांद्यांसाठीच दिले जायचे. यावर्षी मात्र नियमांमध्ये बदल करून नवीन जी-आर काढण्यात आला आहे. ज्याच्या अंतर्गत कांदा चाळीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति मॅट्रिक टन अनुदान मिळणार आहे.
कांदा चाळ अनुदान योजनेचे होणारे फायदे
आपल्या गरीब शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत 50% अनुदान दिले जाणार असल्यामुळे फार मोठी मदत स्वतःच्या शेतात कांदा चाळ निर्माण करण्यासाठी होणार आहे. विशेषतः आता अनुदानाची रक्कम आणि मर्यादा वाढवल्यामुळे छोट्या शेतकरी बांधवांसोबतच मोठे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
चाळ निर्मिती करण्यासाठी शेतकऱ्याला कुठल्या सावकाराकडून किंवा बँकेकडून कर्ज काढण्याची गरज पडणार नाही आणि पडलीच गरज कदाचित तर ते कर्ज बँकेमार्फत शासन याच योजनेअंतर्गत उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्याचा 1000 मॅट्रिक टन पर्यंतचा कांदा कमी जागेत ठेवता येईल. शेतकऱ्याचा कांदा सुरक्षित राहील, त्यामुळे जेव्हा कांद्याचे भाव वाढेल तेव्हा शेतकरी कांदा विकून अधिक भाव मिळवू शकेल. अशापद्धतीने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल आणि शेतकरी नक्कीच आपल्या कुटुंबाचे चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकेल.
कांदा चाळ योजनेचा लाभ कोणाला मिळेल?
- कांदा उत्पादक शेतकरी
- स्वयंसहायता शेतकरी गट
- महिला शेतकरी गट
- उत्पादक संघ
- नोंदणीकृत शेतकरी संस्था
- शेतकरी सहकारी संस्था
- शेतकरी सहकारी संघ
कांदाचाळ योजनेमार्फत किती अनुदान मिळेल?
शासनाने नवीन काढलेल्या जी-आर नुसार पात्र कांदा शेतकऱ्याला किंवा उत्पादकाला ऐकून खर्चाच्या 50% अनुदान दिले जाणार आहे. जे कि त्याच्या ऐकून मॅट्रिक टन कांद्यावर अवलंबून असेल, त्याचा चार्ट तुम्ही खालील प्रमाणे बघू शकता.
मर्यादा | प्रति मॅट्रिक टन | अनुदान |
---|---|---|
1) 5-25 मॅट्रिक टन | 10,000 | 25,000 ते 1,25,000 |
2) 25-500 मॅट्रिक टन | 8,000 | 20,80,000 ते 40,00,000 |
3) 500-1000 मॅट्रिक टन | 6,000 | 30,60,000 ते 60,00,000 |
कांदा चाळ अनुदान योजनेची पात्रता
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच Kanda Chal Anudan Yojana चा लाभ घेता येणार आहे. अर्जदार ज्या शेतीकरिता चाळ अनुदानासाठी अर्ज करत असेल, त्या शेताच्या 7/12 व 8-अ वरती त्याचे नाव असणे आवश्यक आहे. अर्थात अर्जदाराच्याच नावाने शेती असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित शेतकरी कांदा पीक घेत असल्याची नोंद सातबाऱ्यावर सुद्धा असणे गरजेचं आहे.
कांदा चाळ अनुदान योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 7/12 व 8-अ
- बँक खातेबुक (आधार सोबत लिंक असणे आवश्यक)
- जातीचा दाखला
- अर्ज नमुन्यातील हमीपत्र
Kanda Chal Anudan Yojana Maharashtra Apply Online- अर्ज प्रक्रिया
शेतकरी मित्रांनो, कांदा चाळ अनुदान योजनेचा अर्ज करणे अत्यंत सोपे आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून सुद्धा कांदा चाळ अनुदान मिळवू शकता. ऑफलाईन अर्ज तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हापरिषद कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा करू शकता. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वर जाऊन कांदा चाळीसाठी तुमचा फार्मर आयडी टाकावा लागेल. नंतर तिथे नोंदणी करून अर्ज भारत येणार आहे. तसेच योजनेचा अर्ज भरन झाल्यानंतर 24 रुपये फी सुद्धा भरावी लागेल.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More