Soybean Bajar Bhav Today: सोयाबीनच्या भावात मोठी वाढ, तोडले रेकॉर्ड, बघा कुठं-कुठं किती आहे भाव.

Soybean Bajar Bhav Today
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Soybean Bajar Bhav Today: महाराष्ट्रात सर्वाधिक जर कुठले उत्पन्न शेतकरी घेत असतील, तर ते आहे सोयाबीनचे. विशेषतः विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यामध्ये जवळपास 80% शेतामध्ये आपल्याला सोयाबीन आणि तूर हेच पीक बघायला मिळतील. मात्र मागील काही वर्षांमध्ये हे शेतकरी जरी चांगले उत्पाद घेत असले तरी त्यांच्या पिकाला मात्र हवा तास भाव मिळत नाही आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी आणि वरून भावही चांगला मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अतिशय अडचणींमध्ये आलेला आपल्याला दिसतो.

या वर्षी पावसाने जो राज्यभर रौद्र रूप धारण केलं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक हे मुळासगतच वाहून केले आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा कर्ज माफीचे आश्वासन देत आहे, मात्र अजून कर्जमाफी शुद्ध केली केली नाही त्यामुळे सर्व शेतकरी शासनावरती संतप्त झालेले आहे. अशातच एक खुशखर आली कि, सोयाबीनच्या भावात मोठी वाढ झाली. अर्थातच जेवढे सोयाबीन शेतकऱ्यांकडे राहिले त्यांना तरी चांगला भाव मिळेल हीच या बातमीमुळे शेतकऱ्यांना आशा मिळाली आहे. तर चला मग बघूया Soybean Bajar Bhav Today किती आहे.

Also Read: Kanda Chal Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांना कांदा चाळीसाठी मिळणार 10 हजार रुपये प्रति मॅट्रिक टन अनुदान.

Maharashtra Soybean Bajar Bhav Today: कोठे- कोठे किती मिळाला सोयाबीनला भाव बघा

आज दिनांक 25 आगस्ट 2025 महाराष्ट्रातील काही मुख्य बाजारपेठेमधील Soybean Bajar Bhav खालीलप्रमाणे.

माजलगाव: माजलगाव मध्ये आज सोयाबीनचे भाव किमान 4300 ते कमाल 4572 पर्यंत होते.

सिन्नर: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे भाव 4390 ते 4600 पर्यंत होते.

कारंजा लाड: कारंजामध्ये आज सोयाबाबींचे भाव 4125 पासून 4650 पर्यंत होते.

मानोरा: मनोऱ्याच्या बाजार समितीमध्ये 4100 ते 4740 दरम्यान सुरु होते.

मोर्शी: या बाजारसमितीमध्ये 4200 पासून 4435 पर्यंत आजचे सोयाबीन भाव होते.

येवला: येवल्याच्या बाजारसमितीमध्ये आज 4301 पासून ते 4601 पर्यंत हवं मिळाला आहे.

बार्शी: बार्शी मध्ये चांगल्या कापसाला 4500 ते 4631 पर्यंत भाव देण्यात आला आहे.

नांदेड: मराठवाड्यातील नांदेड मध्ये 4500 पासून 4545 पर्यंत सोयाबीन विकले गेले.

परळी- वैजनाथ: या उत्पन्न बाजार समितीमध्ये 4451 ते 4611 पर्यंत भाव मिळाला आहे.

राहत: या ठिकाणी फक्त एक क्विंटलच आवक झाली असून तिथे 4500 भाव देण्यात आला आहे.

सोयाबीनचे भाव जाणार 8000 हजारापर्यंत

Soybean Bajar Bhav Today बघून आपल्याला आनंद नक्कीच झाला असेल, कारण सोयाबीनचे भाव वाढतांना बघून शेतकऱ्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा कुठलाच आनंद कदाचित नसेल. शेतकरी बांधवांनो, आत्ता या वर्षीचा हा आगस्ट महिना संपायला आला आहे. अतिवृष्टीतमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेलीत. त्यामुळे या वर्ष पिकाचे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घाट होणार हे तर नक्कीच आहे.

त्यातच सोयाबीनची मागणी हि वाढत जाणार आणि सोयाबीनचा पुरवठा मात्र कमी होणार आहे. यानुसार आपल्याला मागचा सिद्धांत असा सांगतो कि, जेव्हा मागणी वाढते आणि पुरवठा कमी असते तेव्हा नक्की त्या वस्तीची किंमत वठवली जाते. अर्थातच आता सोयाबीनचे भाव आज वाढण्याला सुरवात झाली असून 2025-2026 या कालावधीत सोयाबीनचे भाव 8000 हजारापर्यंत पोहोचण्याची संभाव्यता वर्तवली जात आहे.

निष्कर्ष

जर सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर शेतकरी हा नोकरी वाल्यांना सुद्धा मागे टाकल्या शिवाय राहणार नाही. परंतु जेव्हा शेतकऱ्याकडे जास्त उत्पादन होते, तेव्हा मात्र शेतकऱ्याला हवा तास भाव शाशन देत नाही आणि शेतकऱ्यांवर कर्ज मात्र वाढतच जाते. या वर्षी जरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला तरी शेतकऱ्यांकडे मात्र उत्पादन तेव्हडा नसेल. शेवटी शेतकरी आतापर्यंत जिथे होता तिथेच असेल. परंतु जर शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली आणि बिक बिमा देण्यात आला तर मात्र शेतकऱ्याचे जीव थोडे सुधारू शकते. तसेच झालेल्या अतिवृष्टीच्या संकटाच्या दुःखातून शेतकरी बाहेर पडू शकल, धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *