Umed Bharti 2025: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान मध्ये 20 हजार पगाराच्या नोकरीची संधी

Umed Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Umed Bharti 2025: मित्रानो, उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, तालुक्यातील एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्पामार्फत विविध पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून लवकरात लवकर अर्ज करावेत असे आव्हान सुद्धा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गतच केले गेले आहे.

मित्रांनो, तुम्ही जर बेरोजगारीची त्रस्त आहात आणि चांगले शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नसेल तर Umed Bharti 2025 तुमच्याकरता नवीन संधी आहे. परंतु हो, हि जी भरती असेल ती तीन वर्षाच्या कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे. त्यामुळे भरतीची संपूर्ण माहितीची PDF आम्ही खालील प्रमाणे तुम्हाला देणार आहो, ते व्यवस्तीत समजून घ्या.

Also Read: BMC Data Entry Operator Bharti 2025: मुंबई महानगरपालिका अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर रिक्त पदांची भरती सुरु, पगार 40 हजारांपर्यंत!

Umed Bharti 2025 भरले जाणारी पद आणि पात्रता

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान अंतर्गत IFC ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदांकरता Umed Bharti 2025 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिराती मध्ये एकूण 20 जगाची भरती आहे. या पदांनुसार शैक्षणिक पात्रता सुद्धा अधिकृत जीआर मध्ये सांगण्यात आली, त्यानुसार आपण खालील प्रमाणेबघूया.

शैक्षणिक पात्रता

  1. IFC ब्लॉक अँकर: कृषीमध्ये कृषी विज्ञान कृषी तंत्रज्ञान किंवा कृषी फलोत्पादन विज्ञानमध्ये पदवी किंवा B.Tech.in कृषी किंवा मत्सशास्त्रामध्ये विज्ञानची पदवी. वनशास्त्रात विज्ञानाची पदवी, पशुवैद्यकीय विज्ञान बॅचलर ऑफ ऍनिमल ह्युअल बॅचलर ऑफ सायन्स इन ऍनिमल यांसारखी कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी व तत्सम क्षेत्रामधील किमान एका वर्षाचा तरी अनुभव असणे गरजेचे आहे.
  2. वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती: वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदाकरिता अर्ज करणारा व्यक्ती हा किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच्या त्या उमेदवाराकडे तांत्रिक व संगणकीय ज्ञान असणे आवश्यक असेल. उमेद अभियानातील किमान तीन वर्षाचा अनुभव बंधनकारक असेल.

इतर पात्रता आणि वयोमर्यादा

  • उमेदवार जर एकात्मिक शेती प्रभाग तालुका Anchor सेवादात स्थानिक सातारावरीक असेल तर त्याला अधिक प्राधान्य देण्यात येईल.
  • त्याच प्रकारे अर्जदाराला कृषी, फलोत्पादन, मत्सपालन, पशुपालन, मधमाशीपालन यांपैकी क्षेत्रातील शेती किंवा शेतीशी निघडीत उपक्रम यांविषयी माहिती असावी.
  • उमेदवाराकडे उत्तम व स्पष्ट संवाद कौशल्य असायला हवे जेणेकरून समुदायाला सुलभतेने समजावून सांगता येईल.
  • तसेच शेती व शेतीशी आधारित मूल्यवर्धन साखळी उपक्रम व त्यांची अंमलबजावणी विषयी माहिती असावी.
  • अर्जदाराकडे दुचाकी वाहन चावण्याचा परवाना असावा.
  • कमाल 43 पर्यंतचे वय असणारे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

मत्त्वाच्या तारखा

  • अर्जची सुरुवात: 20 सप्टेंबर 2025
  • शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2025

नोकरीचे ठिकाण

महाराष्ट्रातील लातूर, अहमदपूर, औसा, उदगीर, शिरूर, देवणी, निलंगा आणि रेणापूर तसेच वर्धा. महाराष्ट्रातील या ठिकाणी संबंधित पदाकरिता भरती घेतली जात आहे.

अर्ज पद्धती

Umed Bharti 2025 करता अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. एक तर स्वतः संबंधित ठिकाणी जाऊन अर्ज करता येणार आहे किंवा स्पीड पोस्टच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही अर्ज पाठवू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठीचा पत्ता हा खालीलप्रमाणे देण्यात आलेल्या अधीकृत जीआर मध्ये देण्यात आला आहे.

अधिकृत साइट येथे क्लीक करा
जाहिरात PDF येथे क्लीक करा
अर्जाची PDF येथे क्लीक करा

निष्कर्ष

उमेद मध्ये जी भरती होणार आहे त्यामध्ये तुमच्या प्रवासाचा भत्ता हा पगाराच्या वेगळा मिळणार आहे. तसेच जर तुम्ही या नोकरीसाठी पात्र झालात तर दार वर्षाला तुमच्या पगारात वाढ होईल आणि कंदाची तीन वर्ष झाल्यानंतर तुम्हाला रिजॉइनिंग करून तुमचा पगार अधिक जास्त वाढू शकेल. म्हणून उमेद मधील नोकरीला एक उत्तम संधी समजली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *