Udyogini Yojana Maharashtra: महायुतीचे सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेत आल्यानंतर महिलांना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याचा जणू प्रणच शासनाने घेतला आहे. महिला या पुरुषांपेक्षा कुठेच कमी नाहीत, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा महिला मागे राहू नयेत. स्वतःचा आणि परिवाराचा संपूर्ण खर्च महिला उचलू शकतील आणि स्वाभिमानाने मान उंच करून समाजात वावरू शकतील, इतक्या आत्मनिर्भर महिला बनाव्यात हाच मानस सर्वसामान्यांचे हित जपणाऱ्या आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असावा असे वाटते.
आणि आता तर महिलांना व्यवसायात किंवा उद्योग निर्मितीसाठी कुठलीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून नवीन Udyogini Yojana Maharashtra सुरू केली आहे.
Also Read: Aai Karj Yojana: 15 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार फक्त याच महिलांना, बघा संपूर्ण माहिती.
Udyogini Yojana Maharashtra: उद्योगिनी योजना नेमकी काय आहे?
उद्योगिनी योजनेलाच महिला उद्योगिनी योजना असेही म्हटले जाते. ज्या महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे आणि स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा आहे, अशा महिलांना या Udyogini Yojana Maharashtra अंतर्गत शासन 3 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत म्हणून कर्ज देत आहे.
ही योजना राबवण्यामागील शासनाचा मुख्य उद्देश हाच आहे की, ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आत्मनिर्भर बनून स्वावलंबी व्हाव्यात आणि आर्थिक बाबतीतही स्वतंत्र राहाव्यात.
उद्योगिनी योजनेचे फायदे
- महिलांना उद्योगासाठी मोठी आर्थिक मदत मिळते.
- काही जिल्ह्यांमध्ये काही उद्योग किंवा व्यवसायावर अनुदान सुद्धा शासनाकडून मिळते.
- महिलांना सावकारकडून अधिक व्याजावर कर्ज घेण्याची गरज पडणार नाही.
- महिला उद्योग सुरू करून आत्मनिर्भर बनतील.
- कुटुंबाचा आर्थिक तान कमी होईल आणि कमाई मध्ये वाढ होईल.
- व्यवसायासाठी भक्कम पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्हाला आवडेल तो व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढू शकता.
उद्योगिनी योजनेअंतर्गत कोणते व्यवसाय करता येतात?
| अनु. क्र. | व्यवसाय/ उद्योग |
|---|---|
| 1) | किराणा दुकान |
| 2) | दूध डेयरी |
| 3) | अन्न प्रक्रिया उद्योग |
| 4) | रेडिमेड कपड्याचे दुकान |
| 5) | शिवणकाम दुकान |
| 6) | कुक्कुट पालन |
| 7) | शेळी पालन |
| 8) | अन्नप्रक्रिया उद्योग |
उद्योगिनी योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
- Udyogini Yojana Maharashtra ही फक्त महाराष्ट्रातील महिलोणसाठीच सुरू केले योजना आहे. त्यामुळे यांचा लाभ सुद्धा फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे.
- परंतु हो अर्जदार महिला ही महाराष्ट्राची मुळची रहिवासी असणेही तेवढेच आवश्यक आहे.
- त्या महिलेचे वे ही किमान 18 ते काम 55 च्या दरम्यान असावे.
- अर्जदार महिलेची स्वताचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्याची पूर्ण तयारी असणे आवश्यक आहे.
- महिलेचे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणेही आवश्यक आहे.
उद्योगिनी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
- महिलेचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक पासबूक
- पासपोर्ट फोटो
- व्यवसाय/ उद्योग प्रकल्प अहवाल
उद्योगिनी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
Udyogini Yojana Maharashtra ही मुख्यतः वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार आणि तेथील बँकेनुसार कर्ज देत असते. ही योजना आता अनेक जिल्ह्यांत सुरू आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की ही योजना तुमच्या जिल्ह्यात किंवा बँकेतही सुरू असेल. त्यामुळे आधी तुमच्या जवळील राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन चौकशी करणे अतिशय गरजेचे आहे.
- सर्वात आधी तुमचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत भेट द्या.
- तुम्हाला तेथे Udyogini Yojana Maharashtra चा अर्ज दिला जाईल.
- तो अर्ज तुम्हाला व्यवस्थित आधी वाचून घ्यायचा आहे आणि नंतरच अर्ज अचूकपणे भरावा लागेल.
- अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांसह तो तेथील अधिकाऱ्यांकडे सबमिट करायचा आहे.
- त्यानंतर तेथील अधिकारी तुमचा अर्ज तपासतील आणि तुम्हाला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवतील.
- अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारणपणे १ महिन्याच्या आत तुम्हाला या योजनेचे कर्ज मिळू शकते.
निष्कर्ष
महिला भगिनींनो, ही उद्योगिनी योजना तुम्हाला आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याला नक्कीच एक दिशा देणारी ठरू शकते. योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय तुमच्या गावात किंवा शहरात उभारून रोजगाराचा नवीन मार्ग निर्माण करू शकता.या आर्टिकलमध्ये आपण योजनेची संपूर्ण आणि तुम्हाला उपयोगी अशी माहिती सोप्या व समजेल अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे.
अशाच नवीन नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या WhatsApp आणि Instagram ला आताच जॉइन करा.
धन्यवाद. 🙏