Mofat Pith Girni Yojana 2025: ग्रामीण भागातील लाडक्या बहिणीं आणि इतर महिलांसाठी सुद्धा राज्यसरकारने मोफत पीठ गिरणी योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा जो लाभ असेल ते शंभर टक्के अनुदानित असल्यामुळे महिलांना स्वतःजवळचा पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी खर्च करण्याची गरज पडणार नाही. हि योजना राज्य महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत फक्त ग्रामीण भागातील महिलांकरिताच राबविण्यात येत.
Mofat Pith Girni Yojana 2025 आणि योजनेचा उद्देश काय?
राज्यातील गरीब आणि ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी Mofat Pith Girni Yojana सुरु करण्यात आली आहे. महिलांना बाहेर ठिकाणी निकारी करीत कुठेही जाण्याची गरज पडू नये आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वतःचा छोटा व्यवसाय सुद्धा सुरु ठेवावा अशी शासनाची अपेक्षा आहे.
या मार्फत दारिद्रयरेषेखालील महिला ह्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्यास वेळ लागणार नाही. सध्या राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाची मोहीमच हाती घेतली असल्या मुळे, त्या मोहिमेचाच एक भाग हि योजाणा आहे असे मानायला काही हरकत नाही. राज्यातील महिलांना उद्योगावाकडे वळवण्यासाठी, त्यांना अधिक आत्मनिर्भर, सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांचा असलेला आत्मविश्वास जागरूक करण्याच्या उद्देशाने हि योजना राबवण्यात येत आहे.
मोफत पिठाची गिरणी योजनेचे फायदे
Mofat Pitha Girni Yojana हि 100% अनुदान देणारी योजना आहे. अर्थात या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला पिठाची गिरणी खरेसाठी एकही रुपया भरण्याची गरज पडणार नाही. जेवढ्याही किमतीची हे गिरणी होईल ती सर्व रक्कम शासन या योजनेच्या मार्फत देणार आहे. रोजगारासाठी दुसरी कुठल्याही शहरात भटकण्याची काम नसेल. पिठाच्या गिरणीच्या उत्पादनातून कुटुंबातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. आणि शेवटचा फायदा म्हणजे महिला हि आत्मनिर्भर बनेल तिला दुसऱ्याच्या कमाईवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
मोफत पिठाची गिरणी योजनेची पात्रता
हि योजना महाराष्ट्रातील महिलांसाठीच सुरु करण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार महिला महाराष्ट्राची स्थानिक रहिवासी असावी. महाराष्ट्राबाहेरील महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच प्रकारे हि योजना फक्त ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे शहरी भागातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 च्या दरम्यान असावे. आर्थिक बाबतीत कमकुवत महिलाच योजनेसाठी पात्र राहतील. तसेच अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कुठलाही सदस्य हा शासकीय सेवेत रुजू नसावा. अर्जदार महिलेने या पूर्वी राज्य अथवा केंद्र सरकारच्या मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जाईल. एक कुटुंबातील एकाच महिलेला किंवा मुलीला मोफत पिठाची गिरणी मिळेल. अर्जदार महिलेचे वार्षीक उत्पन्न 1.20 लाखापेक्षा अधिक असल्यास त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- अर्ज
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला बँकेचे खातेबुक
- व्यवसायसाठीच्या जागेसाठीचा 8-अ
- लाईट बिलाची झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- ई- मेल आयडी
- पासपोर्ट फोटो
- प्रतिज्ञा पत्र
मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
Mofat Pith Girni Yojana साठी अर्ज करण्याकरता तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हापरिषदेमध्ये जाऊन महिला व बालकल्याण विभागामधून पिठाची गिरणी योजनेचा अर्ज मिळावा आणि त्यामध्ये मागण्यात आलेली माहिती भरा. अर्जसोबत वरती जे मा अर्जदार महिलेचे कागदपत्र दिलेली आहेत ती लावा आणि ते अर्ज तेथीलच अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
निष्कर्ष
राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त इतरही कल्याणकारी योजना शासन राबवते आहे. त्यापैकीच एक हि सुद्धा योजना आहे, जी बऱ्याचशा महिलांना माहिती नसते. म्हणून आपण आज या आर्टिकल मध्ये ग्रामीण भागातील महिलांना मोफत पिठाची गिरणी अनुदान मिळवण्याबाबतची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, धन्यवाद.
नमस्कार,
माझे नाव आकाश भगत आहे, मी एक ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये मागील 4 वर्षांपासून कार्यरत आहे. मी 2023 पासून योजना या टॉपिक वरती ब्लॉग लिहत आहो. त्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 वर्षाचा योजना, नौकरी आणि इतर शासकीय माहितीच्या टॉपिक चा अनुभव आहे. तसेच मी सध्या yojanacafe.in या साईट च्या माध्यमातून सर्व माहिती सोप्या आणि खऱ्या स्वरूपाची देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. Read More