Tar Kumpan Yojana Maharashtra 2025: शेतीला तार कुंपण करण्यासाठी शासन देणार 90% अनुदान, योजनेचा असा करा अर्ज.

Tar Kumpan Yojana Maharashtra 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Tar Kumpan Yojana Maharashtra 2025: मित्रांनो, नुकतंच पावसाळा सुरु होऊन एक महिनाच सध्या झाला असेल. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या शेतामध्ये पेरणी सुद्धा केली असेल. परंतु त्यांच्या पुढं सर्वात मोठ चॅलेंज तर आता असणार आहे, करणं खरी कसरत जमिनीच्या बाहेर आलेल्या पिकाचे संरक्षण करण्याची असेल.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे पक्के कुंपण असेल ते मात्र घरी मस्त आरामात झोप काढत असेल आणि ज्यांच्या शेताला मात्र कुंपण नाही त्यांना रात्र दिवस आपल्या शेतातील पिकाच्या रक्षणासाठी तत्पर राहावे लागते. म्हणून शेतकऱ्यांना त्रास कमी व्हावा आणि पीकही अधिक व्हावे यासाठी शेतीला तार कुंपण करण्यासाठी शासन देणार 90% अनुदान. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे बघा.

Tar Kumpan Yojana Maharashtra 2025 काय आहे?

शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्याच्या हेतून महाराष्ट्र शासन शेतीला तार कुंपण योजना संपूर्ण राज्यभर राबवत आहे. या योजनेचा लाभ घेऊन करोडो छोटे शेतकरी आज चांगल्या उत्पादनासोबत आरामदायी जीवन सुद्धा जगात आहेत. शेतकरी मित्रांनी या योजनेंतर्गत शेतकऱ्याला अनुदान दिले जाणार आहे हे खरे परंतु हे अनुदान शेतकऱ्या जवळ असलेल्या शेतीच्या आकारावर अवलंबून असणार आहे.

लाभार्थ्याकडे 1 हेक्टर पासून ते 2 हेक्टर पर्यंत शेती असेल, तर त्यांनाच Tar Kumpan Yojana Maharashtra अंतर्गत तार कुंपणावर 90% अनुदान, या पेक्षा अधिक शेती असेल तर मात्र हे अनुदान कमी कमी होत जाणार आहे. जर लाभार्थ्याकडे 2 ते 3 हेक्टर च्या मध्ये शेती असेल, तर त्याला 60% आणि 3 ते 5 हेक्टर पर्यंत शेत असेल तर, त्याला50% अनुदान आणि पाच हेक्टर पेक्षा अधिक शेती असल्यास 40% अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे.

शेतीला तार कुंपण योजनेचे उद्देश

राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुंपण खरेदीसाठी आर्थिक मदत करणे. ज्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाच्या संरक्षणासोबतच उत्पन्नात सुद्धा वाढ होईल आणि शेतकरी सुखी जीवन जगू शकतील हाच उद्देश आहे.

तार कुंपण योजनेचे फायदे

लाभार्थ्याला शेतीला तर कुंपण घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही. अगदी कमी खर्चात कुंपण घेऊन शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे जनावरांपासून रक्षण होईल. ज्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकशान होणार नाही आणि उत्पादनात सुद्धा मोठी वाढ होईल. तसेच उत्पादन वाढले तर तर शेतकरी सुखी समृद्धी बनला वेळ लागणार नाही.

मित्रांनो हे जे तारांचे कुंपण असणार आहे ते वारंवार बदल्याची किंवा पुन्हा करायची गरज नसेल ज्यामुळे शेतकऱ्याला दरवर्षी साधे कुंपण घेण्याचा त्रास सुद्धा कमी होईल. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्याला रात्री चांगले झोपाला मिळेल, स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवाराला निष्काळजी राहून वेळ देता येईल.

शेतीला तार कुंपण योजनेचे पात्रता निकष

Tar Kumpan Yojana Maharashtra साठी महाराष्ट्रातीलच शेतकरी अर्ज करू शकतील. शेती अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या नावाने असणे किंवा जर शेती भाड्याने करत असाल तर त्याची प्रमाणे देणे सुद्धा आवश्यक राहील. अर्जदाराची शेती हि अतिक्रमणाच्या असेल तर मात्र त्याला लाभ दिला जाणार नाही. त्याचप्रकारे जर अर्जदाराचे शेत हे वन्य जीव, प्राण्यांच्या भ्रमण हद्दीमध्ये असेल तरी सुद्धा तर कुंपण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदाराला अनुदानाव्यतिरिक्त रक्कम भरणे आवश्यक आहे.

तार कुंपण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 7/12, 8-अ
  • जातीचा दाखला
  • ग्रामपंचायतीचा दाखला
  • समितीचा दाखला
  • वनाअधिकाऱ्याचा दाखला
  • बँकेचे खातेबुक

तार कुंपण योजनेसाठी असा करा अर्ज

शेतीला तार कुंपण योजनेचा अर्ज हा तुम्हाला ऑफलाईनच करावा लागेल. त्यासाठी तुम्ही सर्व पात्रता निकषात बसत असाल तर तुमच्या क्षेत्रातही पंचायत समिती कार्यालयात जाऊन कृषी विभागातून या योजनेचे अर्ज घेऊ शकता. त्या अर्जरमध्ये तुमच्या शेतीची आणि तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. नंतर कागदपत्रांसहित अर्ज हा पंचायत समितीमधीलच संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करा.

निष्कर्ष

शेतकरी हा आपल्या शेतातील पिकाला मुलाबाळांप्रमाणे जपत असतो. परंतु कुंपणाअभावी त्याचे हे पीक एक रात्रीमध्ये जानेवारी खाऊन टाकतात. ज्या शेतकऱ्यांची शेती हि जंगल जवळ असते त्यांना तर याचा अधिकच त्रास असतो. म्हणून यावर एक अतिशय चांगला उपाय म्हणून Tar Kumpan Yojana Maharashtra हि सरकारने सुरू केली आहे, त्याचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *