Magel Tyala Solar Pump Yojana: 90% अनुदानावर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपचे वाटप, असा करा अर्ज

Magel Tyala Solar Pump Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Magel Tyala Solar Pump Yojana 2025: एक नवीन क्रांती उदयास आली आहे, ज्याला आपण सोलर किंवा सौर क्रांती मनू शकतो. शेतकरी मित्रांनो, वाढत्या महागाई बरोबर वीजदर सुद्धा फार वाढले आहे. तसेच आता महावितरण खासगी क्षेत्रामध्ये जात असल्या कारणाने गरिबांना मात्र हे विजेचे दर अजिबात परवडणारे नाहीत.

आशा परिस्थितीमध्ये गरिबाने शेती कशी करावी, जे शेतकरी बागायती शेती करतात त्यांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक वीजबिल यायले लागले आहेत. आधीच दरवर्षी अतिवृष्टीचे संकट येत आणि रब्बी पिकांचे वाटोळे करून जात आणि शेतकरी कसे बसे पोत्यापाण्याकरता हिवाळ्यामध्ये गहू, हरभरा, तांदुळा सारखे पीक घेतात तर त्यांना महावितरणचे बिल भरायला परवडत नाही. त्यामुळे त्यांची शेतातील वीज सुद्धा कट केली जाते. या वरती पर्याय म्हणून शासन Magel Tyala Solar Pump Yojana आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवत आहे.

Also Read: Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana: शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान.

Maharashtra Magel Tyala Solar Pump Yojana संपूर्ण माहिती आणि उद्देश

शेतकरी बांधवांनो, राज्यसरकारने जी मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना सुरु केली आहे यालाच कुसुम योजना असेही बोलले जाते. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा पक्का सोर्स जसे विहीर, तलाव, शेततळे, नदी किंवा धरण असेल अशाच शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. आपण जेवहा शेतात कुठेले पीक घेत असतो तेव्हा त्याला पाणी देण्यासाठी किंवा त्याचे सिंचन करण्यासाठी रात्रीला जावे लागते. कारण शेतातील वीज हि महावितरणामार्फत रात्रीच दिली जाते. म्हणजे शेतकऱ्याने दिवसा शेतात राबायचं कष्ट करायचे आणि रात्री चांगली झोप घेण्याऐवजी त्याच शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागत असे.

मात्र जर Magel Tyala Solar Pump Yojana मार्फ़त सौर पंप बसवले, तर शेतकऱ्याला रात्री विनाकारण मेहनत घेण्याची गरज नसेल. शेतकऱ्याला हवे तेव्हा शेतकरी पिकाला एक बटन तांबं पाणी देऊ शकेल. तसेच शेतकऱ्यांना त्रास कमी होण्यासाठी आणि उत्पादन वाढण्यासाठी सोलर कृषी पंप अतिशय मोठे योगदान देऊ शकते. याच प्रमाणे शेतकऱ्याचे वीजबिल झिरो करण्याचा उद्देश महाराष्ट्र शासनाचा हि योजना राबवण्यामागीलया आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे फायदे

बांधवांनो, शेतकऱ्याला या योजनेच्या माध्यमातून सौर पंप बसवण्यासाठी फार मोठ्ठी आर्थिक मदत मिळणार आहे. कारण शासन सोलर पंप आणि सोलर पॅनल बसवण्याठी 90% ते 95% पर्यंत अनुदान देणार आहे. तसेच हे सौर कृषी पंप एकदा बसवले तर शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याचे टेन्शन अजिबातच राहणार नाही. शेतकऱयांना स्वतःचा जीभ धोक्यात टाकून रात्री शेतात जाऊन पाणी देण्याचे काम पडणार नाही. वेळेवर पिकांना पाणी देता येईल आणि आधी पेक्षा जास्त पीक काढून जास्त उत्पादन घेता येईल.

शेतीवर आधारित असेल योजनेचा लाभ

शेती मिळणारे पंप
2.5 एकर शेत 3 HP सौर पंप
2.5 ते 5 एकर शेत 5 HP सौर पंप
5 एकर पेक्षा जास्त शेत 7.5 HP सौर पंप

सौर कृषी पंप योजनेची पात्रता

मागेल त्याला सौर पंप योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अजूनही वीज मिळालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर, बोअरवेल , शेततळे किंवा शेताजवळ कुठला तलाव, नदी, सामूहिक शेततळे असेल ते योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना या पूर्वी कुठल्या सोलर पंप अनुदान देणाऱ्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच या योजनेचा लाभ रॅशनकार्ड वरील किंवा सातबारावरील कुठल्याही एकाच व्यक्तीला दिला जाईल याची नोंद घ्यावी.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शेतीचा फेरफार उतारा
  • 7/12 उतारा
  • जातीचा दाखला
  • बँक खातेबुक
  • पासपोर्ट फोटो
  • मोबाईल नंबर
  • पाण्याचा स्रोत असल्याचा पुरावा

मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा?

शेतकरी बांधवांनो, Magel Tyala Solar Pump Yojana Online Registration करण्यासाठी www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. तेथे तुम्हाला तुमची वयक्तिक सर्व माहिती भरावी लागेल आणि काही शेतीचे आवश्यक कागदपत्रे सुद्धा अपलोड करायचे आहे. सोलर पम्पाचा संपूर्ण अर्ज भरून झाल्यावर सबमिट बटन दाबून अर्ज सबमिट करा.

शासनाचा हेल्पलाईन नंबर

  • 1800-233-3435
  • 1800-212-3435

निष्कर्ष

शेतकरी वीज बिल भरून भरून त्रस्त झाले असतील, तर त्यांना या योजनेअंतर्गत चांगला पर्याय दिला जाणार आहे. या योजनेमार्फत फक्त पाच टक्के रक्कम भरून लाखो रुपयाचे सोलर पंप शेतकरी घेऊ शकतील आणि बाकीची रक्कम महाराष्ट्र शासन आणि केंद्रसरकार भरणार आहे. लाभ कसा घ्यायचा या विषयी ची सम्पुर्ण माहिती आपण वरीलप्रमाणे बघू शकता, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *