Mukhyamantri Annpurna Yojana 2025| आता फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार मोफत गॅस सिलेंडर, नवीन नियम लागू.

Mukhyamantri Annpurna Yojana 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

लाडकी बहीण सुरु झाल्यानंतरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लाडक्या बहिणींना अजून एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे. ते म्हणजे Mukhyamantri Annpurna Yojana होय. मित्रांनो आपल्याला कल्पनाच असेल कि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन पात्र लाडक्या बहिणींना एक वर्षाला तीन गॅस सिलेंडर देऊ करत आहे.

आज पेट्रोल आणि डिझेल च्या भावासोबतच गॅस चे भाव सुद्धा गगन भरारी घेतांना आपण बघत आहो. अशाच वेळेला लाडक्या बहीण योजनेचे वारे वाहू लागल्यानंतर अजून एक मोठा दिलासा हा लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून देण्याचे काम सरकारने केलं आहे. आज या आर्टिकल मध्ये या मोफत तीन गॅस सिलेंडल मिळणाऱ्या योजनेची संपूर्ण माहिती तर बघणारच अहो, सोबतच जे नवीन नियम पात्रतेबाबत आणि लाभाबाबत लागू केले गेले आहेत त्याचा हि सविस्तर आढावा यामध्ये घेणार आहो.

Mukhyamantri Annpurna Yojana काय आहे?

महिलांना घर परिवार सांभाळत असतांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. लाडकी बहीण सुरु झाल्यापासून राज्यातील महिलांना घर चालवण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे. त्यातच मागील वर्षीच्या जून महिन्यापासून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारने राबवण्यास सुरुवात केली. आज जुलै मध्ये या योजनेला सुद्धा एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या योजनेच्या माध्यमातून लाखो लाडक्या बहिणींना 2024-25 या एक वर्षाच्या काळामध्ये तीन गॅस सिलेंडर अगदी मोफत दिले गेले आहे.

योजनेमागील उद्देश काय आहे?

गरीब आणि दारिद्र रेषेखालील कुटुंबातील महिलांना जीवन जगतांना आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात या साठीची हि शासनाची एक प्रकारे मदत आहे. सध्या 2025 मध्ये गॅस सिलेंडरचे भाव हे 900 रुपयाचाही वर जाऊन पोहोचले आहे, त्यामुळे आर्थिक कमकुवत कुटुंबांना हे विकत घेणे झेपावत नसल्यामुळे उज्वला योजनेअंतर्गत जरी मोफत गॅस कनेक्शन मिळाले असले तरी महिला ह्या चुलीवरच स्वयंपाक बनवत असतात.

ज्यामुळे महिलांचे डोळे जाऊ शकते किंवा खराब होऊ शकते, वायू प्रदूषण होते ते सुद्धा वेगळेच आणि जर घरामध्ये छोटे बाळ असले तर त्याला लहानपणापासूनच अनेक आजारांना समोर जाणे भाग पडू शकते. या सर्व बाबी लक्षात घेता आणि नागरिकांच्या सर्वांगींन विकासाच्या उद्देश पुढे ठेऊन हि योजना सुरु करण्यात आली आहे.

मोफत गॅस सिलेंडर योजनेसाठी कोण पात्र आहे?

खरं म्हणजे ज्याही महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्या सर्व महिला ह्या मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याच पद्धतीने ज्या महिलांकडे उज्वला योजनेअंतरागत गॅस कनेक्शन मिळाले आहेत त्या सुद्धा योजना योजनेसाठी पात्र असतील. हि योजना महिलांसाठी अजून पुरुष योजनेचा अर्ज करू शकणारच नाही तसेच गॅस काणेशं सुद्धा हे अर्जदार महिलेच्याच नावाने असणे बांधकारक आहे. कुटुंबातील कोणत्याही एकाच महिलेला या योजनेमार्फत मोफत गॅस दिली जाईल.

मोफत गॅस सिलेंडर योजनेचे नवीन नियम कोणते?

ज्या हि महिलांनी अन्नपूर्णा योजनेकरिता अर्ज केला असेल आणि त्यांना योजनेअंतर्गत वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत मिळवायचे असेल, तर एक वर्षातून सहा सहा महिण्याच्या फरकाने संबंधित गॅस एजेंसीमध्ये जाऊन EKYC करून घेणे बंधनकारक केले गेले आहे. त्यामुळे जय महिलांनी EKYC केली नसेल त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि अपात्र करण्यात येणार असल्याचा नियम सुरु केला आहे.

अन्नपूर्णा योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • राशन कार्ड
  • दोन पासपोर्ट फोटो
  • रहिवासी दाखला
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • गॅस बुक

अन्नपूर्णा योजनेचा अर्ज कसा करावा?

तुमच्या परिसरातील गॅस एजेन्सी मध्ये जावे लागेल. तेथून योजनेच्या अर्जाची प्रत घेऊन ते सर्व अर्ज व्यवस्तीत भरून व्यवस्तीत स्वतःची सर्व माहिती टाकून कागदपत्रांसह त्याच गॅस एजेन्सी मध्ये सबमिट करावा लागेल. त्यासोबतच तेथील अधिकारी तुमच्या व्हेरिफिकेशन करून तुम्हाला मोफत तीन गॅस योजनेच्या लाभ मिळण्याकरता पात्र करतील.

निष्कर्ष

महाराष्ट्र शासनाच्या या मोफत गॅस योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांना चांगले आरोग्य तर मिळालेच आहे, त्या सोबतच आर्थिक मदत सुद्धा झाली आहे. या मिळालेल्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून तेवढेच रुपये ते बचत करून त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाच्या सुद्धा उपयोगी आणू शकतील. योजनेची अधिक माहिती हवी असेल तर तशी आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगा, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *