Two-wheeler Price After GST 2025: बाईक किंवा स्कूटर घेण्याचे नियोजन करत असाल तर थांबा! तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. येत्या २२ सप्टेंबर पासून बाईक्स आणि स्कूटर्स स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने GST दर कमी केल्यामुळे गाड्यांवर लागणार GST दर 28% वरून 18% करण्यात आला आहे आणि हे दर २२ तारखेपासून लागू होणार आहे.
Two-wheeler Price After GST कपातीनंतर टू-व्हीलर स्वस्त
केंद्र सरकारने दोनचाकी वाहनांवरील जीएसटी दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर देशातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी टू-व्हीलर खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे. लोकप्रिय बाईक्स आणि स्कूटर्सच्या किमतीत मोठी घट झाली आहे. मात्र काही हाय-एंड प्रीमियम बाईक्स मात्र महाग झाल्या आहेत.
🔶 UPI Payment Refund: चुकीने तुमचे पैसे UPI मधून ट्रान्सफर झालेत का? ते परत मिळवण्यासाठी हे करा.
जीएसटी दरात मोठी कपात
यापूर्वी बाईक आणि स्कूटरवर 28% जीएसटी आकारला जात होता. आता तो कमी करून 18% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे लो-सीसी बाईक्स आणि स्कूटरच्या किमतीत मोठा फरक पडला आहे. ग्राहकांना आता त्यांच्या आवडत्या दोनचाकी वाहनांसाठी कमी किंमत मोजावी लागणार आहे.
Royal Enfield बाईक्स किती स्वस्त झाल्या?
Royal Enfield च्या लोकप्रिय मॉडेल्समध्ये मोठी घट झाली आहे.
- हंटर 350: ₹14,867 ने स्वस्त
- बुलेट 350: ₹18,057 ने स्वस्त
- क्लासिक 350: ₹19,222 ने स्वस्त
- मिटीओर 350: ₹19,024 ने स्वस्त
- गोन क्लासिक 350: ₹19,665 ने स्वस्त
पण लक्षात घ्या, Royal Enfield च्या काही प्रीमियम 650 सीसी बाईक्स मात्र महाग झाल्या आहेत.
- इंटरसेप्टर 650: ₹24,604 ने महाग
- कॉन्टिनेंटल GT 650: ₹25,645 ने महाग
- सुपर मिटीओर 650: ₹29,486 ने महाग
🔶 PM Modi Birthaday: प्रधानमंत्र्यांना शाहरुख, आमिर, अजय सह अनेकांनी दिल्या शुभेच्छा
Honda स्कूटर आणि बाईक्सची किंमत कमी
Honda ची लोकप्रिय स्कूटर Activa आणि Dio आता ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत.
- Activa 110 : ₹7,874 ने स्वस्त
- Dio 110 : ₹7,157 ने स्वस्त
- Activa 125 : ₹8,259 ने स्वस्त
- Hornet 2.0 : ₹13,026 ने स्वस्त
- CB350 H’ness : ₹18,598 ने स्वस्त
- CB350 RS : ₹18,857 ने स्वस्त
- CB350 : ₹18,887 ने स्वस्त
- Unicorn : ₹9,948 ने स्वस्त
Hero बाईक्समध्येही मोठी घट
Hero ची बजेट-फ्रेंडली बाईक्स आणि स्कूटर्सही आता स्वस्त झाल्या आहेत.
- HF Deluxe : ₹5,805 ने स्वस्त
- Splendor+ : ₹6,820 ने स्वस्त
- Glamour X : ₹7,813 ने स्वस्त
- Xtreme 160R 4V : ₹10,985 ने स्वस्त
- Xpulse 210 : ₹14,516 ने स्वस्त
- Karizma XMR 210 : ₹15,743 ने स्वस्त
कोणाला फायदा आणि कोणाला तोटा?
या निर्णयामुळे लो-सीसी बाईक्स आणि स्कूटर्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. सर्वसामान्य कुटुंबांसाठी Hero Splendor, Honda Activa किंवा Royal Enfield Classic सारख्या गाड्या आता पूर्वीपेक्षा स्वस्तात मिळतील.
परंतु हाय-एंड बाईक्स जसे की Royal Enfield Interceptor 650, Continental GT आणि Super Meteor 650 खरेदी करणाऱ्यांना मात्र जास्त पैसे खर्च करावे लागतील.
मी नितिकेश, मागील 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध शासकीय माहिती, सरकारी नौकरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय. yojanacafe.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व योजना एका ठिकाणी, अगदी सोप्या भाषेत समजून घेता येतील, कारण तुमचा हक्काचा लाभ मिळवायला माहिती असणं गरजेचं आहे!