Chandrashekhar Azad: भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद ने हिंदू धर्मगुरु रामभद्राचार्य यांना म्हंटले पापी.

Chandrashekhar Azad
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Chandrashekhar Azad: चंद्रशखर आझाद हे नाव तुम्ही मागील दशकापासून एकत असाल. यांना रावण या नावाने सुद्धा ओळखले जाते. मित्रांनो, चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून आझाद समाज पार्टीचे सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

एवढेच नाही तर मागील झालेल्या उत्तरप्रदेशमधील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते खासदार म्हणून सुद्धा निवडून आले आहेत. वेगळ्या वेगळ्या आंदोलनांमध्ये नेहमी ते दिसत असतात. विशेषतः जिथे दलित ,आदिवासी आणि ओबीसी समाजावर अन्याय होतो त्यांच्या साठी ते सर्वात आधी मदतीसाठी पोहोचत असतात.

आपल्या आक्रमक स्वभावाने आणि बोलण्याने ओळखले जाणारे Chandrashekhar Azad यांनी आता हिंदूंचे धर्मगुरू ज्यांना विश्वगुरू म्हणून सुद्धा संबोधले जाते यांच्या वर एक खालच्या पाटलियावर टिप्पणी केली आहे. ज्यामुळे सध्या ते मोठा चर्चेचं विषय बनला आहे.

Also Read: Maratha Aarakshan: मराठा आरक्षण सापडले कोर्टाच्या कचाट्यात, एकाच वेळेला मराठ्यांना दोन आरक्षण कसे, कोर्टाचा सवाल.

हिंदू धर्मगुरु रामभद्राचार्य यांना म्हंटले पापी.

मित्रांनो, मागील काही इंटरव्हिव मध्ये रामभद्राचार्य हे अनेक संतांना मूर्ख आणि ज्ञान नसलेले संत म्हणून संबोधत आहेत. एवढेच नाही तर स्वामी रामभद्राचार्य यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही संविधान निर्माता म्हणून मानण्यास सुद्धा नकार दिला आहे. तसेच ते संविधानाला प्रतहाम मनात नाहीत तर मनुस्मृतीला सर्वोच मानतात असे सुद्धा एका इंटरव्हिव्ह मध्ये ते बोलले होते.

हो, हि तीच मनुस्मृती ज्यामध्ये SC,ST आणि OBC सहित इतर सर्वच घटकांना कुठलाही अधिकार नव्हता. सर्व अधिकार फक्त ब्राम्हनांच्याच हाती होते आणि इत्तर सर्वना ते गुलामाची वागणूक देत होते. जेव्हा रामभद्राचार्यांनी संविधानाविषयी आणि बाबासाहेबांविषयायी हे उदगार काढेल तेव्हा तर संपूर्ण देशातील बहुजनांनाही पेटून उतरायला हवं होत.

परंतु तस झालं नाही आणि मनुस्मृती मानणाऱ्या रामभद्राचार्य मनात येईल ते बोलते गेले. मित्रांनो, त्यांच्या या भाषावार चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना चांगले सुनावले आहे. ते म्हणाल, “तुम्ही ईश्वर आणि भक्ती आम्हाला शिकवता आणि स्वतःला स्वामी परम ज्ञानी समजता. परंतु तुम्ही मागील जन्मात किती ‘पपा केले असेल म्हणून तुम्हला या जन्मात देवाने लहानपणापासूनच आंधळं बनून ठेवलं आहे.” सोबत रामभद्राचार्य हे संत नाही तर एक पाखंडी आहे. आणि ते या मीरठ जमिनीला छोटा पाकिस्तान म्हणतात. मीरठ हे क्रांतिकार्यांची जमीन आहे.

मायावतीनेही रामभद्राचार्यांचा घेतला खरपुच समाचार

मायमाती म्हणाल्या, तुमचे काम हे कथा सांगण्याचे आहे. आणि तेवढेच तुम्ही करावे. बाबासाहेब हे या देशाचे युगपुरुष होते आणि राहणार. त्यांची या देशाला संविधान दिले हे संपूर्ण जगाला माहित त्यामुळे तुम्ही वाद निर्माण होणारी वक्तव्य करू नये. संविधान आणि मनुस्मृती विषयी ज्ञान नसेल तर चूप राहावे यावर बोलू नये.

निष्कर्ष

मित्रांनो, तुम्हाला आम्हाला जे आरक्षण मिळाला आहे. ते संविधानामुळेच. तुम्हाला आम्हाला जो मतदानाचा हक्क मिळाला आहे ते सुद्धा संविधानामुळेच. तसेच आपण मोकळे कुठेही जातो, बोलतो, फिरतो ते कशामुळे संविधानामुळेच. जर संविधांपेक्षा कोणी मनुस्मृतीला अधिक चांगलं मानत असेल तर तुमची काय प्रतिक्रिया असे, ते कंमेंट्स मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *